Hairloss | ‘चंद्रावर फूल उमलणार, टकल्यावर केस उगवणार!’ वैज्ञानिकांनी नेमका काय शोध लावला?

Hairloss | 'चंद्रावर फूल उमलणार, टकल्यावर केस उगवणार!' वैज्ञानिकांनी नेमका काय शोध लावला?
केस गळतीची समस्या कायमची मिटणार?

शास्त्रज्ञांनी तयार केलेलं पॅच आता केस येण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सिद्धेश सावंत

Jan 02, 2022 | 5:01 PM

तुम्ही म्हणाल चंद्रावर फूल कसं काय कोण उगवू शकेल? हे तर अशक्य आहे. बरोबरच आहे तुमचं. चंद्रावर केस उगवण्याइतकीच आणखी एक गोष्ट अनेकांना अशक्य वाटते. ती म्हणजे टकल्यावर केस उगवण्याची! फक्त राज्यात आणि देशातच नव्हे तर जगातल्या अनेकांना या प्रश्नानं ग्रासलेलं आहे. तर अशा सगळ्यांसाठी एक खूशखबर आहे.

आता टकल्यावर केस उगवू शकणार आहेत. वैज्ञानिकांनी एक जबरी शोध लावलाय. या संशोधनामुळे टक्कल असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. टक्कल असणाऱ्यांना लवकरच फणीही वापरता येईल आणि डोक्यावर उगवलेले केसही विंचरता येतील, अशी शक्यता यामुळे निर्माण झाली आहे.

नेमका हा शोध आहे तरी काय?

नेमका हा शोध समजून घेण्यासाठी एक गोष्ट समजून घ्यावी लागलेत. ही गोष्ट आहे टक्कल नेमकं पडतं का? याची. तर टक्कल पडण्याची समस्या म्हणजेच मेल पॅटर्न बाल्डनेस. (Male Pattern Baldness). सोप्या शब्दांत याला केस गळणं असंही म्हणतात. केस काय फक्त पुरुषांचे गळतात अशातला भाग नाही. महिलांनाही केसगळतीची समस्या भेडसावत असतेच. पण केस नेमके गळतात का, याचं उत्तर आधी जाणून घ्यावं लागेलत.

एंड्रोजेनिक एलोपेसिया किंवा मेल पॅटर्न बाल्डनेस म्हणजे केस गळतीची समस्या, हे तर तुम्हाला कळलं आहेत. केसांच्या मुळाशी असलेल्या रक्तवाहिन्या कमी झाल्यामुळे केस गळू लागतात. केसांच्या वाढीसाठी लागणाऱ्या पोषक घटक न पोहोचल्यामुळे केसांची वाढ खुंटते. वाढ खुंटल्यानंतर हळूहळू केस गळीतीची समस्या भेडसावू लागते.

प्रॉब्लेम कळला, सॉल्यूशन काय?

जगभरात केसगळतीच्या समस्येवर संशोधन केलं जातंय. काही वैज्ञानिकांनी केस वेगानं वाढवण्यासाठी एक प्रयोग केला. हा प्रयोग उंदरांवर करण्यात आला. आनंदाची गोष्ट म्हणजे उंदरावर करण्यात आलेला हा प्रयोग यशस्वीही झाला.

नेमकं केलं काय संशोधकांनी?

उंदरावर करण्यात आलेल्या प्रयोगात मायक्रोनीडल पॅट आणि सेरीयम नॅनोपार्टिक्लस यांचा समावेश करण्यात आला होता. या दोन घटकांमुळे केसांची खुंटलेली वाढ पुन्हा सुरु होते. पर्यायनं केसगळतीची समस्याही थांबते, असं अभ्यासातून समोर आलं. शिवाय केसांना पोषक घटक पोहोचवण्यासही या दोघांना उपयोग होतो, असाही निष्कर्ष काढण्यात आला.

एक प्रकारचं ऍसिड वापरुन विरघळणारं मायक्रोनीडल पॅच शास्त्रज्ञांनी तयार केलं. या पॅचाच विग किंवा कृत्रिम केस म्हणता येईल. यानंतर पालीथिलीन ग्लायकोल-लिपीक कपाऊंडमध्ये सिरीयम नॅनोकण गुंडाळले. प्रयोग करण्यासाठी शास्त्रज्ञांना आधी उंदराचे केस काढले आणि त्या जागेवर पॅच लावलं तर इतर उदरांवर नेहमीचं पॅच लावलं.

या प्रयोगात शास्त्रज्ञांनी तयार केलेलं विशेष पॅच लावलेल्या उंदरावर इतरांच्या तुलनेत वेगानं केस वाढल्याचं समोर आलं. शास्त्रज्ञांनी तयार केलेलं हे पॅच आता केस येण्यासाठी आणि केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.

आता पुढच्या टप्प्यात उंदरांनंतर हीच चाचणी माणसांवर केली जाईल, असं बोललं जातंय. या चाचणी यशस्वी झाल्यानंतर टक्कल असलेल्या पुरुषांनाही दिलासा मिळेल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केलाय.

इतर बातम्या –

Good diet | नव्या वर्षात आजारी पडायचं नाही, तर या सवयी लावून घ्या

Winter Skin Care | हिवाळ्यात मऊ त्वचा ठेवण्यासाठी कसा कराल मधाचा वापर?

Dry cough | कोरड्या खोकल्यादरम्यान या घरगुती उपचारांना करा ट्राय, समस्या होईल दूर!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें