AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याच्या या समस्यापासून मिळेल आराम

ताज्या गुलाबाच्या पाकळ्या आणि साखर किंवा गूळ यापासून तयार केलेला गुलकंद आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हा थंडावा देणारा, नैसर्गिक पदार्थ विशेषतः उन्हाळ्यात खाल्ल्याने शरीराच्या या समस्यापासून आराम मिळतो. चला तर मग आजच्या लेखात गुलकंद खाण्याचे फायदे जाणून घेऊयात.

उन्हाळ्यात रोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्याने आरोग्याच्या या समस्यापासून मिळेल आराम
GulKand
| Edited By: | Updated on: Mar 29, 2026 | 8:03 AM
Share

उन्हाळ्याच्या दिवसात उष्णतेवर मात करण्यासाठी आपल्या प्रत्येकाच्या घरांमध्ये नैसर्गिक आणि पारंपरिक पेय व खाद्य पदार्थ बनवले जाता. त्यामध्ये असाच एक पदार्थ आहे तो म्हणजे गुलकंद, जो ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवला जातो. तर हा गुलकंद केवळ चविष्टच नाही, तर शरीर आणि मनाला थंडावा देखील देतो. गुलकंद हा उन्हाळ्यासाठी शरीराचे तापमान थंड ठेवण्यासाठी एक उत्तम सोबती मानला जातो. गुलकंदाचा सुगंध आणि गोड चव पिढ्यानपिढ्या भारतीय घरांमध्ये जपली गेली आहे. त्यासोबतच गुलकंद हा थंडावा देणारा, नैसर्गिक पदार्थ विशेषतः उन्हाळ्यात लोकप्रिय असतो. चला तर मग रोज एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्याने आपल्या आरोग्याला कोणते फायदे मिळतात ते जाणून घेऊयात.

गुलकंद हा पदार्थ केवळ चवदारपणा आणि थंडावाच देत नाही, तर भारतीय परंपरा आणि उत्कृष्ट खाद्यसंस्कृतीचे प्रतीकही आहे. खुप आधीच्या काळापासून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी गुलकंद बनवला जायचा आणि हा गुलकंद मुलांना चमचाभर खायला देत असे. ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये उष्मघातापासून बचाव होतो.

उन्हाळ्यात गुलकंद खाण्याचे फायदे काय आहेत?

आरोग्य तज्ञांच्या मते गुलकंदमध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचे नैसर्गिक गुणधर्म असतात, जे शरीराला थंडावा देतात. यामुळे उष्णतेमुळे येणारा थकवा, चिडचिड आणि तणाव कमी होण्यास मदत होते.

गुलकंद पचनसंस्था मजबूत करते आणि पचनक्रिया सुलभ करण्यास मदत करते.

उन्हाळ्यात पोटाचे विकार अनेकदा वाढतात. या समस्येपासून त्वरीत आराम मिळवण्यासाठी दररोज थोड्या प्रमाणात गुलकंदचे सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि आम्लपित्तापासून आराम मिळतो.

गुलकंदामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते का?

गुलकंदमध्ये चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. तसेच उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या देखील होत असतात आणि या समस्येमुळे त्वचा लवकर निस्तेज होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार टिकवून ठेवण्यासाठी गुलकंदाचे सेवन करा. यामुळे त्वचेला आतून पोषण मिळते. त्यासोबतच गुलकंदाच्या योग्य प्रमाणात सेवन केल्याने शरीराच्या तापमानाचा नैसर्गिक समतोल राखण्यासही मदत होते.

गुलकंद केव्हा आणि कसे खावे?

गुलकंद अनेक प्रकारे खाल्ले जाऊ शकते. ते थेट चमच्याने खाल्ले जाऊ शकते, दूध किंवा दह्यामध्ये मिक्स करून सरबत बनवता येते. तसेच आईस्क्रीममध्ये गुलकंद टाकून सुद्धा खाल्ले जाऊ शकते. उन्हाळ्यात अनेकांसाठी गुलकंदसोबत थंड दूध किंवा सरबत पिणे हा एक आवडता पेय पदार्थ आहे.

उन्हाळ्यात कृत्रिम आणि पॅकेज केलेल्या शीतपेयांऐवजी घरगुती गुलकंद फायदेशीर ठरतो. मात्र मधुमेहींनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच त्याचे सेवन करावे, कारण त्यात गोडवा आणणारे स्वीटनर्स असतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....