तणावाचे व्यवस्थापन कसे करावे, स्ट्रेस आल्यावर काय करावे
तुमच्या मानसिक आरोग्यासाठी काय चांगले आहे आणि काय चांगले नाही ते तुम्हीच चांगले जाणता. तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुमचा तणाव सहज नियंत्रित केला जाऊ शकतो. काय आहेत त्या गोष्टी जाणून घ्या.

Stress Mahnagement : काही लोकं इतकी हळवी स्वभावाची असतात की प्रत्येक छोटी गोष्ट मनाला लावून घेतात. त्यामुळे ते तणावात अधिक असतात. तणाव आल्याने भावनांना आवर घालता येत नाही. मग छोट्या-छोट्या गोष्टी ही दु:ख देऊन जातात. माणूस नकारात्मक होत जातो. जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले नाही, अशा परिस्थितीत तुम्ही काही टिप्स फॉलो करु शकतात. ज्याद्वारे तुमचा तणाव सहजपणे नियंत्रित केला जाऊ शकतो.
जेव्हाही तुम्हाला असं काही वाटत असेल तेव्हा तुम्ही ध्यान करा. ध्यान केल्याने तुम्हाला यापासूनही बऱ्याच अंशी आराम मिळेल. असे केल्याने तुम्ही अतिविचार टाळू शकता. यामुळे तुम्हाला कशाची चिंता आहे हे समजून घेणे देखील सोपे होईल.
तणाव आणि चिंता यापासून राहा लांब
तणाव आणि चिंता यापासून मुक्त होण्यासाठी जर्नलिंग देखील खूप सोपे आहे. दररोज, एक वही आणि पेन घ्या आणि आपल्या सर्व भावना लिहा. यामुळे तुमचे मन हलके होईल. जे तुम्हाला कोणाला सांगता येत नाही ते तुमच्या डायरीत लिहा. या सर्व गोष्टींबद्दल आपल्या विश्वासू मित्राशी बोला. तुम्हाला काही सांगता येत नसेल तर व्यक्त होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
तुम्ही व्यायामही करायला हवा. यामुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते. व्यायाम केल्याने आनंदी हार्मोन्स बाहेर पडतात. व्यायाम केल्याने स्ट्रेस हार्मोन कोर्टिसोल कमी होतो. आपण दररोज चालणे आणि धावणे देखील करू शकता, यामुळे आपला मूड सुधारण्यास देखील मदत होऊ शकते.