AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वजन कमी करण्यासाठी अंडी उत्तम! पण कशासोबत खाणार? वाचा

चला तर मग जाणून घेऊया असा कोणता आहार आहे जो आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतो. एका आहारतज्ञाने सांगताना सांगितलं की, जर आपण काही खास पद्धतीने अंडी खाल्ली तर वजन कमी होण्यास मदत होईल.

वजन कमी करण्यासाठी अंडी उत्तम! पण कशासोबत खाणार? वाचा
Eggs for weight lossImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Mar 23, 2023 | 2:03 PM
Share

लठ्ठपणा कोणत्याही माणसासाठी शाप ठरू शकतो कारण वजन वाढल्यानंतर मधुमेह, उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, ट्रिपल व्हेसल डिसीज आणि कोरोनरी आर्टरी डिसीज सारख्या आजारांचा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे वेळीच त्याला लगाम घालणे गरजेचे आहे, अन्यथा तोटा जवळपास निश्चित आहे. चला तर मग जाणून घेऊया असा कोणता आहार आहे जो आपल्याला वजन कमी करण्यास मदत करतो. एका आहारतज्ञाने सांगताना सांगितलं की, जर आपण काही खास पद्धतीने अंडी खाल्ली तर वजन कमी होण्यास मदत होईल.

अंडी सुपरफूड मानली जातात आणि बऱ्याच लोकांसाठी हे नियमित ब्रेकफास्ट फूड आहे, ते प्रथिने समृद्ध आहे. उकडलेले अंडे, ऑमलेट, भुर्जी आणि अंडा करी अशा अनेक प्रकारे अंडी खाल्ली जाऊ शकतात. मात्र 3 गोष्टींच्या कॉम्बिनेशनमध्ये अंडी शिजवल्यास वजन कमी होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल.

  1. नारळ तेल : आपल्यापैकी बऱ्याच जणांना नारळ तेलाचे फायदे माहित आहेत, त्यात सॅच्युरेटेड फॅट नगण्य असते. त्यामुळे खोबरेल तेलात ऑमलेट शिजवल्यास वजन कमी करणे सोपे जाईल.
  2. काळी मिरी: उकडलेल्या अंड्यावर किंवा ऑमलेटवर तुम्ही अनेकदा मिरची पूड शिंपडली असेल. यामुळे अंड्याची टेस्ट तर वाढतेच, शिवाय ते अधिक निरोगी ही बनते. मिरचीमध्ये पिपेरिन नावाचे कंपाऊंड असते, ज्यामुळे त्याची चव कडू असते. हा मसाला पोट आणि कमरेभोवतीची चरबी कमी करण्यास मदत करतो.
  3. शिमला मिरची: आपण अनेकदा पाहिलं असेल की अनेक रेस्टॉरंट्समध्ये शिमला मिरची टाकली जाते, ती सुंदर दिसते आणि आरोग्यासाठीही फायदेशीर असते. अशा प्रकारे तुम्ही घरीही स्वयंपाक करू शकता. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे चरबी कमी करण्यास मदत करते. रोज अंडी आणि शिमला मिरची एकत्र करून खाल्ल्यास वजन कमी करणे सोपे जाईल.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा दिलेला नाही.)

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान