AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जिऱ्याचे की ओव्याचे पाणी रिकाम्यापोटी पिणे आहे अधिक फायदेशीर, जाणून घ्या तज्ञांकडून

आजकाल बरेच लोकं निरोगी राहण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करत आहेत, ज्यामध्ये जिरे आणि ओव्याचे पाणी सर्वात लोकप्रिय आहे. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी जिऱ्याचे व ओव्याचे पाणी पित असतात. पण या दोघांपैकी कोणते पाणी जास्त फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया तज्ञांकडून.

जिऱ्याचे की ओव्याचे पाणी रिकाम्यापोटी पिणे आहे अधिक फायदेशीर, जाणून घ्या तज्ञांकडून
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 7:09 PM
Share

आजकाल बरेच लोकं त्यांच्या आरोग्याबद्दल पूर्वीपेक्षा जास्त सतर्क झाले आहेत. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकाना आरोग्याच्या वेगवेगळया समस्यांना समोरे जात आहे. यासाठी बहुतेक लोकं चांगल्या आरोग्यासाठी खाण्याच्या सवयी सुधारणे, सकाळी लवकर उठणे , योगा करणे आणि घरगुती उपायांचा अवलंब करणे हे आता निरोगी जीवनशैलीचा एक भाग बनले आहे. विशेषतः पोटाशी संबंधित समस्या, जसे की गॅस, अ‍ॅसिडिटी, अपचन आणि पोट फुगणे सामान्य झाले आहेत. त्यामुळे लोकं औषधांऐवजी घरगुती उपचारांना महत्त्व देऊ लागले आहेत.

या घरगुती उपायांमध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेली दोन नावे म्हणजे जिऱ्याचे पाणी आणि ओव्याचे पाणी. तसेच जिरा व ओवा हे दोन्हीही वर्षानुवर्षे पारंपारिक भारतीय स्वयंपाकघरात वापरले जात आहेत आणि आयुर्वेदातही ते पोटासाठी फायदेशीर मानले जातात. बरेच लोकं सकाळी रिकाम्या पोटी जिऱ्याचे व ओव्याचे पाणी पितात, परंतु प्रश्न असा आहे की या दोघांपैकी कोणते पाणी पोटांसाठी व आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे? जर तुम्हीही अशाच दुविधेत असाल तर आजच्या या लेखात आपण तज्ञांकडून हा गोंधळ दुर करूयात…

तज्ञांचे मत

आपल्या निरोगी आरोग्यासाठी आपण रोज सकाळी जर रिकाम्या पोटी जिऱ्याचे व ओव्याचे पाणी पिणे फायदेशीर आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर आयुर्वेद तज्ज्ञ किरण गुप्ता यांनी सांगितले की जिरे आणि ओव्याचे पाणी दोन्ही फायदेशीर आहेत. परंतु त्यांचा परिणाम ऋतू आणि आरोग्याच्या गरजेनुसार केला पाहिजे. जसे की उन्हाळ्यात ओव्याचे पाणी खूप गरजेच्या वेळीच प्यावे. उन्हाळ्यात जिरे पाणी अधिक फायदेशीर असते कारण यात थंडावा असतो आणि पोट शांत करण्यास आणि बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यासारख्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत होते.

उन्हाळ्यात जिरे पाणी पिण्याचे फायदे?

तज्ज्ञ किरण गुप्ता जी यांनी सांगितले की उन्हाळ्यात जिरे पाणी प्यायल्याने पोट थंड राहते, ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्यांपासून आराम मिळतो. जिरे पाणी प्यायल्याने पोट साफ होते. गॅस, बद्धकोष्ठता आणि आम्लपित्त या समस्या देखील कमी होतात. तसेच, रिकाम्या पोटी जिरे पाणी प्यायल्याने चयापचय गतिमान होते, ज्यामुळे फॅट बर्न होण्याची प्रक्रिया देखील वेगवान होते.

उन्हाळ्यात ओव्याचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे?

ओव्याचे पाणी देखील आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मासिक पाळीच्या दरम्यान पोटदुखीवर ओव्याचे पाणी फायदेशीर मानले जाते. परंतु उन्हाळ्यात जेव्हा खूप गरज असते तेव्हाच ते सेवन करावे. तज्ञांच्या मते, उन्हाळ्यात ओव्याचे पाणी प्यायल्याने अ‍ॅसिडिटीची समस्या वाढू शकते. त्याच वेळी जर उन्हाळा नसेल तर ओव्याचे पाणी देखील खूप फायदेशीर आहे. जसे की त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे आतडे स्वच्छ करतात आणि पोटातील हानिकारक बॅक्टेरिया मारण्यास मदत करतात. ओव्याचे पाणी फॅट बर्न करण्यासाठी मदत करते, म्हणून हे पाणी वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश
Video: सिल्लोडमध्ये गणेशोत्सवातून देशप्रेमाचा संदेश, कुलकर्णी कुटुंबाचा 150 वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचा देखावा
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल