Women Health: टाइप-2 मधुमेहावर महिला सहज आणू शकतात नियंत्रण; जाणून घ्या मार्ग

गर्भधारणेदरम्यान मधुमेहाचा इतिहास असलेल्या स्त्रिया निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून मधुमेहाची समस्या कमी करू शकतात, असं संशोधनातून स्पष्ट झालंय.

Women Health: टाइप-2 मधुमेहावर महिला सहज आणू शकतात नियंत्रण; जाणून घ्या मार्ग
टाइप-2 मधुमेहावर महिला सहज आणू शकतात नियंत्रण; जाणून घ्या मार्गImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 26, 2022 | 5:05 PM

नवी दिल्ली: मधुमेह (Diabetes) हा सध्या एक सामान्य आजार झाला आहे. पूर्वी जिथे हा आजार फक्त वयस्कर लोकांनाचा झालेला पहायला मिळायचा, मात्र आता तरुण व्यक्ती आणि महिलांमध्येही तो अगदी सहज दिसून येतो. मधुमेह हा महिला आणि पुरुष दोघांनाही होऊ शकत असला तरी तो स्त्रियांसाठी (women) अधिक हानिकारक आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा मधुमेहाशी संबंधित लक्षणे दिसून येतात तेव्हा त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. महिलांना मधुमेहामुळे अनेक समस्या होतात. मात्र, महिला या समस्येवर नियंत्रण मिळवू शकतात. हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या महिलांना गरोदरपणात मधुमेहाचा इतिहास आहे, अशा स्त्रिया निरोगी जीवनशैलीचा (healthy lifestyle) अवलंब करून मधुमेहाची समस्या कमी करू शकतात, असे संशोधकांना आढळले आहे.

जीवनशैलीत करा हे बदल

एका अभ्यासानुसार, मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी महिलांनी आपल्या जीवनशैलीतील पाच गोष्टींकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. निरोगी वजन, उच्च प्रतीचा आहार, दररोज काही वेळ व्यायाम करणे, मद्यपान कमी करणे आणि धूम्रपान अजिबात न करणे. या अभ्यासातील निकालांवरून असे दिसून आले आहे की ज्या स्त्रियांनी त्यांच्या जीवनशैलीत या (5) गोष्टी स्वीकारल्या आहेत त्यांना मधुमेहाचा धोका ९० टक्के कमी असतो. ज्या व्यक्तींचे वजन जास्त असते अथवा अनुवांशिकदृष्ट्या टाइप- 2 मधुमेहाचा धोका असतो अशा लोकांमध्येदेखील ही जीवनशैली प्रभावी ठरली.

संशोधनासाठी ४ हजारांहून अधिक महिलांची निवड

तस पहायला गेलं तर, निरोगी जीवनशैली ही कोणत्याही व्यक्तीच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. आणि यामुळे आपल्याला मधुमेह तसेच इतर अनेक आजारांशी लढण्यास मदतच होते. परंतु गर्भधारणेदरम्यान मधुमेहाचा इतिहास असलेल्या स्त्रियांना हे लागू होते की नाही याबद्दल फारशी माहिती मिळालेली नाही. या अभ्यासासाठी संशोधकांनी अशा 4,275 महिलांची निवड केली, ज्यांना गर्भधारणेदरम्यान मधुमेहाचा इतिहास होता.

हे सुद्धा वाचा

जास्त वजन असलेल्या महिलांमध्ये ठरले प्रभावी

या संशोधनात २८ वर्षांत झालेल्या बदलांचे मोजमाप करण्यात आले. या २८ वर्षांत ९२४ महिलांना टाइप २ मधुमेहाचा त्रास झाला, तर वर नमूद केलेल्या (निरोगी वजन, उच्च प्रतीचा आहार, दररोज काही वेळ व्यायाम करणे, मद्यपान कमी करणे आणि धूम्रपान अजिबात न करणे) या पाचही नियमांचे पूर्णपणे पालन करणाऱ्या इतर सर्व महिलांना टाइप-2 मधुमेहाचा धोका ९० टक्के कमी होता, असे यामध्ये आढळून आले. ज्या महिलांचे वजन जास्त होते, ज्या लठ्ठपणाचा सामना करत होत्या, त्या स्त्रियांमध्येही मधुमेहासाठी जबाबदार असलेल्या घटकांमधील बदलांमुळे परिणाम दिसून आला.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.