AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Watermelon: कापलेलं कलिंगड किती दिवस राहते ताजे? यावेळी टरबूज खाणे म्हणजे आरोग्याला धोका

Watermelon Facts: मुंबईतील पायधुनीत डोकाडिया कुटुंबियांच्या मृत्यूने कलिंगडाविषयी धास्ती पसरली आहे. बाजारातील अनेक भागात टरबूज गायब झाले आहेत. कापलेलं कलिंगड किती दिवस राहते ताजे?

Watermelon: कापलेलं कलिंगड किती दिवस राहते ताजे? यावेळी टरबूज खाणे म्हणजे आरोग्याला धोका
कलिंगड, टरबूज किती दिवस राहते ताजेImage Credit source: एजन्सी
| Updated on: May 03, 2026 | 4:16 PM
Share

Watermelon Facts: मुंबईत गेल्या आठवड्यात पायधुनीत डोकाडिया कुटुंबियांचा बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यानंतर सकाळी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमागे कलिंगड होते की नाही, हे तपासात समोर येईल. पण या घटनेपासून अनेक भागातील टरबूज गायब झाले आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेकदा दुकानदार कलिंगड कापून ठेवतात. अथवा कलिंगड किती लाल आहे हे दाखवण्यासाठी ते कापून देतात. पण त्यामुळे कापलेले कलिंगड किती दिवस ताजे राहते हे तुम्हाला माहिती आहे का?

उन्हाळ्यात टरबूजाचा हंगाम असतो. भारतीय उन्हाळ्यात कलिंगडावर तुटून पडतात. बाजारात या काळात मोठ्या प्रमाणात कलिंगड येते. कलिंगडामुळे लागलीच ताजेतवाने वाटते. उन्हाळ्यातील उष्णतेपासून कलिंगड खाल्ल्याने बरे वाटते. कलिंगड गोड असल्याने अबालवृद्धांचे ते आवडते फळ आहे. उन्हाळ्यात कलिंगड हे शरीराला हायड्रेट ठेवते. पण कलिंगड केव्हाही खाणे योग्य नाही. त्याने शरीराला अपाय होऊ शकतो.

टरबूज किती वेळा राहते ताजे?

टरबूज कितीही किलोचे असले तरी ते एकदाच संपत नाही. कापलेले उरलेलं कलिंगड नेमकं किती दिवस सुरक्षित राहते हे माहिती असणे आवश्यक आहे. एकदा कापलेले टरबूज हे योग्य पद्धतीने फ्रिजमध्ये ठेवल्यास 3 दिवस चांगले राहु शकते. पण जितके लवकर ते संपणार तितके फायदेशीर मानले जाते. पण फ्रिजऐवजी तुम्ही ते माठाशेजारी ठेवले. बाहेरील वातावरणात ठेवले. तर साधारणता 2 तासातच ते संपवणे गरजेचे आहे. नाहीतर उष्णतेमुळे त्यात जिवाणू वाढू शकतात.

जर टरबूज कापले आणि फ्रिज ठेवले तर त्याचा वास इतर भाजी अथवा दुधाला लागू शकतो. इतकेच नाही तर एखाद्यावेळी कापलेले टरबूज जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवून जर त्याचा रंग फिक्कट दिसत असेल अथवा त्याचा वास येत असेल अथवा ते आंबट लागत असेल तर मात्र ते खाणे योग्य नाही. शरीराला त्याने अपाय होऊ शकतो.

केव्हा खाऊ नये कलिंगड?

विशेष म्हणजे रात्री अथवा मध्यरात्री कलिंगड खाऊ नये. त्यामुळे आतड्यांना अपाय होऊ शकतो. मधुमेहींनी टरबूज जास्त खाऊ नये. त्यात नैसर्गिकरित्या साखर अधिक असते. किडनीचा त्रास असणाऱ्यांनी हे फळ खाऊ नये. तर ज्यांना कलिंगड खाल्ल्याने त्रास होतो, त्यांनी टरबूज खाऊ नये.

Follow Us
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा
अर्ध्या तासात महाजन फुटणार, राऊतांच्या दाव्यावर आता गिरीश महाजनांचा पलटवार; म्हणाले, त्यासाठी ठाकरेंना...
बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
Rohit Pawar On Operation Tiger | बंडखोर खासदाराला 85 कोटींची ऑफर? रोहित पवारांचा खळबळजनक दावा!
6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार, महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Sanjay Raut Full Press | 6 खासदार फुटले; संजय राऊतांचा एल्गार – आता महाराष्ट्रात ऑपरेशन तुडवा सुरू!
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकड
Omraje Nimbalkar | ओमराजे निंबाळकरांबाबत मोठी अपडेट समोर; गृह विभागाकडून अधिकृत पत्र जारी, काय घडलं?
खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक!
Yawatmal | खासदार फुटीनंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक! संजय देशमुखांचा पुतळा जाळत संताप!