Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्या!

वाढलेले वजन ही मोठी समस्या झाली आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे.

Weight Loss : लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्या!
वेट लॉस

मुंबई : वाढलेले वजन ही अनेकांची मोठी समस्या झाले आहे. वाढलेल्या वजनामुळे अनेक आजारांना निमंत्रण दिले जाते. आज प्रत्येकाला वजन कमी करायचे आहे. परंतु वजन कमी करण्यासाठी लोक योग्य प्रयत्न करीत नाहीत. तुम्हाला खरोखरच वाढलेले वजन कमी करायचे असेल तर आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात तूप मिक्स करून पिले पाहिजे. ज्यामुळे आपले वाढलेले वजन झटपट कमी होईल. (Mix ghee in hot water and drink it to lose weight)

शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी आपण एक ग्लास कोमट पाणी करावे आणि त्यामध्ये एक चमचा तूप मिक्स करावे. त्यानंतर चहा सारखे हे पाणी गरम असताना प्यावे. यामुळे आपले वजन कमी होण्यास फायदा होईल. मात्र हे खास पेय घेतल्यानंतर एक तास आपण दुसरे काहीही खाऊ नये. तुपामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, व्हिटॅमिन ए, बुटेरिक अॅसिड आणि निरोगी चरबी असते. याचा फायदा तुमच्या आरोग्यास होतो. यामुळे पाचक प्रणाली निरोगी राहते.

झोपेच्या वेळी एक वाटी कोमट दुधात एक-दोन चमचे तूप मिक्स करून प्या. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते. तूपात बुटेरिक अॅसिड असते, जे आतडे निरोगी ठेवण्यासाठी कार्य करते. तुपातील ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिड वजन कमी करण्यात आणि शरीराची चरबी कमी करण्यास मदत करतात. वजन कमी करण्यासाठी आणि पाचक प्रणाली निरोगी ठेवण्यासाठी आपण आपल्या आहारात एक चमचा तूप घेतले पाहिजे.

तूपात असलेले फॅटी अॅसिड हे पौष्टिक घटक म्हणून काम करतात. ज्यामुळे तुमची त्वचा चमकदार होते. तूप सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य आहे. कोमल आणि सुंदर त्वचा मिळण्यासाठी आपण तूपाचा फेस मास्क वापरू शकता. तूप खाल्ल्याने मन शांत होते आणि शरीर थंड होते. कारण तूपात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे दाह कमी करण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. यामुळे जास्तीत-जास्त तुपाचे सेवन केले पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Mix ghee in hot water and drink it to lose weight)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI