AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगी वयात येताना…’त्या’ 4 दिवसांबद्दल लेकीला समजावून सांगा काही फॅक्ट्स; होणार नाही जास्त त्रास !

Menstruation Facts : मासिक पाळीबद्दल अजूनही आपल्याकडे मोकळपणाने बोललं जात नाही. त्यामुळे अनेक गैरसमज कायम आहेत. ते कोणते याबद्दल जाणून घेऊया.

मुलगी वयात येताना...'त्या' 4 दिवसांबद्दल लेकीला समजावून सांगा काही फॅक्ट्स; होणार नाही जास्त त्रास !
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 08, 2023 | 1:37 PM
Share

नवी दिल्ली : मासिक पाळी (Menstruation)ही महिलांसाठी एक सामान्य नैसर्गिक प्रक्रिया आहे. असे असूनही, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही, बहुतेक लोक याबद्दल उघडपणे बोलण्यास टाळतात. इतकेच नाही तर पिरियड फॅक्ट्सबद्दल (Period facts) फक्त कुजबुजत बोलले जाते. दुसरीकडे, सामान्यतः वयात येणाऱ्या मुलींना (girls should know these facts) मासिक पाळीबद्दल फक्त तिच्या आई किंवा मैत्रिणीकडूनच कळते, पण त्यांच्याकडेही अनेक प्रश्नांची उत्तरे नसतात. चला तर मग, मासिक पाळीशी संबंधित अशा 6 गोष्टी जाणून घेऊया ज्याबद्दल उघडपणे बोलले जात नाही. त्या जाणून घेतल्यानंतर मुलींना मासिक पाळीदरम्यान आणि लग्नानंतरही जास्त त्रास सहन करावा लागणार नाही.

मासिक पाळी आल्यावर डोक्यावरून नाहण्यास काही प्रॉब्लेम नाही

अनेक मुलींच्या मनात असा प्रश्न असतो की मासिक पाळीच्या वेळी महिलांनी केस धुवावेत आणि आंघोळ करावी की नाही? पीरियड्सच्‍या काळात आंघोळ करण्‍यास किंवा डोके धुण्‍यास कोणतीही अडचण येत नाही. सामान्यत: या काळात गरम पाण्याने आंघोळ केल्‍याने पीरियड क्रॅम्‍समध्‍ये आराम मिळतो.

पोहोण्यासही काहीच हरकत नाही

अनेक लोकांना असंही वाटतं की मासिक पाळीच्या काळात पोहणे शक्य नाही. पण असं काही नाही. मासिक पाळी दरम्यान पोहणे पूर्णपणे सुरक्षित आहे. परंतु यावेळी, टॅम्पॉन्सचा अवश्य वापर करावा. जेणेकरून तुमच्या शरीरातून रक्त बाहेर पडणार नाही आणि तलावातील पाणी दूषित होणार नाही.

मासिक पाळी आलेली असताना व्यायाम करणेही सुरक्षित

मासिक पाळीच्या काळात जेव्हा एखादी महिला व्यायाम करते तेव्हा तिला असे करण्यापासून रोखले जाते. पण हे योग्य नाही, मासिक पाळीदरम्यान व्यायाम करणे सुरक्षित आणि आरोग्यदायी असते. नियमित व्‍यायाम केल्‍याने देखील पेटके अर्थात क्रॅम्प्सचा त्रास दूर होण्‍यास मदत होते.

शारीरिक संबंध ठेवावेत की नाहीत ?

काही लोकांचा असा विश्वास असतो, की मासिक पाळी दरम्यान शारीरिक संबंध ठेवल्यास त्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला हानी पोहोचू शकते. त्यामुळे या काळात शारीरिक संबंध टाळले पाहिजेत, असे म्हटले जाते. खरं सांगायचं तर पाळीच्या काळात शारीरिक संबंध ठेवणे हानिकारक नाही, पण ते त्या स्त्रीच्या निर्णयावर अवलंबून असले पाहिजे. तसेच महिलांनी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

प्रेग्नंट होऊ शकता

मासिक पाळी दरम्यान गर्भवती होणे शक्य आहे. गर्भवती होण्यासाठी, तुम्हाला ओव्ह्युलेट करावे लागेल, जे सामान्यतः तुमच्या मासिक पाळीच्या नंतर होते, परंतु हे केवळ तेव्हाच शक्य आहे जोपर्यंत तुम्ही किंवा तुमचा जोडीदार गर्भनिरोधक गोळी किंवा IUD वापरत नाही.

मुली अथवा स्त्रिया टॅम्पॉनचा वापर करू शकतात

मासिक पाळी दरम्यान कुमारी मुलींनी टॅम्पॉन्स वापरणे कोणत्याही प्रकारे हानिकारक नाही. यामुळे हायमेन तुटत नाही आणि मुलीचे कौमार्य गमावण्याचा धोका नसतो. परंतु टॅम्पॉन वापरण्यापूर्वी ते वापरण्याची योग्य पद्धत जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

काही लोकांचा असा विश्वास आहे की ज्या स्त्रिया खूप वेळ एकत्र घालवतात त्यांची मासिक पाळी एकाच वेळी असते. 1970 मध्ये या संदर्भात केलेल्या संशोधनानुसार, हे शरीरातील फेरोमोन्स नावाच्या रसायनांमुळे होते. तर नंतर केलेल्या संशोधनात याचे उत्तर अद्याप समोर आलेले नाही.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.