AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितेश राणेंकडून मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमाकवच; 3 लाखांच्या विम्यासह 7 लाखांपर्यंत फायदा

येत्या चार दिवसांत सर्व सरपंचाचे विमा उतरण्याची प्रक्रिया देशातील चोला मंडलम या प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनीकडून पूर्ण केली जाईल, अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत दिली. Nitesh Rane sarpanches insures

नितेश राणेंकडून मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमाकवच; 3 लाखांच्या विम्यासह 7 लाखांपर्यंत फायदा
नितेश राणे, आमदार, भाजप
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 3:49 PM
Share

सिंधुदुर्गः कणकवली-देवगड- वैभववाडी मतदारसंघातील सर्व सरपंचांना प्रत्येकी 3 लाखांचा आरोग्य विमा आणि 7 लाख 50 हजारांपर्यंतचा मोबदला मिळेल, असे विमा कवच दिले जाणार आहे. ज्या मतदारांनी मला निवडून दिलंय. त्या सर्वांचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचाचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे. येत्या चार दिवसांत सर्व सरपंचाचे विमा उतरण्याची प्रक्रिया देशातील चोला मंडलम या प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनीकडून पूर्ण केली जाईल, अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Nitesh Rane insures all sarpanches in the constituency; Benefit up to Rs 7 lakh with insurance of Rs 3 lakh)

एक वर्षासाठी असणाऱ्या या विम्याला तीन लाखांपर्यंत विमा संरक्षण

आमदार नितेश राणे यांनी zoom अॅपवरून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली, यावेळी ते बोलत होते. आमदार नितेश राणे म्हणाले, एक वर्षासाठी असणाऱ्या या विम्याला तीन लाखांपर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे, त्याचबरोबर ज्या सरपंचांचा 3 लाखांचा खर्च झाला असेल तर त्यांना आणखी 75 हजार रुपये वाढवून मिळणार आहेत. तसेच रुग्ण वाहिकेपासून व्हीआयपी उपचारपद्धती यात लागू होणार आहे. कोरोनाबरोबरच इतर आजारही या विमा कवचमध्ये समाविष्ट केलेत. एकूण सात ते साडेसात लाख रुपयांचा खर्च ही कंपनी या विम्यात करणार आहे.

पक्षभेद न पाहता सर्वच सरपंचांचा विमा उतरवणार

कोरोना काळात सरपंच मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सरपंचांचा मृत्यूही झालाय. परंतु शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मात्र लोकप्रतिनिधी या नात्याने मी सरपंचांची जबाबदारी घेत असून, पक्षभेद न पाहता सर्वच सरपंचांचा विमा मी उतरवणार आणि ती प्रक्रिया सुरू केले आहे, अशी ग्वाही राणे यांनी दिली. यात विमा कंपनीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालये आहेत, अजून काही रुग्णालये जोडली जाणार आहेत, असे सांगतानाच कोरोनामुक्त गाव करतानाच कोरोना भयमुक्त करणे गरजेचे आहे. सर्वच सरपंच या फ्रंटलाईनवर काम करतात, त्यांना संरक्षण देणे गरजेचे होते ते माझ्या मतदारसंघातील सरपंचांपासून सुरुवात केली आहे. संपूर्ण जिल्हा हा राणेंवर प्रेम करणारा आहे, त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली की जिल्ह्यासाठी निश्चित विचार करू असेही आमदार नारायण राणे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. माझ्या या कामाचे सत्ताधारी आणि पालकमंत्री यांनी अनुकरण करावे आणि जिल्ह्यात असे विमा कवच द्यावे त्यात ते कमी पडले तर भाजपाच्या वतीने आम्ही सर्व सरपंचांना विमा कवच देऊ, असेही त्यांनी सांगितले.

कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघातील सर्वपक्षीय 169 सरपंचांना मिळणार विमा कवच

मागील सव्वा वर्षांपासून सरपंचांची सुरू असलेली मागणी आमदार नितेश राणे यांनी विमा कवच जाहीर करून पूर्ण केली. यात कणकवली, देवगड, वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील सर्वपक्षीय 169 सरपंचांना लाभ मिळणार आहे. आमदार नितेश राणे यांनी कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील सरपंचांचे मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व आजारांवर साडेसात लाखाचे मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी मेडिकल इन्शुरन्स उतरवण्याची मोठी घोषणा पत्रकार परिषदेत केली.

प्रत्येक सरपंचाची 3 लाखांची विमा पॉलिसी उतरवली जाणार

या विमा पॉलिसी अंतर्गत प्रत्येक सरपंचाची 3 लाखांची विमा पॉलिसी उतरवली जाणार असून, हा विमा एका वर्षासाठी मर्यादित असणार आहे. मात्र एका वर्षाच्या मुदतीच्या आत तीन लाखांचे वैद्यकीय उपचार होऊन आणखी वैद्यकीय खर्च वाढला, तर पॉलिसी धारक सरपंचाला आणखी 75 हजार रुपयांचं बेनिफिट दिले जाणार आहे, त्यापेक्षाही खर्च वाढल्यास तीन लाख रुपये अॕड आॕन केले जाणार आहेत. एकंदरीत पॉलिसीच्या एक वर्षाच्या कालावधीत साडेसात लाख रुपयांचे मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. यासोबतच लोकप्रतिनिधी असलेले सरपंच जर कामगार असतील तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अॕडमिट असताना त्यांना प्रतिदिन 500 रुपये डेलि कॕश बेनिफिट मिळणार आहे.

संबंधित बातम्या

ठाकरे सरकारने पत्रकारांच्या लसीकरणासाठी सिंधुदुर्ग पॅटर्न लागू करावा, आमदार नितेश राणेंचा सल्ला

Nitesh Rane insures all sarpanches in the constituency; Benefit up to Rs 7 lakh with insurance of Rs 3 lakh

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.