feet swelling during pregnancy : पाय झालेत भारी ? गरोदरपणात महिलांचे पाय का सुजतात ?

गरोदरपणात पायाला सूज आल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशी परिस्थिती टाळण्यासाठी या 6 गोष्टींची विशेष काळजी घ्या.

feet swelling during pregnancy : पाय झालेत भारी ? गरोदरपणात महिलांचे पाय का सुजतात  ?
Image Credit source: Freepik
Follow us
| Updated on: Mar 09, 2023 | 2:03 PM

नवी दिल्ली : ‘पाय भारी होणे’ ही म्हण तर तुम्ही ऐकली असेलच. साधरणत: भारतात या म्हणीचा प्रयोग एखाद्या महिलेच्या गरोदरपणाची (pregnancy) माहिती देण्यासाठी केला जातो. गरोदरपणात बहुतांश महिलांच्या पायांना सूज (swelling feet during pregnancy) येते. त्यामुळे अनेक असुविधांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांचे पाय चप्पलमध्ये बसत नाहीत. यासोबतच चालणे आणि कोणतेही काम करताना त्रास होतो. ही समस्या तुम्हाला छोटी वाटू शकते, पण यामुळे महिलांना खूपच अस्वस्थ (difficulty) वाटते.

पाय सुजण्याची कारणे आणि ते टाळण्याचे उपाय तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

हे सुद्धा वाचा

गरोदरपणात पाय सुजण्याचे कारण काय ?

या समस्येसाठी एडेमा (Edema) ही वैद्यकीय संज्ञा आहे. 4 पैकी 3 गर्भवती महिलांवर याचा परिणाम होतो. हे सहसा गर्भधारणेच्या दुसऱ्या तिमाहीत सुरू होते. काळाच्या ओघात ही समस्या वाढत जाते. साधारणपणे उन्हाळ्यात महिलांना हा त्रास जास्त होतो. यासोबतच तुमचे वजन जास्त असेल किंवा तुम्ही जुळ्या मुलांना जन्म देणार असाल तर एडेमा होण्याची शक्यता वाढते.

गर्भधारणेमुळे शरीरातील हार्मोनल बदल होतात व त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी वाढू लागते. अशा परिस्थितीत, अतिरिक्त पाणी बाळाकडे, प्लेसेंटा, अम्नीओटिक द्रवपदार्थ आणि मातेच्या रक्ताकडे जाऊ लागते. अशा परिस्थितीत, गर्भाशय ओटीपोटाच्या शिरा (pelvic vein)आणि व्हेना कावावर (vena cava) दबाव टाकू लागतो. व्हेना कावा ही एक लांब मज्जातंतू आहे जी पाठीच्या उजव्या बाजूला असते. ती पायातून रक्त परत हृदयाकडे आणण्याचे काम करते. अशा स्थितीत गर्भाशयाच्या दाबामुळे पायातून हृदयापर्यंत रक्त नीट पोहोचू शकत नाही आणि पायांमध्ये द्रव साचू लागतो. ज्याच्यामुळे पायांना त्रास होऊ शकतो.

सूज कमी करण्याचे उपाय

1) पायांची हालचाल सुरू ठेवा

गरोदरपणात पायांना सूज येण्यापासून रोखण्यासाठी दररोज काही काळ पाय उंचावर ठेवा. बसताना पायाखाली दोन ते तीन उशा ठेवा, जर तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर तुमचे पाय बेडवर सरळ ठेवता येतील. यासोबतच झोपूनही तुम्ही तुमचे घोटे गोलाकार हालचालीत हलवू शकता. पायाची हालचाल कायम ठेवा.

2) सोडिअमचे सेवन कमी करा

गरोदरपणात पायांची सूज टाळण्यासाठी, सोडियमचे कमीत कमी प्रमाणात सेवन करा. मीठ तुमच्या शरीराची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. म्हणून, कॅनमधील, डबाबंद असलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न पूर्णपणे टाळा. तसेच कोशिंबीर, दही, रायता या खाद्यपदार्थांमध्ये चुकूनही टेबल सॉल्ट घालू नका. आणि लोणचे, चटणी, जास्त खारवलेले अन्न जसे की फिंगर चिप्स आणि रस्त्यावरचे पदार्थ पूर्णपणे टाळा.

3) चालणे

चालणे हा गरोदरपणात सर्वात सुरक्षित व्यायाम मानला जातो. हे रक्ताभिसरण सुधारते आणि सूज कमी करण्यास उपयुक्त आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, गरोदर स्त्रीने दररोज कमीत कमी 15 मिनिटे चालले पाहिजे.

4) फीट मसाज ठरेल उपयुक्त

जर गर्भधारणेदरम्यान तुमचे पाय सुजले असतील तर मसाज तेलाने तुमच्या पायाला मसाज केल्याने आराम मिळेल कारण त्यामुळे रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे सूज कमी होते आणि दुखण्यापासून आराम मिळणे सोपे होते.

5) कॅफेनचे सेवन कमी करा

गरोदरपणात अधूनमधून मर्यादित प्रमाणात कॅफिनचे सेवन केल्याने आरोग्याला हानी पोहोचत नाही, परंतु कॅफीनचे जास्त सेवन केल्याने गर्भधारणेदरम्यान तुम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यापैकी एक म्हणजे एडेमाची समस्या. कॅफिन तुम्हाला जास्त वेळा बाथरूममध्ये जाण्यास प्रवृत्त करते. अशा स्थितीत तुमचे शरीर लघवी रोखून ठेवण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे पायांची सूज वाढू शकते.

Non Stop LIVE Update
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.