AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘फॅट सेल’पासून मधुमेहाचा उपचार करता येतो? वाचा

तुम्हाला मधुमेह आहे का? यावर आम्ही आज तुम्हाला एक अशी माहिती सांगणार आहोत, ज्या माध्यमातून उपचार शक्य आहे. यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. चरबीच्या पेशींपासून (फॅट सेल) मधुमेहाचा उपचार शक्य आहे, वाचून आश्चर्य वाटलं ना, जाणून घ्या.

‘फॅट सेल’पासून मधुमेहाचा उपचार करता येतो? वाचा
| Edited By: | Updated on: Nov 26, 2024 | 3:59 PM
Share

तुम्ही मधुमेहाने त्रस्त असाल तर यावर आज आम्ही तुम्हाला उपचाराचा एक नवा मार्ग सांगणार आहोत. लठ्ठपणा आणि टाईप-2 मधुमेहाच्या वाढत्या घटनांमुळे जगभरातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. दरम्यान, कॅलिफोर्निया-लॉस एंजेलिस विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी चरबीच्या पेशींच्या माध्यमातून एक मोठे गूढ उलगडले आहे. हे नेमकं काय आहे, याविषयी खाली विस्ताराने वाचा.

लठ्ठपणा आणि टाईप-2 मधुमेहाच्या वाढत्या घटनांमुळे जगभरातील शास्त्रज्ञ चिंतेत आहेत. पण, आता एक नवे संशोधन समोर आले आहे. कॅलिफोर्निया-लॉस एंजेलिस विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी चरबीच्या पेशींच्या (फॅट सेल) माध्यमातून एक मोठे गूढ उलगडले आहे. तुम्ही म्हणाल आता हे कसं शक्य आहे. तर याविषयी आधी सविस्तर जाणून घ्या.

लठ्ठपणामुळे टाईप-2 मधुमेहाचा धोका कसा वाढतो आणि यामुळे उपचारांचे नवीन मार्ग कसे उघडू शकतात हे संशोधकांनी समोर आणले आहे. संशोधनानुसार, लठ्ठपणा शरीरात राइबोसोमल फॅक्टर्स नावाच्या मुख्य सेल्युलर बिल्डिंग ब्लॉक्सच्या उत्पादनात व्यत्यय आणतो. या घटकांच्या कमतरतेमुळे, चरबी स्टेम पेशी नवीन, कार्यात्मक चरबी पेशी तयार करण्यास असमर्थ असतात. थोडं समजण्यास कठीण आहे. पण, आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहोत.

टाईप-2 मधुमेहाच्या विकासात ही प्रक्रिया महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. संशोधनाचे नेतृत्व करणारे डॉ. क्लॉडिओ व्हिलानुएवा म्हणाले की, चरबीचे ऊतक अनेकदा हानिकारक मानले जाते, परंतु रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

संशोधन कसं करण्यात आलं?

नव्या औषधात लठ्ठ आणि मधुमेह असलेल्या उंदरांचा समावेश होता. या उंदरांच्या चरबीच्या पेशी दुबळ्या उंदरांपेक्षा चार ते पाच पट मोठ्या होत्या. शास्त्रज्ञांनी उंदरांना रोसिग्लिटाझोन नावाचे औषध दिले, ज्यामुळे त्यांचे राइबोसोमल घटक सामान्य पातळीवर परत आले. यामुळे त्यांच्या चरबीस्टेम पेशींना नवीन, लहान आणि चांगले कार्यात्मक चरबी पेशी तयार करण्याची परवानगी मिळाली.

या प्रक्रियेमुळे उंदरांचे चयापचय तर सुधारलंच. शिवाय टाईप-2 मधुमेह देखील दूर झाला. उंदीर लठ्ठ असले तरी त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी सामान्य झाली.

फॅट सेलची मोठी भूमिका

सेल रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासामुळे टाईप-2 मधुमेह आणि इतर जुनाट आजारांच्या उपचारात नवीन दिशा मिळू शकते. चरबीच्या पेशींची (फॅट सेल) भूमिका समजून घेतल्यास भविष्यात मधुमेहावर प्रभावी उपचार शक्य होऊ शकतात, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. आता भविष्यात यावर काय संशोधन येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा