वाढत्ये ब्रेस्ट साईज, एका वर्षात 15000 भारतीय महिलांनी केली ‘ही’ सर्जरी, जाणून घ्या काय आहे कारण !

ब्रेस्ट इम्प्लांटद्वारे लहान स्तनांचा आकार वाढवला जातो. देशात 31 हजार 608 महिलांचे ब्रेस्ट इम्प्लांट करण्यात आले आहे.

वाढत्ये ब्रेस्ट साईज, एका वर्षात 15000 भारतीय महिलांनी केली 'ही' सर्जरी, जाणून घ्या काय आहे कारण !
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Mar 19, 2023 | 10:37 AM

नवी दिल्ली : सध्या अनेक महिलांमध्ये स्तनाशी (breast problem) संबंधित समस्या अधिक दिसून येत आहेत. स्तनांचा आकार (breast size) वाढल्यामुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बहुसंख्य महिला हे त्यांचे मोठे आणि जड स्तन कमी करण्यासाठी ब्रेस्ट रिडक्शनची (breast reduction) शस्त्रक्रिया करण्यास मजबूर होतात. मात्र या दरम्यान त्यांना काही गंभीर शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागते. भारतात 2021 साली 15 हजार महिलांवर ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करण्यात आली, अशी माहिती समोर येत आहे.

खरं तर, स्त्रिया स्तनाचा आकार कमी करण्यासाठी ब्रेस्ट रिडक्शनची शस्त्रक्रिया करतात. एका अहवालानुसार, 2021 मध्ये, भारतातील सुमारे 15,000 महिलांनी स्तन कमी करण्याची अर्थात ब्रेस्ट रिडक्शनची सर्जरी केली. तसेच स्तन प्रत्यारोपण अर्थात ब्रेस्ट इम्प्लांट करणाऱ्या महिलांची संख्या तर दुप्पट होती. 2021 मध्ये, भारतात 31, 608 महिलांनी स्तन प्रत्यारोपण म्हणजे ब्रेस्ट इम्प्लाट केले. प्रत्यारोपणाच्या या शस्त्रक्रियेद्वारे लहान स्तनांचा आकार वाढवला जातो. तर, ब्रेस्ट लिफ्ट याची शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलांची संख्या 11, 520 इतकी होती. ब्रेस्ट लिफ्ट शस्त्रक्रिया करताना अतिरिक्त त्वचा आणि ब्रेस्ट टिश्यूज काढून टाकले जातात.

ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी म्हणजे काय?

हे सुद्धा वाचा

ब्रेस्ट रिडक्शन अर्थात स्तन कमी करण्याची शस्त्रक्रिया ही एक प्रक्रिया आहे जी स्तनातील अतिरिक्त चरबी, टिश्यूज आणि त्वचा काढून टाकते. स्त्रिया स्तनांचा आकार कमी करण्यासाठी ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करतात. ज्या स्त्रिया त्यांच्या स्तनाचा आकार आणि वजन याबद्दल समाधानी नाहीत, अशा स्त्रिया ही शस्त्रक्रिया करण्यास प्राधान्य देतात. खरंतर काळानुसार महिलांच्या स्तनांमध्ये काही बदल होत असतात. यामागचे कारण म्हणजे वाढते वय, हार्मोन्सची पातळी आणि काही प्रकारची औषधे हेही असू शकते.

ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करण्यासाठी किती येतो खर्च ?

लहान रुग्णालयांमध्ये स्तन कमी करण्याच्या अथवा ब्रेस्ट रिडक्शन शस्त्रक्रियेची किंमत 1.5 लाखापर्यंत असते तर सुपर स्पेशालिटी रुग्णालयांमध्ये हा खर्च 4 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. या शस्त्रक्रियेकडे कॉस्मेटिक (सर्जरी) म्हणून पाहिले जाते. त्यामुळे यामध्ये कोणतेही आरोग्य विमा संरक्षण मिळत नाही. ब्रेस्ट रिडक्शन सर्जरी करणाऱ्या महिला सांगतात की शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना खूप तणाव जाणवतो. त्यांना मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही समस्यांशी झगडावे लागते. पण शस्त्रक्रियेनंतर त्याच्या प्रतिमेत बराच बदल झालेला दिसतो. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असं मत अनेक महिलांनी व्यक्त केलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.