AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नजर कमकुवत कशामुळे होते? त्याची लक्षणं काय? त्यावर उपाय काय?

तसं पाहिलं तर दृष्टी कमकुवत होण्यामागे अनेक कारणं असतात. जसे की मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिवापर, धूम्रपान आणि खाण्यापिण्यात व्यत्यय येऊ शकतो. काय कारणांमुळे दृष्टी कमकुवत होते हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

नजर कमकुवत कशामुळे होते? त्याची लक्षणं काय? त्यावर उपाय काय?
eyes care
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 18, 2023 | 1:58 PM
Share

मुंबई: बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये डोळ्यांशी संबंधित आजार झपाट्याने वाढत आहेत. हल्ली लहान मुलांनादेखील चष्मा लागतो. त्याचबरोबर दूरवरची दृष्टी कमकुवत होण्याच्या समस्येने बहुतांश लोक त्रस्त असतात. तसं पाहिलं तर दूरची दृष्टी कमकुवत होण्यामागे अनेक कारणं असतात. जसे की मोबाईल आणि लॅपटॉपचा अतिवापर, धूम्रपान आणि खाण्यापिण्यात व्यत्यय येऊ शकतो. काय कारणांमुळे दूरची दृष्टी कमकुवत होते हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

दूरची दृष्टी कमकुवत होण्याची लक्षणे:

  • जर दूरची दृष्टी कमकुवत असेल तर आपल्याला सुरुवातीला अस्पष्ट दृष्टीची समस्या उद्भवू शकते. पण जसजशी ही समस्या वाढत जाते तसतशी तुमची लक्षणेही गंभीर होऊ लागतात. अशा वेळी चुकूनही या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका.
  • वारंवार पापण्या मिटणे, अस्पष्ट दृष्टी, वाहन चालवताना समोरच्या गोष्टी दिसण्यास त्रास होणे, डोळ्यात सारखे पाणी येणे, तीव्र डोकेदुखी, गोष्टी नीट न दिसणे, वाचताना पापण्या आकुंचित होणे.

दृष्टी कमकुवत होऊ नये म्हणून टिप्स

दृष्टी कमी होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान आणि आहारातील बिघाड. अशा वेळी काही सवयी सुधारून तुम्ही दूरची दृष्टी कमकुवत होण्यापासून वाचवू शकता. त्याचबरोबर दूरची दृष्टी कमकुवत होऊ नये म्हणून काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.

  1. वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्या.
  2. उन्हापासून डोळ्याचे संरक्षण करण्यासाठी बाहेर पडताना सनग्लासेसचा वापर करा.
  3. लॅपटॉप किंवा फोन वापरताना मध्येच ब्रेक घ्या.
  4. पुस्तक वाचताना चांगला प्रकाश ठेवावा.
  5. आहारात फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
  6. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी वेळोवेळी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)

Follow Us
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत
CBSE च्या पोर्टलवर मोठ्या सायबर हल्ल्याचा प्रयत्न, फक्त दोनच मिनिटांत.
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,
कचऱ्याने हैराण नागरिक आक्रमक; MIDC कार्यालयाबाहेर टाकला कचऱ्याचा ढीग,.
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक
ठाकरेंचा विश्वासू नेता हे काय बोलून गेला, बड्या खासदाराविषयी केलं सूचक.
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक
महागाईविरोधात ठाकरे सेनेचा एल्गार! भायखळ्यात रस्त्यावर उतरले शिवसैनिक.
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची
आता हातभट्टीला सरकारने थेट...पुण्याच्या दारुकांडानंतर रामदास आठवलेंची.
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात
विखे लवकरच भिकेला लागणार, संजय राऊतांचा विखे-पाटलांवर घणाघात.
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च
सर्वात मोठी घडामोड! 447.27 कोटींचा तो आदेश रद्द... रिलायन्सला सर्वोच्च.
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात....
NEET घोटाळ्याविरोधात रस्त्यावर उतरली युवा काँग्रेस; सरकारविरोधात.....
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस
काँग्रेसची शाल घालून सुप्रिया सुळेंच स्वागत; म्हणाल्या, माझा काँग्रेस.
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
लाडक्या बहिणींनी लगेच लक्ष द्या! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय.