आईनं बाळाला अंगावरचं दूध पाजताना नेमकं काय ध्यानात ठेवायचं? उत्तर जाणून घ्यायलाच हवं!

आईनं बाळाला अंगावरचं दूध पाजताना नेमकं काय ध्यानात ठेवायचं? उत्तर जाणून घ्यायलाच हवं!
प्रातिनिधिक छायाचित्र

जन्माला आलेले बाळ आणि आई यांचे नाते काही वेगळेच असते. बाळ जन्माला आल्यावर लगेच बाळाला आईच्या अंगावरचे दूध पाजले जाते कारण ते त्याच्यासाठी अमृत असते परंतु अनेकदा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका भविष्यात होऊन नये अशावेळी अंगावरचं दूध पाजणे हे लाभदायक ठरते म्हणूनच अंगावरचं दूध पाजन असताना नेमकं काय ध्यानात ठेवावं हे जाणून घ्यायलाच हवं!

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 16, 2022 | 9:09 PM

जन्माला आलेले बाळ आणि आई यांचे नाते काही वेगळेच असते. बाळ जन्माला आल्यावर लगेच बाळाला आईच्या अंगावरचे (Breastfeeding Mother) दूध पाजले जाते कारण ते त्याच्यासाठी अमृत असते परंतु अनेकदा स्त्रियांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका भविष्यात होऊन नये अशावेळी अंगावरचं दूध पाजणे हे लाभदायक ठरते म्हणूनच अंगावरचं दूध पाजन असताना नेमकं काय ध्यानात ठेवावं हे जाणून घ्यायलाच हवं! आपण सांगू इच्छितो की,नुकत्याच केले गेलेल्या संशोधनानुसार एक गोष्ट प्रामुख्याने पुढे आलेली आहे की , बाळाला अंगावरचे दूध पाजल्यामुळे आईला भविष्यात कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो तसेच कॅन्सर होण्याची शक्यता सुद्धा खूपच कमी असते. जेव्हा बाळ आईच्या स्तनाद्वारे दूध पितो त्यावेळी आईला मिळणारे सुख हे स्वर्गापेक्षा फिके वाटू लागते.अनेकदा आईंना बाळांना (Baby) दूध कशा पद्धतीने पाजायचे व बाळाला दूध पाजत असताना नेमक्या काय गोष्टी ध्यानात ठेवायच्या असतात याबद्दल फारशी माहिती नसते.

बाळाला दूध पाजताना घ्या अशी काळजी

हे करा :

प्रत्येक नवजात मातांनी बाळाला अंगावरचे दुध पाजताना या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे आणि म्हणूनच काही नियम व काही सवयी अंगी लावायला हव्यात.

1) बाळाला अंगावरचे दूध पाजताना शक्यतो शांत राहा. कोणत्याही प्रकारची घाई गडबड करू नका. ही प्रक्रिया तुमच्यासाठी नवीन असल्याने थोडा फार गोंधळ होईल परंतु या सगळ्या परिस्थितीला शांत व संयमाने सामोरे जा. जास्तीत जास्त प्रसन्न रहा.

2) बाळाला दूध पाजताना कोणताही संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्या आणि म्हणूनच आपल्या स्तनांची योग्य ती स्वच्छता सुद्धा ठेवा. नवजात बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने बाळांना लगेच संसर्ग होतो अशा वेळी आपल्याला स्वच्छता राखणे आवश्यक आहे.

3) बाळाच्या आणि तुमच्या शरीराला आवश्यक असणारे सर्व पोषक तत्व व खनिज पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा यामुळे तुमचे शरीर व बाळाचे शरीर सदृढ राहील. आईच्या शरीराला योग्य ते पोषक तत्व प्राप्त झाल्याने आईच्या शरीरामध्ये दुधाची निर्मिती सुद्धा जास्त प्रमाणात होते आणि परिणामी बाळाचे पोट सुद्धा भरते.

4) दिवसभरातून जितक्या जास्त वेळा शक्य होईल तितके पाणी सेवन करा तसेच योग्य आराम करून पुरेशी झोप घ्या तसेच दिवसभरामध्ये नेहमी सकारात्मक विचार करा, या सर्व गोष्टींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम आपल्या बाळावर सुद्धा होत असतो.

5) जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल तर अशा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध सेवन करू नका. स्वतःच्या मताने औषधोपचार अजिबात करू नका.

हे करू नका :

बाळाला अंगावरचे दुध पाजताना अशा काही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत जेणेकरून बाळ यांना भविष्यात त्रास सहन करावा लागेल.

1) जर तुम्हाला अल्कोहोल व मद्यपान करण्याची सवय असेल तर ही सवय तुम्हाला काही काळासाठी सोडावी लागेल कारण की एक आई म्हणून जेव्हा तुम्ही बाळाला दुध पाजणार आहात तेव्हा या सगळ्या गोष्टी थांबवणं गरजेचं आहे. बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा तुम्ही तुमच्या या सवयी सुरू ठेवल्या तर यामुळे बाळाच्या आरोग्याला भविष्यात धोका पोहोचू शकतो.

2) जंक फूड, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादी पदार्थ शक्यतो खाण्याचे टाळा कारण की मोठ्या प्रमाणात फॅट, शुगर आणि सॉल्ट यासारखे पदार्थ असतात ज्यामुळे आईचे आरोग्य खराब होऊ शकते आणि त्याचा विपरीत परिणाम बाळाच्या शरीरावर सुद्धा होऊ शकतो

3)  जर तुम्हाला कोणताही एखादा आजार असेल तर अशावेळी बाळाला अंगावरचे दूध पाजू नका जेणेकरून दुधाच्या माध्यमातून बाळाला सुद्धा संसर्ग होऊ शकतो अशा वेळी बाळाला वरचे दूध पाजावे.

4) बाळाला बाहेरचे पदार्थ खाऊ घालण्याची घाई करू नका. सुरुवातीचे काही महिने बाळाला आईच्या अंगावरचे दूध पाजायला द्या कारण की आईच्या दुधामध्ये असे काही पोषकतत्व उपलब्ध असतात जे बाळाच्या पचनशक्तीसाठी उपयुक्त ठरतात. जर तुम्ही बाहेरचे पदार्थ खाण्यास दिले तर यामुळे बाळाला ते अन्न पचायला सुद्धा जड जाईल आणि परिणामी बाळाची पचनशक्ती बिघडू शकते.

5) जर अंगावरचे दूध बाळाला पाजताना स्तनांजवळ काही वेदना होत असतील,काही गाठी आल्या असतील तर यावेळी दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका अशा वेळी स्त्री तज्ञ किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरला आवश्य भेटा जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारच्या कॅन्सरचा धोका उद्भवणार नाही.

टिप: या लेखामध्ये सांगितलेली माहिती ही सर्वसाधारण हेतूने दिलेली माहिती आहे. या माहितीचा वापर करताना किंवा कोणतेही घरगुती उपचार करण्याआधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या टीव्ही 9 तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सल्ला देऊ इच्छित नाही.

इतर बातम्या :

Brinjal | नियमित आहारामध्ये वांगं वापरत असाल तर पच्छाताप होण्याआधीच काही गोष्टी जाणून घ्या!

वीस मिनिटांमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे हे पाच व्यायाम, ओमिक्रॉनला पळवून लावतील

अशी पाच लक्षणे जी सांगतात तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता…


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें