AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सकाळी उठल्यानंतर ‘या’ सवयी नक्की अंगिकारा आणि पाहा चमत्कार!

सकाळी योग्य सवयी अंगीकारल्यास औषधांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. ही आरोग्यवर्धक सवयी कोणत्याही आर्थिक खर्चाशिवाय शरीराला तंदुरुस्त ठेवतात. त्यामुळे, उद्यापासून नव्हे तर आत्तापासूनच या सवयी अंगीकारा आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल अनुभवायला सुरुवात करा.

सकाळी उठल्यानंतर ‘या’ सवयी नक्की अंगिकारा आणि पाहा चमत्कार!
wake up from bed
Follow us
| Updated on: Jun 11, 2025 | 2:11 PM

खरं पाहिलं तर, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्याला सर्वात जास्त विसर पडतो तो म्हणजे स्वतःच्या आरोग्याचा. आपल्या दैनंदिन आयुष्यात सकाळचा काळ हा सर्वात मौल्यवान असतो. कारण जसा दिवसाची सुरुवात तशीच संपूर्ण दिनचर्याही घडते. जर सकाळ सकारात्मक आणि आरोग्यदायी सवयींनी भरलेली असेल, तर शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्यालाही त्याचा चांगला फायदा होतो.

अनेक आरोग्य तज्ज्ञांनी अभ्यासातून सिद्ध केले आहे की सकाळी योग्य दिनक्रम पाळल्यास पचनसंस्था सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील इम्युन सिस्टीम मजबूत होते. यामध्ये काही खास सवयींचा समावेश होतो, ज्या प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनशैलीचा भाग बनवाव्यात.

1.तांब्याच्या लोट्यातील पाणी पिणे

तांब्याचं पाणी अनेक वर्षांपासून आयुर्वेदात गुणकारी मानलं गेलं आहे. रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात ठेवलेलं पाणी सकाळी उपाशीपोटी प्यायल्याने शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर टाकली जातात. हे नैसर्गिक डिटॉक्सिफिकेशन शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतं. यामुळे त्वचेचा नूर वाढतो, पचनक्रिया सुधारते आणि लठ्ठपणा कमी होतो.

2. ब्रश करण्याआधी हे करा

ब्रश करण्याआधी तीळ किंवा खोबरेल तेल तोंडात घेऊन ५-१० मिनिटं तोंडात फिर्वणं म्हणजेच तेल पुलिंग. ही पद्धत तोंडातील जंतूंना नष्ट करतं, हिरड्यांचं आरोग्य सुधारते आणि संपूर्ण तोंडाच्या स्वच्छतेसाठी फायदेशीर ठरते. हा उपाय पायरिया, दुर्गंधी आणि दातांच्या सडण्यापासून वाचवतो.

3. सूर्यनमस्कार किंवा हलकी व्यायाम

सकाळी केलेला व्यायाम संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा प्रदान करतो. योगासने, प्राणायाम किंवा फक्त १० सूर्यनमस्कारही शरीराला ताजेतवाने ठेवतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं, हृदय बळकट राहतं आणि मेंदूला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो. व्यायामामुळे मानसिक तणावही कमी होतो.

4. कोमट पाणी पिणे

कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरुवात केल्यास पचनसंस्था उत्तम राहते. विशेषतः लिंबू आणि मधासोबत कोमट पाणी घेतल्यास शरीरातील चरबी वितळते आणि शरीर हलकं वाटतं. यामुळे बद्धकोष्ठतेसारख्या समस्याही कमी होतात.

या सवयींचे फायदे

वरील सवयींचा अवलंब केल्यास शरीराला फक्त बाह्य नव्हे तर अंतर्गत स्तरावरही फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचेची चमक टिकून राहते, थकवा जाणवत नाही आणि मन प्रसन्न राहतं. हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब अशा अनेक आजारांपासून संरक्षण मिळतं.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल
VIDEO: आशाताईंचा आग्रह, CM गायले पण शेलारांचं गाणं ऐकून पोट धरून हसाल.
अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अ‍ॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का
अहमदाबाद दुर्घटनेनंतर DGCA ची मोठी अ‍ॅक्शन, एअर इंडियाला मोठा धक्का.
एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण...
एसटीच्या या बसमध्ये जागा राखीव असतानाही दिव्यांगांना No Entry, कारण....
ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?
ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकव्हर भारतात शक्य नाही, अपघाताच कारण कसं समजणार?.
फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी
फडणवीसांच्या अंगरक्षकाला मारहाण, माऊलींच्या दारात सेवेकऱ्यांची अरेरावी.
मराठी माणसासाठी पाय चाटू अन्...राज ठाकरेंचं 2017 चं भाषण होतंय व्हायरल
मराठी माणसासाठी पाय चाटू अन्...राज ठाकरेंचं 2017 चं भाषण होतंय व्हायरल.
मंत्रिमंडळात लिंबू, मिरच्या, कवट्यांना महत्त्व, सामनातून शिंदेंवर टीका
मंत्रिमंडळात लिंबू, मिरच्या, कवट्यांना महत्त्व, सामनातून शिंदेंवर टीका.
याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला..., शिंदेंचा ठाकरेंना टोला
याआधी 21 तारखेला आम्ही मॅरेथॉन योगा केलेला..., शिंदेंचा ठाकरेंना टोला.
संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी
संत ज्ञानोबा-तुकोबांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भक्ताची मोठी गर्दी.
ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार...
ठाकरेंच्या 'किल मी'वर अमृता फडणवीस म्हणाल्या, कुणी मारेल असा विचार....