AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cancer Risk Control: स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ खा, कर्करोग आणि कोलेस्ट्रॉल समस्या चटकन होतील गायब

लसूण खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामध्ये असलेले अ‍ॅलिसिन नावाचे संयुग कर्करोगाशी लढण्यास मदत करते. जाणून घ्या लसून खाण्याचे फायदे.

Cancer Risk Control: स्वयंपाकघरातील 'हा' पदार्थ खा, कर्करोग आणि कोलेस्ट्रॉल समस्या चटकन होतील गायब
kitchen
| Edited By: | Updated on: Apr 30, 2025 | 8:47 PM
Share

तुम्ही दररोज लसूण खात असालच. जेवणाला चविष्ट बनवण्यासोबतच, ते एकूण आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. लसणाच्या एक किंवा दोन पाकळ्या चावून खाल्ल्याने पचनसंस्था निरोगी राहतेच, शिवाय अनेक गंभीर आजारांपासून बचाव होण्यासही मदत होते. तुम्हाला माहिती आहे का की लसणात आढळणारे अ‍ॅलिसिन कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांशी लढण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकते. जेव्हा तुम्ही नियमितपणे लसूण खाता तेव्हा शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. अलिकडच्या एका संशोधनातून असे दिसून आले आहे की लसणात कर्करोगाशी लढण्यासाठी आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी औषधी गुणधर्म आहेत.

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारात लसणाचा समावेश करणे गरजेचे असते. लसूण खाल्ल्यामुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. शास्त्रज्ञ आणि संशोधकांच्या सोशल नेटवर्किंग साइट रिसर्च गेटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, लसणात अनेक बायोएक्टिव्ह ऑर्गेनोसल्फर संयुगे आढळतात, ज्यामध्ये अॅलिसिन देखील असते. अ‍ॅलिसिनमध्ये कर्करोगविरोधी उपचारात्मक गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

लसणात असलेले अ‍ॅलिसिन रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते. याचे सेवन केल्याने तुम्ही फ्लू आणि श्वसनाच्या समस्यांपासूनही दूर राहू शकता. लसूण रक्ताभिसरण वाढवते. हृदयाच्या आरोग्यास आधार देते. लसणाच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करते. -ज्यांची पचनशक्ती कमी आहे त्यांनीही लसूण खावे. लसूण खाल्ल्याने तुमची पचनशक्ती सुधारते. ते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून शरीराला विषमुक्त करते. लसणात असलेले अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म मुरुम, पुरळ आणि इतर त्वचेच्या समस्या कमी करतात. अँटीबायोटिक गुणधर्मांनी समृद्ध असलेला लसूण बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्गापासून संरक्षण करतो.

आयुर्वेदानुसार, सकाळी रिकाम्या पोटी लसूण चावल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे विषाणू, बॅक्टेरिया आणि बुरशीमुळे होणाऱ्या समस्या टाळता येतात. लसूण नाकातील घाण काढून टाकतो. श्वसन संसर्ग कमी करू शकतो. आयुर्वेदात लसूण ‘अँटी पॉवर कॅन्सर’ म्हणून ओळखले जाते. तथापि, उन्हाळ्यात लसूण मर्यादित प्रमाणात खावा कारण त्याचा स्वभाव उष्ण असतो. जास्त सेवन केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते. याचा परिणाम यकृतावर होऊ शकतो. कच्च्या लसणात अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने यकृतामध्ये विषारीपणा वाढू शकतो.

रक्तदाब नियंत्रित राहतो

लसूणमध्ये अनेक पोषक घटक असतात आणि त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. लसूण खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हृदयरोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब नियंत्रित राहतो आणि रक्त शुद्धी होते. जीवनसत्त्वे सी आणि बी 6, मँगनीज, सेलेनियम, लोह, झिंक, तांबे, कार्बोहायड्रेट, फायबर, कॅल्शियम.

लसूण जास्त खाल्ल्यास पोटात दुखणे, गॅस आणि छातीत जळजळ होऊ शकते. लसूण रक्ताला पातळ करण्याचे काम करतो. त्यामुळे शस्त्रक्रिया किंवा रक्त पातळ करणारी औषधं घेणाऱ्या व्यक्तींनी जास्त लसूण खाऊ नये. काही लोकांना लसणाने अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर लालसर रंगाचे डाग किंवा खाज येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. जास्त प्रमाणात लसूण खाणे यकृतासाठी हानिकारक ठरू शकते. लसूण खाल्ल्याने तोंडाला आणि शरीराला वास येऊ शकतो.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.