AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहा चपाती खाणं योग्य की अयोग्य? आरोग्यासाठी काय चांगलं?

चहा आणि चपाती हा भारतीयांचा आवडता नाश्ता आहे. त्यामुळे चहासोबत नाश्ता करताना चपाती खाणे अनेकांना आवडते.

चहा चपाती खाणं योग्य की अयोग्य? आरोग्यासाठी काय चांगलं?
Chaha chapatiImage Credit source: Social Media
| Updated on: Feb 27, 2023 | 1:32 PM
Share

चहा आणि चपाती हा भारतीयांचा आवडता नाश्ता आहे. त्यामुळे चहासोबत नाश्ता करताना चपाती खाणे अनेकांना आवडते. पण तुम्हाला माहित आहे का की चहासोबत चपाती खाल्ल्याने तुमच्या आरोग्याचे खूप नुकसान होऊ शकते. तसे नसेल तर आज आम्ही तुम्हाला चहा आणि चपाती हे अनहेल्दी फूड कॉम्बिनेशन का आहे हे सांगणार आहोत. याचे सेवन केल्याने तुम्हाला गॅस, ॲसिडिटी आणि शरीरात रक्ताची कमतरता यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते, तर चला जाणून घेऊया चहासोबत चपाती का खाऊ नये.

भरलेले पराठे, चपाती वगैरे जड पदार्थांसह चहाचे सेवन केल्यास तुमच्या पोटात गंभीर सूज आणि ॲसिड रिफ्लक्स होऊ शकते. कारण चहा किंवा कॉफीसोबत पराठे किंवा चपाती खाल्ल्याने तुमच्या पोटातील ॲसिड-बेस बॅलन्स खराब होऊ शकतो.

संशोधनानुसार चहामध्ये असलेले फिनोलिक केमिकल्स पोटात आयरन-कॉम्प्लेक्स तयार करण्यास उत्तेजन देतात, ज्यामुळे शरीरात लोहाचे शोषण होण्यास अडथळा येतो. त्यामुळे जेवणासोबत चहाचे सेवन करू नये, विशेषत: ज्यांना आयरन (लोह) कमतरतेमुळे अशक्तपणा आहे.

जर तुम्ही चपाती सोबत चहाचे सेवन केले तर ते आपल्या शरीरातील प्रथिने शोषून घेण्यास अडथळा आणते. चहामध्ये टॅनिन नावाचे रसायन असते, जे प्रथिनांच्या संयोगाने शरीरात अँटीन्यूट्रिएंट्स म्हणून काम करते. एका अभ्यासानुसार, टॅनिन प्रथिनांचे पचन सरासरी 38% कमी करते. चहा शरीराला पोषक द्रव्ये वापरण्यापासून रोखतो, म्हणून चहासोबत चपाती खाणे चांगले कॉम्बिनेशन मानले जात नाही.

चहाचे सेवन कसे करावे?

कोणतेही अन्न खाल्ल्यानंतर किमान 45 मिनिटांनी चहा प्यावा. नाश्ता किंवा दुपारच्या जेवणाच्या एक तासानंतर किंवा संध्याकाळी स्नॅक्ससह चहाचे सेवन करणे चांगले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.