वारंवार हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो? शरीराला हे त्रास होऊ शकतात
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जगात ग्लोबल हँडवॉशिंग डे म्हणून साजरा केला जातो. लोकांनी हातांची स्वच्छता करुन आजारांपासून दूर रहावे हा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

हात धुणे एक आवश्यक सवय आहे, ज्यामुळे अनेक आजारांपासून आपल्याला वाचता येते. आपण जेवणापूर्वी किंवा टॉयलेटवरुन आल्यानंतर कोणाला स्पर्श केल्यानंतर किंवा बाहेरुन घरात आल्यानंतर नेहमीच हात धुण्याचा सल्ला दिला जात असतो. आपला हात नेहमी मोबाईल, दरवाजा, नोटा, गाड्या आणि अन्य खाण्या पिण्याच्या वस्तूंना लागत असतो,त्यामुळे अनेक रोगजंतू त्वचेवर येतात. जर आपण हात नीट धुलते नाही तर ते शरीरात पोहचून आपल्याला आजारी पाडू शकतात.जागतिक आरोग्य संघटनेच्या आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार नियमित आणि योग्य प्रकारे हात धुतल्याने डायरिया, सर्दी-पडसे, फ्लू, त्वचा संक्रमण, श्वासाशी संबंधित समस्या आणि कोरोनासारख्या आजारांना रोखता येते.
त्यामुळे दरवर्षी १५ ऑक्टोबर हा ग्लोबल हँडवॉशिंग डे म्हणून साजरा केला जातो. लोकांना स्वच्छतेचा संदेश यातून दिला जातो. स्वच्छ हात धुणे हा आजारांपासून बचाव करण्याचा सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. परंतू खूप जास्त वेळा हात धुतल्यानेही आपल्याला नुकसान होऊ शकते. चला तर पाहूयात जास्त हात धुतल्याने आपण आजारी पडू शकतो का ? यामुळे शरीरात काय नेमके प्रॉब्लेम होतात.
जास्त हात धुतल्याने आपण आजारी पडतो ?
हात धुण्याची सवय चांगली आहे. परंतू जर जास्त वेळा हात धुतले तर शरीरात काही समस्या निर्माण होऊ शकतात. आपल्या त्वचेवर काही नॅचरल ऑईल आणि गुड बॅक्टेरियात असतात ते आपले रक्षण करत असतात. बाहेरील जंतूशी लढण्यासाठी ते आपली मदत करतात. जेव्हा आपण अधिक वेळा साबण आणि हँडवॉशचा वापर करतो तेव्हा त्वचेचे नैसर्गिक संरक्षण हळूहळू निघून जाते. यामुळे त्वचा निष्तेज आणि बेजीव होते, हात लाल होतात, खाज आणि त्वचेला भेगा पडू लागतात. काही लोकात एक्झिमा सारख्या समस्या होतात. त्वचा फाटल्याने बॅक्टेरिया शरीरात सहज प्रवेश करतात. त्यामुळे इंफेक्शनचा धोका वाढतो.
वारंवार हात धुतल्याने शरीरात या समस्या होतात.
1. त्वचेत जळजळ आणि खाज : वारंवार साबणाने हात धुतल्याने त्वचेचा वरच थर निघून जातो. त्यामुळे त्वचा चुरचुरते,खाज येते, काही वेळा भेगा देखील पडतात.
2. नॅचरल ऑईलचे नुकसान: आपल्या त्वचेतील नैसर्गिक ऑईल हातांना सॉफ्ट बनवते, जर वारंवार हात धुतले तर ऑईन निघून जाते. त्वचा रुक्ष आणि निर्जिव होते
3. डर्मेटायटिस: खूप जास्त हात धुतल्याने संपर्क डर्मेटायटिस होऊ शकतो. त्यामुळे स्कीनमध्ये सूज, खाज आणि लालसरपणा होता.
4. एक्झिमाची समस्या: ज्या लोकांना आधीपासून एक्झिमा आहे, त्यांच्यासाठी वारंवार हात धुण्याने गंभीर समस्या होऊ शकते. हा आजार आणखीन वाढू शकतो. त्यामुळे हाताला सारखे जळजळणे आणि चुरचुरणे सुरु होऊ शकते.
5. संक्रमणाचा धोका वाढतो : जेव्हा त्वचा फाटते किंवा त्याचे भेगा पडतात. तेव्हा बॅक्टेरिया शरीरात सहज जाऊ शकतात.त्यामुळे संक्रमणाचा धोका आणखीन वाढतो.
केव्हा आणि कसे हात धुवावेत ?
हात धुणे गरजेचे आहेत. परंतू आवश्यक असेल तेव्हाच ते धुवावेत. टॉयलेटला जाऊन आल्यानंतर, जेवणापूर्वी, बाहेर घरात आल्यानंतर, आजारी व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर शिंकणे किंवा खोकल्यानंतर हात धुणे गरजेचे आहे. किमान २० सेंकद वाहत्या पाण्याखाली साबणाने हात धुवावे, बोटांचे मधले भाग, नखांचा खालचा भाग आणि हाताचा भाग नीट चोळून धुवावा.
