गाढ झोप येण्यासाठी काय कराल? आयुष्यभर लक्षात राहील अशा ट्रिक्स…
लेखात अनिद्रा आणि त्याची कारणे स्पष्ट करण्यात आली आहेत. रात्री उशिरापर्यंत मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर, चिंता, चुकीचे आहार आणि तणाव हे अनिद्रेची प्रमुख कारणे आहेत. लेखात, झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी सोपे उपाय सुचवले आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून अंतर ठेवणे, ध्यान आणि श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित करणे, कॅफिनयुक्त पदार्थ टाळणे, शांत वातावरण निर्माण करणे आणि झोपण्यापूर्वी चिंतांना लिहून काढणे यांचा समावेश आहे.

तुम्हाला चांगली झोप का येत नाही? त्याची काही कारण आहेत. एक म्हणजे मध्यरात्रीपर्यंत तुम्ही वेब सीरिज पाहता. जास्तीत जास्त वेळ मोबाईलमध्ये असता. लॅपटॉपवर असता. त्यामुळे तुम्हाला झोप लागत नाही. मग अनेक समस्या निर्माण होतात. अनिद्रेमुळे अनेक रोग होऊ शकतात. स्थूलता, उच्च रक्तदाब, हृदयविकारासह शरीरात विविध गुंतागुंतीची समस्याही अनिद्रेमुळे वाढू शकते. काही लोक झोपण्यासाठी औषधं घेतात, तर काही लोकांना झोप येत नसली तरी ते मध्यरात्री जागे होतात. आधुनिक जीवनशैली, चिंता, विविध व्यस्ततेमुळे रात्री झोपण्याचा कालावधी पाच-आठ तासांवर येऊन ठेपला आहे. यामध्ये अनिद्राही समाविष्ट झाल्यास, दिवसभरातील कार्यांवर त्याचा परिणाम होतोच, शिवाय शरीरावरही त्याचे दुष्परिणाम होतात. गाढ झोप येण्यासाठी काही सवयी लागू कराव्या लागतात, त्यांची माहिती आपण पाहूया.
१) टीव्ही, लॅपटॉप किंवा फोन वापरण्याचा वेळ कमी करा. इलेक्ट्रॉनिक स्क्रीनवर नजर ठेवली की मेंदू सक्रिय होतो. शयनकक्षात जाण्याच्या किमान एक तास आधी या सर्व गोष्टींपासून दूर राहा. काही करायचं असल्यास, हलके संगीत ऐकण्याचा पर्याय ठेवू शकता. पण हेडफोन कानात घालून संगीत ऐकून झोपू नका.
२) ध्यान आणि श्वास घेण्याचे योग्य व्यायाम झोपेसाठी खूप मदत करू शकतात. दररोज हे नियमितपणे केल्यास मानसिक ताण आणि अनिद्रेवर उपाय होऊ शकतो.
३) तुम्ही काय खात आहात, याचा तुमच्या झोपेशी थेट संबंध आहे. कॅफिनयुक्त खाद्यपदार्थ झोपेसाठी अडचण निर्माण करतात. कॅफी आणि चॉकलेटमध्ये कॅफिन असतो. त्यामुळे झोपायच्या किमान ६ तास आधी अशा पदार्थांचं सेवन थांबवायला हवं. तसेच रात्रीचं जेवण हलकं ठेवा. जास्त तिखट आणि तेलकट पदार्थ पचवायला वेळ घेतात आणि त्यामुळे झोपेवर परिणाम होतो.
४) झोपायला जाताना आसपासचं वातावरण शांत ठेवा. तेजस्वी प्रकाशाऐवजी मंद निळा प्रकाश असला तर झोपायला मदत होऊ शकते. बेडरूममध्ये झोपायच्या आधी सुगंधी तेलाचा वापर करू शकता. त्याचप्रमाणे तुमचं बेड साफ ठेवा, कारण याचे देखील महत्त्व आहे.
५) झोपायच्या आधी अनेक लोकांच्या मनात वेगवेगळ्या चिंतेचा विचार येतो. ही चिंता अनिद्रेमुळे होऊ शकते. झोपायला जाताना या चिंतांना मनातून बाहेर टाका. त्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे रोज झोपण्यापूर्वी चिंतेचे विचार लिहून ठेवणे. याशिवाय, तुम्ही काय काय कामे करायची आहेत, ती देखील लिहून ठेवू शकता. यामुळे तुमचे मन काही वेळासाठी हलके होऊ शकते.