AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जीममध्ये जो नाचला तो मेला… सिक्स पॅकवालेही जीममध्ये जायला टरकतात; ‘त्या’ जीममध्ये असं काय घडतंय

Cardiac arrest : गेल्या काही महिन्यांत अशा अनेक केसेस दिसून आल्या आहेत, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीचा जिममध्ये किंवा डान्स करताना अचानक मृत्यू झाला. सामान्यतः लोकांना असं वाटतं की हार्ट ॲटॅकमुळे असं घडतं. पण डॉक्टर सांगतात की हे कार्डिॲक अरेस्टमुळे होतं. त्याबद्दल जाणून घेऊया.

जीममध्ये जो नाचला तो मेला... सिक्स पॅकवालेही जीममध्ये जायला टरकतात; 'त्या' जीममध्ये असं काय घडतंय
| Updated on: Sep 18, 2023 | 3:17 PM
Share

नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : जिममध्ये किंवा डान्स करताना एखादी व्यक्ती अचानक बेशुद्ध झाली व तिचा अचानक मृत्यू झाल्याच्या अनेक केसेस गेल्या काही महिन्यांत समोर आल्या आहेत. नुकताच गाझियाबादमध्येही असाच प्रकार समोर आला होता. जिममध्ये ट्रेडमिलवर चालणारा तरुण अचानक बेशुद्ध पडला आणि त्याचा मृत्यू झाला. यापूर्वी अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही जिममध्ये असताना मृत्यू झाला होता. या आकस्मिक मृत्यूचे कारण कार्डिॲक अरेस्ट (cardiac arrest) असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. हा हार्ट ॲटॅकपेक्षा ( heart attack) थोडं वेगळं असतं, पण हार्ट ॲटॅकपेक्षा कितीतरी पटीने जास्त धोकादायक असतं .

कार्डिॲक अरेस्टच्या 90 टक्के प्रकरणांमध्ये रुग्णालयाबाहेर रुग्णाचा मृत्यू होतो. आता ही समस्या लहान वयातील लोकांनाही जाणवत आहे. मात्र बर्‍याच प्रकरणांमध्ये, याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि ती व्यक्ती मरते. कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय, तो हार्ट ॲटॅकपेक्षा वेगळा कसा आणि त्याची लक्षणे काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

कार्डिॲक अरेस्ट म्हणजे काय ?

वरिष्ठ डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गेल्या काही वर्षांपासून कार्डिॲक अरेस्टच्या केसेस वाढल्या आहेत. कार्डिॲक अरेस्टमुळे हृदयाचे कार्य अचानक बंद पडते. त्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना रक्तपुरवठा होत नाही आणि मेंदूलाही ऑक्सीजनचा पुरवठा होत नाही. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. एखाद्याचा नाचताना किंवा जीममध्ये मृत्यू होतो, त्यांचा अशा प्रकरणांमध्ये समावेश होते.

डॉक्टर सांगतात की कार्डिॲक अरेस्टमध्ये सुरुवातीला एखाद्या व्यक्तीला छातीत अचानक तीव्र वेदना होतात. हलकासा घामही येतो. ही हार्ट ॲटॅकची लक्षणे असतात आणि काही मिनिटांतच कार्डिॲक अरेस्ट येतो. कार्डिॲक अरेस्ट आल्यास रुग्णाचा जीव वाचवणे कठीण होते. हॉस्पिटलबाहेर कार्डिॲक अरेस्ट आल्यास 100 पैकी फक्त 3 रुग्णांच्या जगण्याची शक्यता असते. अशआ परिस्थितीत, सीपीआरद्वारे रुग्ण बरा होऊ शकतो, परंतु बहुतेक लोकांना सीपीआरबद्दल माहिती नसते.

कार्डिॲक अरेस्टपूर्वी ही लक्षणे दिसू शकतात

-गॅसेस होणे

– छातीत तीव्र वेदना जाणवणे

– गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं

– शरीराच्या कार्य करण्याच्या क्षमतेमध्ये अचानक बदल, उदा – एखादं काम करताना दम लागणे

अशी लक्षणे जाणवत असतील तर वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांकडे जाउन तपासणी करणे योग्य ठरते

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.