AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोप येत नसेल तर तुमच्या आहारात ‘या’ पाच पेयांचा करा समावेश

तुम्हालाही रात्रीच्या वेळी नीट झोप येत नाही का? ज्यामुळे दुसरा दिवसही चांगला जात नाही आणि नंतर तुम्हाला मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. तर या समस्यापासून आराम मिळावा यासाठी रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हे आरोग्यदायी पेये पिऊ शकता ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप येईल.

रात्री झोप येत नसेल तर तुमच्या आहारात 'या' पाच पेयांचा करा समावेश
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Jun 17, 2025 | 1:48 PM
Share

आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात अयोग्य खाण्या-पिण्याच्या सवयी, वेळेवर आहार न घेणे, रात्रभर मोबाईल लॅपटॉप पाहत राहणे, या सर्व बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना रात्री झोप न येण्याची समस्या सतावत असते, हे बहुतेकदा तणावामुळे असते. याचे आणखी एक कारण कामाचा ताण असू शकते, ज्यामुळे तुम्ही दिवसभर कामाबद्दल विचार करत राहता, जे तुमच्या झोपेचे शत्रू बनते. ज्यामुळे आपला मेंदू नीट काम करत नाही आणि आपल्याला कोणतेही काम करण्याची इच्छा होत नाही.

झोपेच्या कमतरतेमुळेही अनेक आरोग्य समस्या उद्भवतात, म्हणून या सर्व गोष्टी टाळण्यासाठी, तुमची दिनचर्या बदलण्यासोबतच, तुम्हाला तुमच्या आहारात काही आरोग्यदायी पेये समाविष्ट करावी लागतील. चला तर मग जाणून घेऊया की कोणते पेये आहाराचा भाग बनवावेत.

रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी आहारात ‘हे’ 5 आरोग्यदायी पेये

हळदीचे दूध फायदेशीर आहे

आपल्या सर्वांनाच माहित आहे की हळदीमध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. हळदीचा वापर हा रोज स्वयंपाक घरात भाज्या तसेच काही पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. हेल्थलाइननुसार, हळदीमध्ये करक्यूमिन नावाचा घटक असतो, ज्यामुळे यांचे सेवन आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. हेल्थलाइननुसार, गरम दुधात ट्रिप्टोफॅन असते, जे एक अमीनो आम्ल आहे जे सेरोटोनिनमध्ये बदलते जे मनाला आराम देते आणि शरीरातील ताण कमी करते. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी हळदीचे दुध प्यावे जेणे करून झोप लवकर येईल.

बदाम दुधाचे फायदे

बदामाच्या दुधात अनेक पोषक घटक असतात जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतात. हेल्थलाइनच्या मते, गरम दुधात ट्रिप्टोफॅन नावाचे अमिनो आम्ल असते, तर बदामामध्ये मॅग्नेशियम भरपूर असते, म्हणूनच तुम्ही नियमितपणे बदाम दुध प्यायलेत तर ते झोपेची कमतरता भरून काढते. हेल्थलाइनच्या मते, मॅग्नेशियम हे निद्रानाशाच्या समस्येपासून आराम देते.

केळी आणि बदाम स्मूदी

हेल्थलाइनच्या मते, केळीमध्ये मॅग्नेशियम, ट्रिप्टोफॅन आणि मेलाटोनिन भरपूर प्रमाणात असते, म्हणूनच यांचे सेवन निद्रानाशातून आराम देते. तर बदामांमध्ये मॅग्नेशियम भरपूर असते, जे निद्रानाशाची समस्या कमी करण्यास मदत करते. तर केळी आणि बदाम यांचे स्मूदी बनवण्यासाठी, केळीचे तुकडे करा, नंतर त्यात बदाम आणि दूध ब्लेंडरमध्ये मिक्स करा. त्यानंतर स्मूदी एका ग्लासमध्ये ओता आणि त्यात बर्फाचे तुकडे टाकून प्या.

कॅमोमाइल चहाचे अनेक फायदे 

कॅमोमाइल हे एक प्रकारचे फूल आहे जे पाण्यात उकळले जाते व त्यांचा चहा बनवला जातो. हेल्थलाइननुसार 2024 मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की कॅमोमाइल हे फुल झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी फायदेशीर आहे.

अश्वगंधा चहा प्रभावी 

अश्वगंधा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ज्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. हेल्थलाइननुसार, 2021 मध्ये केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की अश्वगंधा सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. अश्वगंधाचा चहा बनवण्यासाठी अश्वगंधा, दालचिनी, वेलची आणि जायफळ पावडर दुधात मिक्स करून सेवन केले जाते. अश्वगंधा चहा निद्रानाशाच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाक
मी नितीन गडकरी यांना फोन केला अन् म्हणालो... तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले...
NCP शरद पवार गटातील 8 खासदारांची मोदींसोबत बैठक; रोहित पवार म्हणाले, 17 तारखेला...
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... संजय राऊतांची टीका
ठाण्याच्या टिकोजीरावांना निवडणूक आयोगाने परस्परच... बोलता बोलता संजय राऊत असं काही म्हणाले की.. विधानाची तुफान चर्चा
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट,
समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन, सत्यजित तांबे आणि पोलिसात झटापट, आंदोलक आक्रमक
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? Inside...
आदित्य ठाकरे आणि CJP पदाधिकाऱ्यांच्या भेटीत नेमकं काय घडलं? अखेर Inside स्टोरी समोर
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्..
महाराष्ट्रात खबबळ! चिमुकल्यांवर अत्याचार, 200 आक्षेपार्ह व्हिडीओ अन्...हादरवून टाकणारं प्रकरण समोर!