AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dark Spots : जखमेमुळे त्वचेवर पडले काळे डाग ? हे उपाय करून पहा

चेहरा किंवा हाता-पायावर, अथवा शरीराच्या कोणत्याही भागावर एखादी जखम झाली किंवा काही लागले, तर ते बरे झाल्यानंतर बऱ्याच वेळेस काळे डाग अथवा व्रण ( dark spots or scars) राहतात. ते सहजासहजी जात नाहीत. काही घरगुती उपायांच्या मदतीने हे काळे डाग कमी करता येतात.

Dark Spots : जखमेमुळे त्वचेवर पडले काळे डाग ? हे उपाय करून पहा
| Updated on: Jul 30, 2022 | 1:19 PM
Share

बऱ्याच वेळा आपला चेहरा, हात-पाय वा शरीराच्या एखाद्या भागाला काही लागते, खरचटते किंवा जखम होते. औषधं लावल्यानंतर ती जखम तर बरी होते, पण बऱ्याच वेळेस त्या जखमेमुळे एखादा काळा डाग अथवा व्रण ( dark spots or scars) त्या ठिकाणी राहतो. हे डार्क स्पॉट्स काढण्यासाठी बाजारात अनेक उत्पादने (products)आहेत. मात्र ती प्रत्येकालाच सूट करतील असे नाही. मात्र आपण घरच्या घरी काही उपाय करून हे डार्क स्पॉट्स अथवा काळे डाग कमी करू शकतो. रोजच्या वापरातील काही पदार्थ, जे घरात सहज उपलब्ध असतात त्यांचा नियमितपणे वापर करून (home remedies) आपण हे डाग घालवू शकतोच त्याचसोबत या उपयांनी त्वचाही उजळते.

हळद

हळद (Turmeric) ही एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक घरात उपलब्ध असतेच. आयुर्वेदात हळदीला औषधी गुणधर्मांचा खजिना म्हणतात. स्वयंपाकात, तसेच सौंदर्य प्रसाधन म्हणून इतकंच नाही तर काही लागलं, खरचटून रक्त वगैरे आलं तरी उपचारांसाठी सर्वप्रथम हळदच लावली जाते. हळदीमध्ये ॲंटी-व्हायरल, ॲंटी-ऑक्सीडेंट आणि ॲंटी-फंगल गुणधर्म असतात, जे शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात. जखमेमुळे किंवा काही लागल्यामुळे जिथे काळे डाग असतील, त्यावर तुम्ही हळदीचा लेप लावू शकता. नियमित वापर केल्यास थोड्याच दिवसात त्याचा चांगला परिणा दिसून येईल.

आवळा

आवळ्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. त्वचेवरील काळे डाग दूर करण्यासाठी व्हिटॅमिन सी महत्वपूर्ण ठरतो. आवळा हा व्हिटॅमिन सी चा मोठा स्त्रोत आहे. आहारात आवळ्याचा समावेश केल्यास शरीराला अनेक फायदे मिळतात. तसेच त्वचेवरील डागांसाठीही आवळा उपयोगी आहे. आवळ्याची पेस्ट करून ती काळ्या डागांवर लावली तर ते डाग कमी होतात. त्याचसोबत त्वचेचा पोत सुधारतो आणि रंगही उजळतो.

लिंबाचा रस

लिंबामध्येही मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म असून ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. लिंबाचा रस हा एक नैसर्गिक ब्लीच असून त्याच्या वापराने काळे डाग सहजरित्या घालवता येतात. लिंबाचे अनेक फायदे आहे. लिंबाचा रस आणि मध हे दोन्ही एकत्र करून त्यांचे मिश्रण डाग पडलेल्या जागी लावून थोड्या वेळाने धुवून टाका. नियमित वापराने काळे डाग कमी होण्यास मदत होते.

कोरफड

कोरफड ही आपल्या त्वचेसाठी तसेच केसांसाठीही खूप फायदेशीर असते. त्यामध्ये ए, बी1, बी2, बी3, बी6, बी12, सी , ई आणि फॉलिक ॲसिड यासारखी अनेक पोषक तत्वे आढळून येतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे, पोटाच्या समस्या आणि त्वचेच्या समस्या कमी करण्यात कोरफडीचा खूप फायदा होतो. कोरफडीचे ॲंटी-बॅक्टेरियल आणि ॲंटी-इन्फ्लेमेटरी गुण त्वचा आतून दुरुस्त करण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक जण कोरफडीच्या रसाचे सेवन करतात. बाह्य उपचारांसाठीही कोरफड फायदेशीर ठरते. ज्या ठिकाणी काळे डाग असतील, त्यावर नियमितपणे कोरफडीचा रस लावावा. हळूहळ ते डाग कमी होतील.

( टीप–  या आर्टिकलमध्ये सुचवण्यात आलेले उपाय व दिलेले सल्ले हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. ते अवलंबण्यापूर्वी डॉक्टरांचा अथवा तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. )

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.