Diwali 2023 : फटाके म्हणजे दिवाळी नाही, यंदाच्या दिवाळीत या गोष्टी करा जरूर
नागरिकांनी फटाके न फोडता दिवाळी साजरी केली पाहीजे. तर फटाके न फोडताही तुम्ही काही गोष्टांद्वारे दिवाळी साजरी करू शकता. तर आता या गोष्टी कोणत्या याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

मुंबई : दिवाळीच्या सण सुरू झाला असून त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. मग प्रत्येकाच्या घरी फराळ बनवलं जातं, घराची सजावट केली जाते, एकमेकांना गिफ्ट्स दिले जातात. तसंच बहुतेक लोक दिवाळीमध्ये मोठ्या प्रमाणात फटाके फोडून हा सण साजरा करतात. पण फटाक्यांमुळे सगळीकडे प्रदुषण होतं आणि त्यामुळे गंभीर आजार पसरतात. यामुळे नागरिकांनी जागरूकतेची भूमिका बजावली पाहिजे.
एकमेकांना घरी बोलावून भेटवस्तू द्या – फटाके न फोडताही तुम्ही तुमची दिवाळी अगदी उत्साहात साजरी करू शकता. मग तुम्ही तुमच्या घरी तुमच्या प्रियजनांना बोलावून त्यांना भेटवस्तू देऊ शकता. तसंच त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करू शकता. तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींच्या, परिवारातील सदस्यांच्या आवडत्या वस्तू घेऊ त्यांना गिफ्ट करू शकता किंवा त्यांच्या काही खास, क्रिएटिव्ह अशा वस्तू स्वत:च्या हाताने बनवू शकता. यामुळे तुमच्या नात्यातील जवळीक आणखी वाढेल आणि आपुलकी निर्माण होईल.
दिव्यांनी, रांगोळीने सजवा घर – दिवाळीमध्ये प्रत्येकजण आपल्या घराची सजावट करतो. तर तुम्ही दिवाळीमध्ये तुमचं घर दिव्यांनी सजवून हा सण साजरी करू शकता. आजकाल बाजारात विविध प्रकारचे दिवे विकले जातात. तर तुम्ही डिझाईनचे दिवे घेऊ शकता किंवा साधे दिवे घेऊन घरी त्या दिव्यांवर पेंटसह डिझाईन करून तुम्ही तुमचे घर सजवू शकता. तसंच दिव्यांसोबत तुम्ही घरासमोर रांगोळी काढून घराची शोभा आणखी वाढवू शकता.
घरच्या घरी बनवा मिठाई – दिवाळी हा सण मिठाईशिवाय अपूर्णच आहे. दिवाळी म्हटलं की लाडू, करंजी, नानकटाई, काजूकतली अशे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. तर या दिवाळीला खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरी वेगवेगळ्या प्रकारची मिठाई बनवू शकता. तसंच तुम्ही घरी पाहुण्यांना, मित्र-मैत्रिणींना या मिठाईचा आस्वाद घ्यायला बोलावू शकता.
घरी करा पार्टीचं नियोजन – तु्म्ही दिवाळी खास बनवण्यासाठी तुमच्या घरी पार्टी आयोजित करू शकता. मित्र, नातेवाईक यांना बोलावून तुम्ही छान पार्टी करू शकता. यामुळे तुम्हाला सर्वांसोबत दिवाळीचा आनंद लुटता येईल. या पार्टीमध्ये तुम्ही वेगवेगळे खेळ खेळू शकता, एकत्र पदार्थांचा