पुढील 2-4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात, 8 लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता : टास्कफोर्स

महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय.

पुढील 2-4 आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात, 8 लाखांपर्यंत रुग्णसंख्या जाण्याची शक्यता : टास्कफोर्स
Corona
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 17, 2021 | 6:34 PM

मुंबई : महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब आहे. दुसऱ्या कोरोना लाटेमधील हाहाकाराची तीव्रता आत्ता कुठं कमी होत असतानाच राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर्सच्या टास्कफोर्सने महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा दिलाय. पुढील 2-4 आठवड्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट राज्यात दाखल झालेली असेल. यामुळे महाराष्ट्रातील रुग्णसंख्या 8 लाखांपर्यंत जाईल, अशी शक्यता टास्कफोर्सने वर्तवली आहे (Corona 3rd wave may hit Maharashtra within next 2-4 weeks task force warn).

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टास्क फोर्सच्या सदस्यांनी राज्यातील कोरोना स्थितीची माहिती सादर केली. यावेळी त्यांनी तिसऱ्या कोरोना लाटेत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या आधीपेक्षा दुप्पट म्हणजे 8 लाखांपर्यंत जाण्याचा धोका असल्याचं सांगितलं. यात 10 टक्के रुग्ण लहान मुलं आणि तरुण असतील असंही नमूद करण्यात आलेय. संसर्गाचा हाच पॅटर्न दुसऱ्या कोरोना लाटेत देखील पाहायला मिळाला होता.

कोरोना नियमांच्या काटेकोर अंमलबजावणीची गरज सांगताना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी अशी परिस्थिती याआधी ब्रिटनमध्ये दिसल्याचं सांगितलं. ब्रिटनमध्ये देखील दुसऱ्या लाटेनंतर केवळ 4 आठवड्यात तिसऱ्या लाटेचा संसर्ग पाहायला मिळालाय. सामान्यपणे कोरोनाच्या दोन लाटांमध्ये 100 दिवस किंवा 8 आठवड्यांचं अंतर असल्याचं साथीरोग तज्ज्ञांचं मत आहे. हे अंतर पहिल्या लाटेचा शेवट ते पुढील लाटेचं उच्चांक असा आहे.

महाराष्ट्रात दुसरी कोरोना लाटेची तीव्रता कमी झाल्याने अनेक ठिकाणी निर्बंध हटवण्यात आलेत. त्यामुळे ठिकठिकाणी गर्दी आणि फिजीकल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडताना दिसत आहे. त्यातच आता टास्कफोर्सने हा गंभीर इशारा दिल्यानं आरोग्य यंत्रणेच्या काळजीत वाढ झालीय.

हेही वाचा :

नियम न पाळणे, गर्दी वाढल्यास तिसऱ्या लाटेला लवकर आमंत्रण : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भारतात किती लसीकरण झालयं? कुणाला किती लसीचे डोस? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सविस्तर माहिती

नितेश राणेंकडून मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमाकवच; 3 लाखांच्या विम्यासह 7 लाखांपर्यंत फायदा

व्हिडीओ पाहा :

Corona 3rd wave may hit Maharashtra within next 2-4 weeks task force warn

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें