रेमडेसिव्हीर जीवनरक्षक औषध नाही, उपलब्ध नसल्यास पर्याय काय? डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खास व्हिडीओ

कोव्हिड टास्क, फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर (Favipiravir) सुचवलं आहे. ते रुग्णाला तोंडावाटे द्यावं, असं अमोल कोल्हेंनी स्पष्ट केलं (Amol Kolhe Remdesivir Injection)

रेमडेसिव्हीर जीवनरक्षक औषध नाही, उपलब्ध नसल्यास पर्याय काय? डॉक्टर अमोल कोल्हे यांचा खास व्हिडीओ
रेमडेसिव्हीरला पर्याय काय, यावर डॉ. अमोल कोल्हे यांचा व्हिडीओ
Follow us
| Updated on: Apr 16, 2021 | 3:21 PM

मुंबई : कोव्हिड संकटकाळात रेमडेसिव्हीर औषध रुग्णांसाठी संजीवनी मानलं जातं. रेमडेसिव्हीर (Remdesivir Injection) हे जीवनरक्षक औषध नाही. ते उपलब्ध नसल्यास कोव्हिड टास्क फोर्सने फेव्हीपॅरावीर हे पर्यायी औषध सुचवलं आहे, ते रुग्णाला द्यावं, अशी माहिती राष्ट्रवादीचे खासदार आणि डॉक्टर अमोल कोल्हे (Dr Amol Kolhe) यांनी दिली. डॉ. कोल्हेंनी ट्विटरवर यासंबंधी व्हिडीओ शेअर केला आहे. (Dr Amol Kolhe answers what to use if Remdesivir Injection is not available for COVID Patients)

“रेमडेसिव्हीरच्या वापराबाबत कोव्हिड टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडिओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्यात एक महत्त्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिलंय, पण ते आता मिळत नाही. राज्यात अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीत काय करावे?” याकडे अमोल कोल्हेंनी लक्ष वेधलं आहे.

रेमडेसिव्हीरमुळे शरीरात विषाणूंचा भार कमी

“कोव्हिड टास्क फोर्सने हे वारंवार सांगितलं आहे की, रेमडेसिव्हीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार (व्हायरल लोड) कमी करण्यासाठी ते दिलं जातं. परंतु त्यामुळे रुग्णाचा जीव वाचतो, असं नाही. त्याचा रुग्णालयातील काळ कमी होऊ शकतो. परंतु जर ते उपलब्ध झालं नाही, तर काहीच उपलब्ध नसेल, तर कोव्हिड टास्क फोर्सने पर्यायी औषध फेव्हीपॅरावीर (Favipiravir) सुचवलं आहे. ते रुग्णाला तोंडावाटे द्यावं. ते महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासन आणि प्रशासन रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे” अशी ग्वाही अमोल कोल्हेंनी दिली.

“सातत्याने वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिव्हीरचा पुरवठा सुरळीत करण्याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत कोव्हिड टास्क फोर्सने सुचवलेली औषधे रुग्णांना देता येतील. कोव्हिडचे निदान वेळेत होणे गरजेचे आहे. ऑक्सिजन हे या काळात महत्त्वाचे औषध आहे. तसंच रेमडेसिव्हीर रुग्णांना देताना डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. यासोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरुन गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे. अवाजवी वापर टाळावा, अशी माझी नम्र विनंती आहे.” असे ट्विटही अमोल कोल्हेंनी केले आहे.

संबंधित बातम्या 

Corona : कोरोना कसा पसरतो? अमोल कोल्हेंनी कोरोनाचा गुणाकार समजावून सांगितला

(Dr Amol Kolhe answers what to use if Remdesivir Injection is not available for COVID Patients)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.