या ५ लोकांनी ‘धने घातलेले पाणी’ अजिबात पिऊ नये, अन्यथा होतील दुष्परिणाम !

धन्याचे पाणी आयुर्वेदात डिटॉक्स ड्रिंक म्हणून ओळखले जाते आणि ते पचन सुधारण्यासाठी, रक्तदाब व ब्लड शुगर नियंत्रणासाठी उपयुक्त ठरते. मात्र, हे प्रत्येकासाठी सुरक्षित असेलच असे नाही. चला जाणून घेऊ कोणी हे पाणी पिणे योग्य आहे आणि कोणी नाही.

या ५ लोकांनी ‘धने घातलेले पाणी’ अजिबात पिऊ नये, अन्यथा होतील दुष्परिणाम !
| Edited By: | Updated on: May 03, 2025 | 4:04 PM

आयुर्वेदामध्ये इतर घटकांसोबतच धन्याचे पाणी ही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. पचन क्रिया सुधारण्यापासून ते रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यापर्यंत याचे अनेक फायदे सांगितले जातात. त्यामुळे अनेक लोक दररोज उपवासाच्या दिवशी किंवा सकाळच्या वेळेस हे ‘डिटॉक्स ड्रिंक’ म्हणून घेतात. मात्र, तज्ज्ञांच्या मते हे पाणी सर्वांसाठी योग्य नाही. काही खास परिस्थितीत याचे सेवन शरीराला हानिकारक ठरू शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या व्यक्तींनी धन्याचे पाणी पिणे टाळावे:

१. लो ब्लड प्रेशर असणार्‍यांनी राहावे सावध

धना रक्तदाब कमी करण्याचे काम करतो. त्यामुळे ज्यांना आगीपासूनच लो बीपीची समस्या आहे, त्यांनी हे पाणी पिणे टाळावे. अन्यथा चक्कर येणे, थकवा आणि बेशुद्ध होण्याचा धोका वाढतो.

२. एलर्जी असणार्‍यांसाठी धोका

धना काही लोकांना ऍलर्जीक असतो. त्वचेवर रॅशेस, सूज, खाज येणे यासारखे त्रास होऊ शकतात. जर तुम्हाला हर्ब्स किंवा मसाल्यांपासून एलर्जीची तक्रार असेल, तर धन्याचे पाणी घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

३. गर्भवती महिलांनी घ्यावी विशेष काळजी

धन्यामध्ये गर्भाशय संकोचन करणारे घटक असतात. विशेषतः गर्भधारणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात धन्याचे पाणी टाळावे. अधिक प्रमाणात घेतल्यास गर्भासाठी धोका निर्माण होऊ शकतो.

४. मधुमेहावर औषध घेत असाल तर विचार करा

धना ब्लड शुगर कमी करतो, परंतु जर तुम्ही मधुमेहाची औषधे घेत असाल आणि त्यासोबत धन्याचे पाणी घेतले, तर साखरेची पातळी खूपच खाली जाऊ शकते. अशा स्थितीत डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.

५. किडनीच्या रुग्णांनीही टाळा हे पाणी

मूत्रपिंडाशी संबंधित समस्या असणार्‍यांनी धन्याचे पाणी घेणे टाळावे. कारण त्याचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो, आणि आधीच असलेल्या समस्यांमध्ये वाढ होण्याचा धोका असतो.

तज्ज्ञांचे मत

डिटॉक्स ड्रिंक म्हणून धन्याचे पाणी किती फायदेशीर आहे हे मान्य करताना तज्ज्ञ सांगतात की, प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणतीही आयुर्वेदिक गोष्टही वैद्यकीय सल्ल्याविना घेणे टाळावे.