Kaju Health Benefits: रोज काजू खाल्याने आरोग्याला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे

काजू हे खूप हेल्दी आणि स्वादिष्ट असतात. तुम्ही काजूचे स्नॅक्स म्हणूनही सेवन करु शकता. काजूमध्ये खूप पौष्टिक तत्वं असतात. ते खाल्यामुळ शरीराला अनेक फायदे मिळताते.

Kaju Health Benefits: रोज काजू खाल्याने आरोग्याला मिळतील हे आश्चर्यकारक फायदे
cashew
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 1:01 PM

काजू (Cashew) हे एक हेल्दी आणि स्वादिष्ट ड्रायफ्रुट आहे. काजूचा वापर अनेक खाद्य पदार्थांमध्ये (used in food) केला जातो. काजूचा उपयोग गोड पदार्थांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. त्याच्यामुळे पदार्थांची चव आणखी वाढते. स्नॅक्सच्या रुपातही काजूचे सेवन करता येते. काजूमध्य अनेक पोषक तत्वे असतात. त्यामध्ये प्रथिने, लोह, जीवनसत्वे, पोटॅशिअम, झिंक (जस्त), फॉस्फरस, मॅग्नेशिअम आणि कॉपर मोठ्या प्रमाणात असते. काजूचा रोजच्या आहारात समावेश केल्याने शरीराला अनेक (health benefits) फायदे मिळतात. ते त्वचेसाठी, डोळ्यांच्या आरोग्यासाठी तसेच काजूच्या सेवनामुळे आरोग्याच्या तक्रारीही दूर होतात. जाणून घेऊया आहारात काजूचा समावेश करण्याचे फायदे..

वजन कमी करण्यास होते मदत –

नियमिपणे काजूचे सेवन केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. काजूमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म जलद होण्यास मदत होते. त्यामुळे चरबी कमी होते. काजू खाल्यामुळे तुम्हाला बराच काळ पोट भरल्यासारखे वाटेल. वजन कमी करण्यासाठी डाएट करत असाल, तर तुम्ही त्यामध्ये काजूचा समावेश करू शकता.

त्वचा चमकदार होते –

काजूमध्ये कॉपर आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. तसेच काजूमध्ये सेलेनिअम, झिंक (जस्त), मॅग्नेशिअम, लोह आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. या सर्व पोषक तत्वांमुळे आपली त्वचा हेल्दी राहण्यास मदत करतात. काजूमधील पोषक तत्वांमुळे त्वचेला नुकसान पोहोचवणारे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्यामुळे त्वचा तंदुरुस्त होते आणि चमकदार बनते.

डोळ्यांसाठी फायदेशीर काजू –

काजूमध्ये ल्यूटिन आणि ॲंटी-ऑक्सीडेंट गुण असतात. त्यामुळे डोळ्यांचे नुकसान होण्यापासून संरक्षण होते. काजूतील पोषक गुणधर्मांमुळे, सूर्यकिरणांमुळे डोळ्यांची जी हानी त्यापासून संरक्षण मिळत. तसेच डोळ्यांचे आरोग्य सुधारते, दृष्टी चांगली होते.

मायग्रेनचा त्रास कमी होतो –

मॅग्नेशिअमच्या कमतरतेमुळे आरोग्याच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. काजूमध्ये मॅग्नेशिअम तसेच जीवनसत्वे मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसेच काजूचे सेवन केल्यामुळे मायग्रेनच्या त्रास कमी होतो.

काजूमुळे कर्करोग रोखण्यास मदत मिळते –

काजू खाण्याचा एक उत्तम फायदा म्हणजे, त्यामुळे कर्करोगाचा (कॅन्सर) धोका कमी होण्यास मदत मिळते. काजूमध्ये प्रोएंथोसायनिडिन असते, जे शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ होण्यापासून रोखते. हे कॅन्सरपासून संरक्षण करण्याचे काम करते. हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. तुम्ही नियमितरित्या काजूचे सेवन करू शकता.

हृदय स्वस्थ ठेवण्यासाठी काजू फायदेशीर –

काजमूध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड फॅट असते. हे बॅड कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. हृदय स्वस्थ राखण्यास काजूच्या सेवनामुळे मदत मिळते.

( टीप- या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व देण्यात आलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

Non Stop LIVE Update
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.