AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही PCOD किंवा PCOS चा त्रास आहे का? फक्त हे बदल करा, काही दिवसातच दिसेल फरक

तुम्हालाही PCOD किंवा PCOS चा त्रास आहे का? काळजी करू नका, जीवनशैलीत हे ५ सोपे बदल करून तुम्ही या समस्येवर सहज नियंत्रण मिळवू shoe शकता आणि काही दिवसांतच तुम्हाला स्वतःमध्ये सकारात्मक फरक दिसेल.

तुम्हालाही PCOD किंवा PCOS चा त्रास आहे का? फक्त हे बदल करा, काही दिवसातच दिसेल फरक
PCOD
| Updated on: May 26, 2026 | 12:51 PM
Share

आजकालच्या धावपळीच्या आणि बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये PCOD (Polycystic Ovarian Disease) आणि PCOS (Polycystic Ovary Syndrome) या समस्या झपाट्याने वाढत आहेत. वजनाचे अनियंत्रित वाढणे, चेहऱ्यावर लव येणे, केस गळणे आणि मासिक पाळी अनियमित असणे ही याची मुख्य लक्षणे असतात. अनेकदा महिला यावर महागडे उपचार करतात, पण जोपर्यंत तुम्ही तुमच्या दैनंदिन सवयींमध्ये बदल करत नाही, तोपर्यंत याचा कायमस्वरूपी फायदा होत नाही.

जर तुम्हीही या समस्येचा सामना करत असाल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यासोबतच खालील ५ सोप्या गोष्टी जर तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदलल्यात तर काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या आरोग्यात सकारात्मक फरक जाणवेल.

१. आहारात करा महत्त्वाचे बदल

PCOD/PCOS नियंत्रित ठेवण्यासाठी आहार सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. तुमच्या रोजच्या जेवणातून मैदा, साखर, जंक फूड आणि पॅक केलेले पदार्थ पूर्णपणे वजा करा. या ऐवजी फायबरयुक्त पदार्थ, ताजी फळे, हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्ये आणि सुका मेवा यांचा आहारात समावेश करा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स (Low GI) असलेले अन्न खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे हार्मोन्स संतुलित होतात.

२. रोज ३० मिनिटे व्यायाम अनिवार्य

व्यायामाचा कंटाळा करणे तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते. वजन नियंत्रित ठेवल्यास PCOS ची लक्षणे ५० टक्क्यांपर्यंत कमी होतात. यासाठी जिममध्ये जाऊन जड वजन उचलण्याचीच गरज आहे असे नाही. तुम्ही रोज सकाळी किंवा संध्याकाळी ३० मिनिटे वेगाने चालणे (Brisk Walking), सायकलिंग, पोहणे किंवा दोरीच्या उड्या मारू शकता. शारीरिक हालचालींमुळे शरीरातील इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो.

३. योगासन आणि प्राणायाम

हार्मोनल असंतुलन ठीक करण्यासाठी योगसाधना अत्यंत प्रभावी ठरते. ‘भुजंगासन’, ‘बटरफ्लाय पोझ’ (बद्धकोनासण), ‘मत्स्यासन’ आणि ‘धनुरासन’ यांसारखी आसने पेल्विक भागातील रक्ताभिसरण सुधारतात आणि अंडाशयाचे (Ovaries) कार्य सुरळीत करतात. यासोबतच मानसिक तणाव कमी करण्यासाठी रोज १० ते १५ मिनिटे अनुलोम-विलोम आणि कपालभाती प्राणायाम नक्की करा.

४. पुरेशी झोप आणि पाण्याचे प्रमाण

शरीराला डिटॉक्स करण्यासाठी आणि हार्मोन्सचे कार्य व्यवस्थित चालण्यासाठी हायड्रेशन आणि विश्रांतीची गरज असते. दिवसातून किमान ८ ते १० ग्लास (२ ते ३ लीटर) पाणी नक्की प्या. तसेच, रात्रीची ७ ते ८ तासांची शांत झोप घेणे अत्यंत आवश्यक आहे. अपुऱ्या झोपमेळे शरीरात ‘कोर्टिसोल’ नावाचा स्ट्रेस हार्मोन वाढतो, जो PCOD ची समस्या अधिक गंभीर बनवतो.

५. तणावापासून दूर राहा 

आजच्या काळात मानसिक तणाव हे हार्मोनल बिघाडाचे सर्वात मोठे कारण आहे. ऑफिसचे काम किंवा घरच्या जबाबदाऱ्यांमुळे येणारा ताण तुमच्या मासिक पाळीवर थेट परिणाम करतो. तणाव कमी करण्यासाठी तुमच्या आवडीचे छंद जोपासा, संगीत ऐका. तसेच निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा किंवा ध्यान (Meditation) करा. मन शांत राहिलं तर शरीरही लवकर रिकव्हर होईल.

दरम्यान PCOD किंवा PCOS हा कोणताही गंभीर आजार नसून जीवनशैलीशी निगडित विकार आहे, जो योग्य शिस्तीने पूर्णपणे नियंत्रणात आणला जाऊ शकतो. परंतु, कोणतेही मोठे बदल करण्यापूर्वी किंवा घरगुती उपाय सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञ आहारतज्ज्ञांचा (Dietitian) सल्ला नक्की घ्या.

Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक