AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमचेही वय 30-40 दरम्यान असेल तर या गोष्टींची घ्या काळजी, हृदयासोबतच संपूर्ण शरीरही राहील फिट

आजच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्यापिण्याच्या सवयीमुळे वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी लोकांना अनेक आजार होत आहेत. त्यामुळे या वयातच आरोग्याचे काळजी घेणे गरजेचे आहे. 35 ते 40 या वयात स्वतःची काळजी कशी घ्यावी याबद्दल तज्ञांनी सांगितले आहे ते जाणून घेऊ.

तुमचेही वय 30-40 दरम्यान असेल तर या गोष्टींची घ्या काळजी, हृदयासोबतच संपूर्ण शरीरही राहील फिट
प्रतिकात्मक छायाचित्रImage Credit source: Instagram
आकांक्षा वाघ
आकांक्षा वाघ | Edited By: | Updated on: Jan 25, 2025 | 1:11 PM
Share

वाढत्या वयाबरोबर शरीराला अनेक आजार होण्याचा धोका असतो. आता खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि बिघडलेल्या जीवनशैलीमुळे वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी शरीरात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. हृदविकारापासून यकृताच्या आजारापर्यंतच्या आजारांचा धोका या वयातच वाढतो. अशा परिस्थितीत शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जाणून घेऊ वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी कोणत्या खास गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून तुम्ही निरोगी राहाल.

35 ते 40 या वयात चांगली जीवनशैली आणि नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी हाडांची ताकद कमी होऊ लागते. प्रजनन क्षमता देखील हळूहळू कमी होऊ लागते आणि हृदयापासून यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका वाढतो. यामुळेच या वयात आरोग्याची काळजी घेणे आणि नियमित तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याबाबत डॉ. राहुल चौडा यांनी चार महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी या गोष्टी लक्षात ठेवा

या वयात तुम्हाला नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ कोलेस्ट्रॉल चाचणी आणि हृदयविकाराची लक्षणे असल्यास एक्स-रे आणि इको देखील करणे गरजेचे आहे. या वयात रक्तदाबाचा आजार होण्याचाही धोका असतो. या वयात मधुमेहाचा धोका वाढू लागतो त्यामुळे रक्तातील साखरेची नियमित तपासणी करा. हाडांची घनता कमी होऊ लागते आणि हाड फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो म्हणून कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची पातळी तपासणी आवश्यक आहे. जर ते कमी असेल तर यासाठी सूर्यप्रकाशात थोड्यावेळ बसा.

मानसिक आरोग्याची काळजी घेणे गरजेचे

वयाच्या 35 ते 40 व्या वर्षी तणाव आणि चिंता सामान्य आहे परंतु त्यांना योग्य पद्धतीने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दररोज किमान 30 मिनिटे हलका व्यायाम करा जसे की चालणे आणि योगासने करणे. आहारात फास्ट फूड टाळा आणि ताजी फळे, भाज्या, कडधान्य आणि चरबीयुक्त प्रथिनांचे सेवन करा. जर तुम्हाला कोणत्याही आजाराची लक्षणे दिसत असतील तर चाचणी करा. कोणतीही समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Follow Us
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती