Health : तुमच्या किचनमधील पाच गोष्टी म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजचं मूळ, आताच फेकून द्या बाहेर

स्वयंपाक घरातील या गोष्टींचे सेवन केल्याने त्याचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे या गोष्टी स्वयंपाक घरातून तातडीने फेकून द्या. तर या गोष्टी नेमक्या आहेत तरी काय याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

Health : तुमच्या किचनमधील पाच गोष्टी म्हणजे कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजचं मूळ, आताच फेकून द्या बाहेर
Follow us
| Updated on: Dec 11, 2023 | 9:31 PM

मुंबई : सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांना अनेक गंभीर आजार होताना दिसतात. बदलती जीवनशैली, अनहेल्दी फूड अशा अनेक गोष्टींमुळे लोकांना गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. त्यात आजकाल लोक मोठ्या अनहेल्दी फुड खातात. सोबतच तुम्हाला माहितीये का की, आपल्या स्वयंपाक घरातील काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार यासारखे गंभीर आजार निर्माण होतात.

मीठ – पांढऱ्या मिठाचा वापर आपण स्वयंपाक घरात जास्त प्रमाणात करतो. हे मीठ दुसर्‍या मिठापेक्षा स्वस्त देखील असते. तसंच पांढरं मीठ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. तसंच हृदयासाठी देखील हानिकारक ठरते. त्यामुळे आत्ताच तुमच्या घरातून पांढऱ्या मिठाला काढून टाका आणि या मिठाऐवजी  तुम्ही काळं मीठ, पिंक रॉक सॉल्टचा वापर करू शकता.

रिफाइंड ऑइल- बहुतेक लोक त्यांच्या स्वयंपाक घरात रिफंड ऑइल चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण रिफाइंड ऑइल हे आपल्या शरीरासाठी घातक ठरते. या तेलाचे सेवन केल्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढते तसेच हृदयविकाराचा धोका देखील वाढतो. त्यामुळे हे तेल खाणं बंद करा. या तेलाऐवजी तुम्ही मोहरीचे तेल, ऑलिव्ह ऑइल, खोबरेल तेल किंवा देशी तुपाचा वापर करा.

साखर – बहुतेक लोक साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण साखर ही देखील तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरते. साखरेमुळे मधुमेह, हाय बीपी किंवा अन्य गंभीर आजार निर्माण होतात. त्यामुळे साखरेचा वापर जास्त प्रमाण करू नका. त्याऐवजी तुम्ही गुळाचा वापर करू शकता.

पॅक बंद ज्यूस, कोल्ड्रिंक्स- काही लोक असे असतात जे त्यांच्या आहारात पॅक बंद ज्यूस किंवा कोल्ड्रिंक चा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण हे पॅक बंद ज्यूस, कोल्ड्रिंक्स त्यांच्या शरीरासाठी घातक ठरतात. कारण यामध्ये शुगर आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी घातक ठरते. तर या जागी तुम्ही ताज्या फळांचा ज्यूस करून घेऊ शकता.

पॅक बंद पीठ – बहुतेक लोक बाजारातून पॅक बंद असलेले पीठ घेऊन येतात. पण हे पीठ तुमच्या शरीरासाठी हानिकारक ठरते. हे पीठ मैदा इतकेच तुमच्या शरीरासाठी धोकादायक असते. त्यामुळे कधीही विकत पीठ आणू नका तुम्ही बाजारातून धान्य विकत आणून ते दळून मग त्याचा तुम्ही वापर करू शकता.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.