7 हजार रुपये प्रति लिटर गाढविणीच्या दुधाची किंमत, महाग पण आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी
गाढविणीच्या दुधाला जगभरात मोठी मागणी आहे... शहरी भागात गाढविणीच्या दुधाला मोठी किंमत आहे... बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या आयटी हबमध्ये दूधाला जास्त मागणी आहे. कारण त्याचे आरोग्यास होणारे फायदे देखील फार मोठे आहेत.

म्हशीचं दूध, गायीचं दूध आणि शेळीचं दूध लहान मुलांपासून वृद्ध व्यक्ती देखील पित असतात. पण गाणविणीचं दूध देखील अनेक जण पितात आणि त्याचे आरोग्यास होणारे फायदे देखील फार मोठे आहेत. गाढविणीच्या दुधाची (Donkey Milk Price) किंमत तब्बल 7 हजार रुपये लिटर आहे… गाढवाचा वापर अनेकदा भार वाहक म्हणून केला जातो. हा प्राणी निरुपयोगी मानला जातो, मग त्याचे दूध इतके महाग का आहे? कारण त्याचे आरोग्यास होणारे फायदे फार मोठे आहेत.
गाढविणीच्या दुधाचे फायदे काय आहेत? याबद्दल नक्की जाणून घ्या.. तुम्हाला कदाचित माहित देखील नसेल की, गाढवीचं दूध सौंदर्यप्रसाधने (Donkey Milk Benefits) बनवण्यासाठी वापरलं जातं. रिपोर्ट्सनुसार, गाढवीचं दूध सौंदर्य वाढवण्यासाठी वापरलं जातं, म्हणूनच सौंदर्य उत्पादन कंपन्या या दुधाचा वापर करतात. तुम्हाला माहिती आहे का की गाढविणीच्या दुधाला जगभरात जास्त मागणी आहे? त्याची प्रति लिटर किंमत 5 ते 7 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
आजकाल, शहरी भागात, विशेषतः बेंगळुरू आणि हैदराबाद सारख्या आयटी हबमध्ये त्याचे उत्पादन वाढत आहे. गाढविणीचं दूध थेट नफ्यासाठी विकता येते, परंतु प्रक्रिया केल्यानंतर उत्पादनाची किंमत लक्षणीयरीत्या वाढते.
रिपोर्ट्सनुसार, गाढवीच्या दुधापासून बनवलेलं चीज प्रति किलो 65,000 रुपयांपर्यंत विकले जाऊ शकतं, तर त्याच्या पावडरची किंमत प्रति किलो 1 लाख रुपयांपर्यंत असू शकते. गाढवीच्या दुधाचेही अनेक फायदे आहेत. त्यात प्रथिने आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे आतड्यांमध्ये चांगल्या बॅक्टेरियाची वाढ वाढवतात, ज्यामुळे पचनाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
ज्या लोकांना लॅक्टोज असहिष्णुतेचा त्रास आहे आणि ते गाय किंवा म्हशीचे दूध पिऊ शकत नाहीत ते या प्राण्याचे दूध पिऊ शकतात. गाढवीच्या दुधात असे पोषक घटक असतात जे रक्तातील साखर, रक्ताभिसरण आणि जळजळ यासारख्या समस्यांमध्ये देखील मदत करू शकतात.
(टीप: हा लेख फक्त माहितीसाठी आहे. वरील उपचार करण्यापूर्वी, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
