AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना व्हायरस चीनच्या वुहान लॅबमधूनच बाहेर पडला, अमरिकेच्या एफबीआयचा आरोप

चीनच्या वुहान शहरातील लॅबोरेटरीतूनच कोरोनाचा उगम झाल्याचा आरोप अमेरिकन एफबीआयने केला आहे.

कोरोना व्हायरस चीनच्या वुहान लॅबमधूनच बाहेर पडला, अमरिकेच्या एफबीआयचा आरोप
WUHANImage Credit source: socialmedia
| Updated on: Mar 01, 2023 | 5:55 PM
Share

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा प्रसार होऊन आता तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. सर्वात आधी चीनच्या वुहान या शहरातूनच जगभर कोरोनाचा प्रसार झाला होतो. यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. या व्हायरस मागे चीनचा हात असल्याचे मानला जात आहे. आता एफबीआयच्या डायरेक्टरनही देखील मानले आहे की चीनच्या वुहान शहरातूनच या विषाणूचा प्रवेश झाला. एबीआयचे डायरेक्टर क्रिस्तोफर यांनी म्हटले आहे की कोविड-19  चा जन्म वुहानच्या सरकारी लॅबमध्येच मध्येच झाल्याचा दाट संशय आहे.

एफबीआयच्या प्रमुखांनी फॉक्स नूज्यस बोलताना सांगितले की या महासाथीची उत्पत्ती एका लॅबोरेटरीतून झाल्याचा आम्हाला संशय आहे. अशा प्रकारे सार्वजनिक रित्या प्रथमच एबीआयने असे मानले आहे की कोरोनाची उत्पती कशा प्रकारे झाली आहे. अर्थात चीनने यापूर्वीच हा आरोप मानहारक असल्याचे म्हटले आहे. चीनने हा आरोप चुकीचा असल्याचे सांगत चीन आपण स्वत: या साथीने पीडीत असल्याचे म्हटले होते. मात्र, एफबीआयने म्हटले आहे की चीन जागतिक महामारीच्या शोधासाठी सुरू असलेले प्रयत्न विफल करण्याच्या मागे लागला आहे. हे सर्वांसाठीच दुर्भाग्यपूर्ण आहे, काही अभ्यासानंतर हे स्पष्ट होत आहे की चीनच्या वुहान येथील प्राण्यांना हा आजार प्रथम झाला नंतर तो मानवात पसरला.

चीनच्या वुहान सीफूड आणि वाईल्ड लाईफ मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या जनावारामार्फत हा आजार माणसांमध्ये आला. हे फिश मार्केट जगप्रसिध्द वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजी लॅबपासून अवघ्या 40 मिनिटाच्या वाहन अंतरावर आहे. याच लॅबोरेटरीत कोरोना वायरसवर संशोधन करण्यात आले होते. दुसरीकडे अमेरिकेच्या सरकारी एजन्सीनी एबीआयच्या दाव्याबद्दल वेगवेगळे दावे केले आहे.

कोविड एका लॅबोरेटरीतून लिक झाल्याचा दावा अमेरिकन ऊर्जा विभागाने केला आहे. या पूर्वी या एजन्सीने म्हटले होते की हे निश्चित नाही की व्हायरस कुठून सुरू झाला. जागतिक आरोग्य संघटनेने साल 2021  मध्ये म्हटले होते की लॅबोरेटरीतून व्हायरस लिक होण्याची शक्यता खूपच कमी आहे. काही जणांनी लॅब लीक नॅरेटीव्हचा जूना आरोप सोडून द्यायला हवा अशी मागणी चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता माओ निंग यांनी म्हटले आहे. चीनला बदनाम करणे बंद करायला हवे तसे याचे राजकारण करणेही बंद करायला हवे असेही त्यांनी म्हटले आहे.

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.