Father’s Day: ‘फादर्स डे’ला बाबांना द्या आरोग्यदायी गिफ्ट, ‘या’ चाचण्या करा घ्या अन् घ्या जगण्याचा पुरेपुर आनंद

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Jun 19, 2022 | 6:50 PM

Father’s Day: कुठल्याही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती म्हणजे बाप असतो.. कुटुंबातील वडीलांचे छत्र हरविले तर, संपूर्ण कुटुंबच हादरते. अशावेळी पित्याने आपल्या कुटुंबाचा विचार करून स्वतःच्या आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे असते.

Father’s Day: 'फादर्स डे'ला बाबांना द्या आरोग्यदायी गिफ्ट, 'या' चाचण्या करा घ्या अन् घ्या जगण्याचा पुरेपुर आनंद

मुंबई : ठरावीक वयानंतर, आरोग्याच्या समस्या (Health problems) आपल्या सर्वांवर कमी-अधीक परिणाम करतात. या समस्यांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाच्या समस्या आणि इतर विकारांचा समावेश असतो. या आजारांनी बाधित होणे आजकाल सामान्य झाले आहे. पुरुषांनीही ठरावीक वयात आरोग्याशी संबंधित खबरदारी बाळगली (Be careful) पाहिजे, जी खूप महत्त्वाची आहे. संपूर्ण कुटुंब ज्याच्यांवर अवलंबुन असते अशा पित्याच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम प्राधान्याने पूर्ण करणे कुटुंबातील इतर सदस्यांची जबाबदारी आहे. बहुतेक पुरुषांना वयाच्या ४० व्या वर्षी आरोग्याच्या समस्या उदभवातत. यामागे अनेक कारणे असू शकतात, पण वाढते वय हे एक मोठे कारण आहे. म्हणूनच प्रत्येक पुरुषाने वयाच्या ४० व्या वर्षी आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. आजच्या या फादर्स-डे निमीत्त कुटुंबातील पित्याच्या (Of the father in the family) आरोग्याबाबत खास काळजी घेऊन, हा दिवस खास पद्धतीने साजरा करता येऊ शकतो.

अशा पद्धतीने करा फादर्स डे साजरा

लोक महागड्या भेटवस्तू किंवा पार्टी करून फादर्स डे साजरा करतात, परंतु तुम्ही या अनोख्या पद्धतीने या दिवसाचे महत्त्व वाढवू शकता. पित्याची सावली हेच जगातील सर्वात सुरक्षित छत्र आहे, पण ही सावली सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. यंदाच्या फादर्स डे निमीत्त तुम्ही अशाच काही वैद्यकीय चाचण्या बाबत माहिती करून घ्या, ज्या तुमच्या वडिलांच्या वाढत्या वयाबरोबर येणाऱया आरोग्य समस्या कमी करण्यासाठी आवश्यक आहे.

रक्तातील साखरेची चाचणी

आजकाल मधुमेहाचा त्रास होणं सामान्य झालं आहे. या आजाराने वृद्धांनाच नव्हे तर लहान मुलांनाही ग्रासले आहे. तुमचे वडील बर्‍याचदा तणावाखाली असतात आणि त्यांची दिनचर्या देखील विस्कळीत असते, त्यामुळे त्यांची रक्तातील साखरेची तपासणी नियमितपणे करत रहायला हवे. मधुमेहासारख्या आजाराचे निदान खूप उशिरा होते, त्यामुळे मधुन मधुन ब्लड शुगर लेव्हल तपासणे खूप गरजेचे आहे. तसेच वडिलांना मधुमेहानुसार आहार पाळण्यास सांगा.

हे सुद्धा वाचा

उच्च रक्तदाब

आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या चाळीशी नंतर अनेक लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू लागते. यामागे ताणतणाव, आहार आणि वृद्धत्व ही महत्त्वाची कारणे आहेत. जर एखाद्याला हाय बीपीचा त्रास होऊ लागला तर त्याला बराच काळ औषध घ्यावे लागते. उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका, किडनी खराब होण्याचा धोका असतो. हा एक सायलेंट किलर रोग आहे, ज्याकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे. तुमच्या वडिलांची उच्च रक्तदाबाची चाचणी करा.

थायरॉईड

जर एखाद्या व्यक्तीला थायरॉईड सारखी आरोग्य समस्या असेल तर या स्थितीत त्याचे वजन वाढते किंवा वजन कमी होऊ लागते. थायरॉईडमुळे शरीरात अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यासाठी TSH नावाची एक चाचणी आहे, जी वयाच्या ४० व्या वर्षी प्रत्येक व्यक्तीने मग ती स्त्री असो वा पुरुष, केलीच पाहिजे. यंदाच्या या फादर्स डेला तुम्ही तुमच्या वडिलांच्या तब्येतीची काळजी घेऊन तुम्ही त्यांना खास आरोग्यमंत्र देऊ शकता.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI