AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Coronavirus: भारतात कोरोनाची परिस्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता; WHO कडून धोक्याचा इशारा

पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा इशारा WHO ने दिला आहे. (India Covid-19 situation hugely concerning)

Coronavirus: भारतात कोरोनाची परिस्थिती आणखी भयंकर होण्याची शक्यता; WHO कडून धोक्याचा इशारा
Dr.-Tedros-Adhanom-Ghebreyesus
| Updated on: May 15, 2021 | 10:52 AM
Share

नवी दिल्ली : जगभरात कोरोना लसीच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग वेगाने पसरत आहे. यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच मृत्यूचा आकडाही दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल, असा इशारा WHO ने दिला आहे. (India Covid-19 situation hugely concerning said WHO chief Tedros Adnom Ghebreyus)

इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चिंताजनक

जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयियस (Tedros Adnom Ghebreyus) यांनी दिलेल्या माहितीनुसार, WHO कडून कोव्हिड 19 च्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी भारताला मदतही दिली जात आहे. अनेक ठिकाणी तात्पुरते रुग्णालय, हजारो ऑक्सिजन केंद्र, मास्क आणि इतर वैद्यकीय सेवांचा पुरवठा केला जात आहे. इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती ही चिंताजनक आहे. भारतातील अनेक राज्यात कोरोना रुग्ण, रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या, मृत्यूची संख्या वाढत आहेत. त्यामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.

दुसरं वर्ष आणखी भयंकर

कोरोना महामारीचं दुसरं वर्ष आणखी भयंकर असेल. पहिल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षात अधिक लोकांचे जीव जातील. त्यामुळे हे वर्ष अधिक जीवघेणं असेल. कोरोना महामारीचं स्वरुप अधिक तीव्र होत असून त्यामुळे दुसऱ्या वर्षात कोरोनाचा विषाणू अधिक जीवघेणा होईल, असं टेड्रोस म्हणाले.

देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. रुग्णालयात जागाच नसल्यानं उपचारांअभावी रुग्ण प्राण सोडत आहेत. तर मरणानंतरही मृतदेहांचे हाल होत आहेत, असेही ते म्हणाले.

लहानग्यांना लस देण्यापेक्षा गरजूंना द्या 

दरम्यान अनेक श्रीमंत देशामध्ये आता लहान मुलांना तसेच किशोरवयीन मुलांना कोरोनाची लस दिली जात आहे. तर दुसरीकडे गरीब देशांमध्ये आता कुठे आरोग्य कर्मचारी आणि गरजू लोकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. तरुण आणि निरोगी लोकांना लस देण्याऐवजी त्यांनी कोवॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन-शेअरिंग योजनेस त्यांचे डोस दान करावेत. तसेच देशातील गरजू लोकांचे कोरोनापासून संरक्षण करावे, असे जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख  टेड्रोस अदनोम घेब्रेयियस यांनी सांगितले. (India Covid-19 situation hugely concerning said WHO chief Tedros Adnom Ghebreyus)

संबंधित बातम्या : 

गोव्यात उद्रेक, ऑक्सिजन अभावी आधी 26, आता 15 रुग्णांचा मृत्यू!

कोरोना रुग्णांचं दु:ख समजू शकतो, आपली लढाई एका अदृश्य शत्रूसोबत: पंतप्रधान मोदी

71 दिवसात 1.23 लाख मृत्यू दाखले वितरित, मात्र कोरोना मृतांची संख्या 4218, गुजरातकडून आकड्यांची लपवा-छपवी?

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.