तुम्हीदेखील चुकीच्या वेळी चहा पीत नाही ना ? जाणून घ्या योग्य वेळ, नाहीतर..

बहुतांश लोकांना बेड-टी प्यायला आवडतो. सकाळी उठल्याबरोबर त्यांना गरम चहा हवा असतो. पण, चहा पिण्याची देखील एक योग्य वेळ असते. ती कोणती हे जाणून घेऊया.

तुम्हीदेखील चुकीच्या वेळी चहा पीत नाही ना  ? जाणून घ्या योग्य वेळ, नाहीतर..
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 3:20 PM

Tea Perfect Time : चहा हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. अनेकजण सकाळची सुरुवात चहाने करतात तर काहींना संध्याकाळी चहा प्यायला आवडते. पण काही लोक असेही असतात, ज्यांना दिवसभर चहा पिणे (drinking tea )आवडते. सुमारे 69 टक्के भारतीय त्यांच्या दिवसाची सुरुवात दूध आणि साखरेचा चहा पिऊन करतात. पण त्यांना चहा पिण्याची योग्य वेळ कळत नाही. जर तुम्हीही चहाचे शौकीन असाल तर तुम्हाला चहा पिण्याची योग्य वेळ माहित असणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे नुकसान टाळता येईल. चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ कोणती हे जाणून घेऊया….

चहा कधी पिऊ नये ?

बहुतांश लोकांना बेड-टी प्यायला आवडतो. सकाळी उठल्या उठल्या त्यांना गरमागरम चहा प्यावासा वाटतो. पण तुम्हाला माहित आहे का, की सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा पिणे हानिकारक ठरू शकते. त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. एवढेच नाही तर रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी लही देखील खूप वाढू शकते. काही लोक रात्री चहा देखील पितात, ही देखील चुकीची वेळ मानली जाते, कारण यामुळे झोप लागण्यास त्रास होऊ शकतो.

चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ

जर तुम्हाला चहा आवडत असेल तर चहा पिण्याची सर्वोत्तम वेळ जाणून घ्या. सकाळी उठल्यानंतर दोन तासांनी किंवा नाश्ता केल्यानंतर एक तासाने चहा पिणे उत्तम. पण चहा पिण्यापूर्वी काहीतरी खाल्ले पाहिजे. यामुळे चहाचा शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी चहा पिण्याचे फायदे होऊ शकतात. सकाळी बेड टी पिणाऱ्यांनी आपली सवय बदलावी, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. कारण सकाळी लवकर चहा प्यायल्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान होउ शकते.

चहा पिण्याचे फायदे

तज्ज्ञांच्या मते, झोपण्याच्या 10 तास आधी चहा प्यायल्यास चांगली झोप येण्यास मदत होते. चहामुळे शरीरातील सूज येण्याची समस्या कमी होते. चहा कॉर्टिसॉल हार्मोन कमी करण्यास देखील मदत करतो. यामुळे नकारात्मकता आणि दुःखही कमी होते. बद्धकोष्ठता आणि तणावाची समस्या देखील चहा प्यायल्याने दूर होऊ शकते. मात्र, चहाचे व्यसन लागू नये. जास्त चहा पिणे हानिकारक असू शकते. यामुळे ॲसिडिटी, पचन आणि झोपेसंद्भातील समस्या उद्भवू शकतात.

Non Stop LIVE Update
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?
जितेंद्र आव्हाड राजकारणातील राखी सावंत, कुणाची जिव्हारी लागणारी टीका?.
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?
आगामी निवडणुकीच्या तोंडावर आमदारांना भरमसाठ निधी, एकाला किती कोटी?.
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?
दिशा सालियान प्रकरण नेमकं काय? आदित्य ठाकरेंशी का लावलं जातंय कनेक्शन?.
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी होणार SIT चौकशी?.
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली
आव्हाडांना दणका,विधानभवन परिसरातील NCP च्या कार्यालयाची नेमप्लेट हटवली.
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?
वाढलेली ढेरी, अजितदादा आणि आव्हाड यांच्यात पोटसूड, काय केली टीका?.
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
गळ्यात संत्र्यांची माळ अन निषेध; बळीराजाच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक.
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?
नवाब मलिक अधिवेशनात, कोणाला पाठिंबा देणार? अजित पवार की शरद पवार?.
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?
चार पक्ष अन् सगळे दक्ष; सातारा लोकसभा एकच लक्ष्य, कोणी सांगितला दावा?.
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.