AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका दिवसात किती वेळा लघवीला येणे नॉर्मल ? युरोलॉजिस्टच्या मते वयानुसार….

दिवसातून किती वेळा लघवीला जाणे सामान्य आहे? युरोलॉजिस्टच्या मते वयानुसार लघवीला जाण्याचे किती असे हे सांगितलेले आहे; त्यापेक्षा जास्त वेळा लघवीला जायला लागत असेल तर आपल्या काही आजार असल्याचे ते संकेत आहेत.

एका दिवसात किती वेळा लघवीला येणे नॉर्मल ? युरोलॉजिस्टच्या मते वयानुसार....
What Causes Frequent Urination
| Updated on: Nov 27, 2025 | 10:26 PM
Share

किडनी शरीरातील कचरा टाकाऊ पदार्थ रक्तातून गाळून लघवीच्या वाटे बाहेर टाकते. तुम्ही दिवसातून किती वेळा लघवी जाता. यावरुन तुमच्या प्रकृतीचा संकेत मिळत असतो. काही लोक रात्रीचे उठून लघवीला जात असतात. तर काही जण दिवसभर कार्यालयात बसूनही एकदाच लघवीला जातात. डॉक्टराच्या लघवीला जास्त येणे आणि कमी येणे दोन्ही गोष्टी शरीरातील आजाराचे संकेत असू शकतात.

यूरोलॉजिस्ट डॉ. हामिद अब्बूदी यांच्या मते चहा, कॉफी, मद्य आणि सोडा या गोष्टी ब्लॅडरला जास्त एक्टीव्ह करतात. यामुळे वारंवार लघवीला येऊ शकते. काही मेडीकल कंडीशनमध्येही लघवीला कमी – जास्त येते. यात युरिनरी ट्रॅक इंफेक्शन (UTI),प्रोस्टेट वा ब्लॅडर कॅन्सर, मल्टीपल स्क्लेरोसिस आणि स्ट्रोक सारख्या आजार यांचा समावेश आहे. या शिवाय महिलांमध्ये गर्भावस्थेच्यावेळी देखील ही समस्या येऊ शकते.

लहान मुलांना दिवसातून कितीवेळा लघवीला येणे नॉर्मल

लहान मुलांनी सर्वसाधारणपणे दिवसातून ८ ते १४ वेळा लघवीला जाण्याची गरज असते. जसे जसे ते मोठे होतात तसे ते ६ ते १२ वेळा लघवी करतात. जर एखाद्या मुलाला जास्त लघवीला येत असेल तर कॅफीन युक्त पदार्थ, कब्ज वा एलर्जी देखील असू शकते.

किशोरवयीन मुलांचे काय ?

टीनएजर मुलात दिवासातून ४ ते ६ वेळा लघवीला येणे सामान्य आहे. परंतू हार्मोन्स बदलाने काही वेळा वारंवार लघवीला येऊ शकते. अनेक प्रकरणात काही काळानंतर वारंवार लघवीचा समस्या आपोआप ठीक होते. तर बराच काळ ही समस्या सुरु राहिली तर मधुमेह किंवा UTI चा संकेत असू शकतो.

वयस्क ( ६०  हून कमी )

डॉ. हामिद यांच्या मते बहुतांश वयस्क दिवसातून ५ ते ८ वेळा आणि रात्री एकदा लघवीला जातात. महिलांमध्ये हे पुरुषांच्या तुलनेत अधिक असू शकते. गर्भावस्थेत गर्भाशयाचा दबाव ब्लॅडरवर पडतो. ज्यामुळे लघवीला येण्याचे प्रमाण वाढते. महिलांना युटीआय होणे सर्वसामान्य आहे. कारण त्यांना वारंवार लघवी जाणे भाग असते.

बुजुर्ग ( ६० हुन अधिक )

वय वाढल्याने आपल्या शरीराची किडनी आणि ब्लॅडरची कार्यक्षमता हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे बुजुर्गांना लघवी रोकता येणे कठीण जाते. NHS च्या मते ६० हून अधिक वयाच्या लोकांना रात्री दोनदा लघवीला जाणे नॉर्मल आहे. याचे कारण शरीरातील एंटीडाययूरेटिक हार्मोन (ADH )ची कमतरता, जी पाण्याच्या प्रमाणाला कंट्रोल करते. तसेच अनेक बुजुर्ग लोक डाययूरेटिक औषधे घेतात. त्यामुळेही लघवीत वाढ होते. पुरुषांना वाढत्या वयानुसार प्रोस्टेट ग्रंथीचा आकार वाढतो. त्यामुळे ब्लॅडरवर दबाव वाढतो आणि लघवीचा इच्छा वारंवार होते.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.