AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोवॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश होण्याची शक्यता

कोवॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज असून जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश होण्याची शक्यता आहे. (Covaxin)

कोवॅक्सिन लस घेतलेल्यांसाठी गुड न्यूज, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश होण्याची शक्यता
कोव्हॅक्सिन
| Edited By: | Updated on: Jun 08, 2021 | 12:15 PM
Share

नवी दिल्ली: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या आता कमी होत आहे. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्यात आली होती. कॅनडा, ब्रिटन, सौदी अरेबिया, न्यूझीलंड यासारख्या देशांचा यामध्ये समावेश होता. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यास काही देशांनी नकार दिला होता. मात्र, कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. त्यांचा परदेशातील प्रवासाचा मार्ग सुकर होऊ शकतो. कारण, कोवॅक्सिन लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या विषयी निर्णय जाहीर होऊ शकतो. (Bharat Biotech applied to WHO for covaxin include in vaccine list)

कोवॅक्सिनचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश

भारत बायोटेकनं कोवॅक्सिन लसीचा समावेश जागतिक आरोग्य संघटेनेनं त्यांच्या यादीमध्ये करावा, यासाठी अर्ज केला आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून यावर जुलै ते सप्टेंबर दरम्यान निर्णय घेतला जाऊ शकतो. अमेरिका, ब्राझील, हंगेरी यासह एकूण 60 देशांमध्ये कोवॅक्सिन लसीला मान्यता मिळावी यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.

कोरोना विषाणू संसर्गानंतर परदेशात प्रवास करायचा असल्यास लस घेणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसींची यादी तयार केलेली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत कोवॅक्सिन लसीचा समावेश नसल्यानं ती लस घेतलेल्यांपुढं अडचण निर्माण झाली होती.

कोरोना रुग्णसंख्या घटली

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर आता कोव्हिडची साथ नियंत्रणात आल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण, गेल्या 24 तासांमध्ये देशभरात अवघ्या 86,498 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus) शिगेला असताना देशात प्रत्येकदिवशी चार लाखांच्या आसपास नवे रुग्ण सापडत होते. मात्र, आता हे प्रमाण एक लाखापेक्षा कमी झाल्याने ही भारताच्यादृष्टीने दिलासादायक बाब मानली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या आकेडवारीनुसार सोमवारी दिवसभरात देशभरात 86,498 नव्या रुग्णांची नोंद झाली. तर 2123 जणांचा मृत्यू झाला.

संबंधित बातम्या:

कोवॅक्सिन, स्पुतनिक वी नको, परदेशी विद्यार्थ्यांनी WHO नं मंजुरी दिलेलं वॅक्सिन घ्यावं, अमेरिकन शिक्षणसंस्थाची भूमिका

Special Report | कोविशिल्डनंतर कोवॅक्सिनच्या लसीचेही गौडबंगाल, 4 कोटी कोवॅक्सिनच्या हिशेब लागेना

(Bharat Biotech applied to WHO for covaxin include in vaccine list)

मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.