AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसूतीनंतरच्या वेदनांसाठी औषध घेण्यापूर्वी ‘या’ घरगुती उपायांचा करा अवलंब; जाणून घ्या, प्रसूतीनंतर ‘पेरीनियल वेदनां’ ची कारणे, लक्षणे आणि उपचार!

अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्सच्या अभ्यासानुसार, नार्मल डिलीव्हरी झालेल्या 53 ते 79 टक्के महिलांना प्रसूतीनंतर वेदना (Postpartum pain) होतात. महिलांना वेदनांशिवाय इतर कोणतीही गुंतागुंत नसते. प्रसूतीनंतर पेरिनियममध्ये वेदना आणि अस्वस्थता याला प्रसूतिपश्चात ‘पेरिनल वेदना’ म्हणतात. योनि आणि गुदद्वारातील नाजूक भागाला पेरिनियम म्हणतात. सामान्य प्रसूतीदरम्यान, बहुतेक स्त्रियांना पेरिनियमच्या भागावर (On the part of the perineum) दाब आणि […]

प्रसूतीनंतरच्या वेदनांसाठी औषध घेण्यापूर्वी ‘या’ घरगुती उपायांचा करा अवलंब; जाणून घ्या, प्रसूतीनंतर ‘पेरीनियल वेदनां’ ची कारणे, लक्षणे आणि उपचार!
कोपरगावात भगर खाल्याने 21 जणांना झाली विषबाधा
| Updated on: Jul 05, 2022 | 2:20 PM
Share

अमेरिकन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्सच्या अभ्यासानुसार, नार्मल डिलीव्हरी झालेल्या 53 ते 79 टक्के महिलांना प्रसूतीनंतर वेदना (Postpartum pain) होतात. महिलांना वेदनांशिवाय इतर कोणतीही गुंतागुंत नसते. प्रसूतीनंतर पेरिनियममध्ये वेदना आणि अस्वस्थता याला प्रसूतिपश्चात ‘पेरिनल वेदना’ म्हणतात. योनि आणि गुदद्वारातील नाजूक भागाला पेरिनियम म्हणतात. सामान्य प्रसूतीदरम्यान, बहुतेक स्त्रियांना पेरिनियमच्या भागावर (On the part of the perineum) दाब आणि स्ट्रेचिंग असते. जेव्हा बाळाचे डोके योनिमार्गातून बाहेर येते तेव्हा डॉक्टर पेरिनियम मध्ये एक लहान कट करतात जेणेकरून बाळाचे डोके आरामात बाहेर येऊ शकेल. या शस्त्रक्रियेला ‘एपिसिओटॉमी’ (Episiotomy) म्हणतात. नंतर या कट वर टाके टाकले जातात, पण बरे होईपर्यंत या भागात दुखत असते. या वेदनेसाठी पेनकीलर घेण्यापेक्षा काही घरगुती उपायांनी तुम्ही प्रसूतीनंतर पेरिनियमचे दुखणे कमी करू शकता.

  1. पेरिनियम क्षेत्र नेहमी स्वच्छ ठेवा- बॅक्टेरियाचा संसर्ग टाळण्यासाठी पेरिनियम क्षेत्र नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. ही जागा कोमट पाण्याने स्वच्छ करून कोरडी करावी जेणेकरून जंतुसंसर्ग वाढणार नाहीत. प्रत्येक वेळी एकदा सॅनिटरी पॅड बदला.
  2. कोमट पाण्याने करा अंघोळ- एक टब कोमट पाण्याने भरा आणि त्यात 20 मिनिटे बसा. पेरिनियमचा भाग त्यात पूर्ण बुडायला हवा. हे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा करू शकता. तुम्ही सिट्झ बाथ देखील घेऊ शकता.
  3. बर्फाचा शेक- फिल्टर केलेल्या पाण्यापासून बनवलेल्या बर्फाने हा भाग दाबल्यास वेदना कमी होऊ शकते. यामुळे जखमही लवकर भरून येते.
  4. योग्य आराम- प्रसूतीनंतर शरीराच्या खालच्या भागावर कोणताही दबाव टाकू नका. जास्त वेळ उभे राहणे टाळा. उजव्या कुशीवर झोपा जेणेकरून पेरिनियमवर जास्त दबाव येणार नाही.
  5. उबदार शेक घ्या- यामुळे या भागातील स्नायू मजबूत होतात आणि रक्त प्रवाह सुधारतो. वेदना कमी करण्यासाठी आपण गरम-उबदार शेक देखील देऊ शकता. याशिवाय सैल आणि सुती अंतर्वस्त्रे घाला. जेणे करून जखम लवकर भरण्यास मदत होते.
  6. मूत्रमार्गात असंयम- बाळंतपणामुळे पेल्विक स्नायू कमकुवत होतात, त्यामुळे मूत्रमार्गात असंयम जाणवतो. नॉर्मल प्रसूती झाल्यास हे सामान्य आहे विशेषतः फोर्सेप किंवा इतर गोष्टींच्या हस्तक्षेपासह प्रसूती झाल्यास शक्यता जास्त असते. अशा वेळी घाबरून न जाता या भागाला कोमट पाण्याने स्वच्छ करा.
  7. हायड्रेटेड रहा- थकवा घालवणासाठी जास्त प्रमाणात द्रव पदार्थ घ्या. बद्धकोष्ठता टाळण्यासाठी भरपूर पाणी पिणे देखील आवश्यक आहे. तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असलेले अन्न घ्या आणि भरपूर पाणी प्या.
  8. नियमित व्यायाम करा- व्यायाम करण्यासाठी थोडा वेळ काढा. एकदा तरी घराबाहेर पडा आणि चालण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या स्नायूंना मजबूत बनवा.
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.