खाल तूप तर येईल रूप… त्वचेसाठी वरदान ठरते तूप !

तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून तुम्ही ते त्वचेसाठीदेखील वापरू शकता. तुपामुळे त्वचेला अनेक फायदे मिळू शकतात.

खाल तूप तर येईल रूप... त्वचेसाठी वरदान ठरते तूप !
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 9:06 AM

नवी दिल्ली : ‘खाशील तूप तर येईल रूप’… पू्र्वी अशी एक म्हण होती. पण तूप हे केवळ आरोग्यासाठीच नाही तर आपल्या त्वचेसाठीही (benefits of ghee to health and skin) खूप फायदेशीर आहे. तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, ब्युटीरिक ॲसिड, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के सारखे पोषक घटक (nutrition) असतात. त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ही पोषक तत्त्वं खूप महत्त्वाची असतात. त्वचेसाठी तुपाचा वापर केल्याने नैसर्गिक चमक (natural glow on skin) येते. तसेच तूप हे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण करण्यास मदत करते. हे त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करण्याचे काम करते. तुपाचे सेवन करणे तसेच त्वचेसाठीही तूप वापरता येते. त्यामुळे त्वचेला कोणते फायदे होतात, ते जाणून घेऊया.

कोरडेपणा होतो दूर

हे सुद्धा वाचा

तुपामध्ये व्हिटॅमिन ए आणि ओमेगा 2 फॅटी ॲसिड असते. त्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहण्यास मदत होते. तूप त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करते. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. यामुळे त्वचेचा कोरडेपणही दूर होतो.

पिगमेंटेशन

कोलेजनचे उत्पादन वाढवण्याचे काम तूप करते. त्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. तसेच पिगमेंटेशन कमी होण्यासही मदत होते. तुपामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते. तसेच त्यामुळे चेहऱ्यावरील व त्वचेवरील डाग कमी होण्यासही मदत होते.

सुरकुत्या

देशी शुद्ध तुपामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड असते. त्यामुळे सुरकुत्यांपासून आराम मिळण्यास मदत होते. तूपताली पौष्टिक घटक हे कोलेजन पातळी वाढवण्यास मदत करतात.

चमकदार त्वचा

तुम्ही त्वचेला तुपाने मसाज करू शकता. यामुळे रक्ताभिसरणाची पातळी सुधारते. तसेच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्यास मदत होते. तुपाचे सेवन करणे व त्वचेसाठीही तुपाचा वापर केल्यामुळे त्वचा मुलायम होते.

असा करावा वापर

रात्री झोपण्यापूर्वी चेहरा साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. त्यानंतर थोडं तूप घेऊन ते हाताला चोळा आणि त्वचेवर लावा. नंतर त्वचेला हलक्या हातांनी मसाज करा. तूप त्वचेवर रात्रभर तसेच राहू द्या. यानंतर दुसऱ्या दिवशी चेहरा साध्या पाण्याने धुवा. हा उपाय तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. त्यामुळे त्वचा मुलायम राहण्यास मदत होते. हे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणण्याचे काम करते.

Non Stop LIVE Update
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा.. मी इथे संभाळतो.
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो
राज्यभरात मोदींच्या एकूण 19 जाहीर सभा अन् मुंबईत पहिलाच मेगा रोड शो.
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका
आता धर्माच्या आधारावर बजेटचे वाटप; वोटबँकवरून मोदींची काँग्रेसवर टीका.
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले
तेव्हा मला बाळासाहेब ठाकरेंची सर्वात जास्त आठवण येईल, मोदी काय म्हणाले.
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!
मुंबईकरांनो मोठी बातमी, मेट्रोने प्रवास करताय? तर ही बातमी वाचाच!.