National Mango Day 2022: आरोग्यासाठी लाभदायक आहे फळांचा राजा, जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे !

Mango Benefits: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे फळ म्हणजे आंबा (Mango). मधुर चव आणि रसाळ असणारा हा आंबा फळांचा राजा म्हणूनही ओळखला जातो. आज (22 जुलै) ‘नॅशनल मँगो डे’ (National Mango Day) आहे. हा दिवस साजरा करण्यास कधीपासून सुरूवात झाली, याची निश्चित माहिती नसली तरी आंब्याचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. भारतात , सुमारे 5 हजार […]

National Mango Day 2022: आरोग्यासाठी लाभदायक आहे फळांचा राजा, जाणून घ्या आंबा खाण्याचे फायदे !
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 11:43 AM

Mango Benefits: लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे फळ म्हणजे आंबा (Mango). मधुर चव आणि रसाळ असणारा हा आंबा फळांचा राजा म्हणूनही ओळखला जातो. आज (22 जुलै) ‘नॅशनल मँगो डे’ (National Mango Day) आहे. हा दिवस साजरा करण्यास कधीपासून सुरूवात झाली, याची निश्चित माहिती नसली तरी आंब्याचा इतिहास अतिशय समृद्ध आहे. भारतात , सुमारे 5 हजार वर्षांपूर्वी पासून आंब्याची लागवड केली जात होती, असे म्हटले जाते. गोड, रसाळ, मन मोहून घेणाऱ्या सुवासित आंबा दिसल्यावर कोणालाही तो खाण्याचा मोह होतोच. लहान मुलं असोत वा मोठी माणसं किंवा वृद्ध व्यक्ती सर्वांनाच आंबा, पोटभरून नव्हे तर मनभरून खायला आवडतो ! आंबा न आवडणारी व्यक्ती विरळाच. मात्र ज्यांना हे फळ खायला आवडत नसेल, त्यांनाही आंब्याचे शरीराला होणारे फायदे (Benefits of eating Mango) कळले , तर तेही आंबा खाण्यास सुरूवात करतील. आंबा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक असतो. जाणून घेऊया त्याचे फायदे..

कसा सेलिब्रेट कराल ‘नॅशनल मँगो डे’?

आंबा हे फळ असं आहे, जे तुम्ही हरप्रकारे खाऊ शकता. नुसता चोखून, फोडी करून, त्याचा रस काढून आमरस-पुरीचा आस्वाद घेऊ शकता. एवढेच नव्हे तर मँगो ज्यूस, स्मूदी , मँगो केक किंवा त्याचे आईस्क्रीमही सर्वांनाच आवडते. कच्चा आंबा अर्थात कैरीच्याही अनेक पाककृती असतात. कैरीची चटणी, आंबेडाळ किंवा भेळेत घातलेली कैरी, यामुळे पदार्थांचा स्वाद अजूनत वाढतो. त्यामुळे फळांच्या या राजाचा, तुम्ही मनमुराद आनंद लुटू शकता आणि ‘नॅशनल मँगो डे’ साजरा करू शकता.

आंब्यात असतात अनेक पोषक तत्व

आंब्यात खूप पोषक तत्वे असतात. त्यामध्ये फॉस्फरस, डायटरी फायबर, प्रोटीन, पोटॅशिअम, जस्त ( झिंक), कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम, आयर्न, थायमिन, नियासिन, रायबोफ्लेविन यासह अनेक व्हिटॅमिन्स असतात. जी चांगल्या आरोग्यासाठी अतिशय आवश्यक आणि पोषक असतात.

हे सुद्धा वाचा

आंबा खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे

  1.  आंबा खाल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. आंब्यात व्हिटॅमिन सी असते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ॲंटी-ऑक्सीडेंट्स असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात.
  2. आंब्याचे सेवन केल्यास हृदय स्वस्थ राहते. आंब्यामुळे बॉडी फॅट कमी होते. त्याच्यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम असतात, जे हृदयविकाराचा धोका कमी करतात. तसेच आंब्यामध्ये बीटा-कॅरेटिनही असते.
  3. जर तुमची पचनसंस्था नीट काम करत नसेल तर आंबा जरूर खावा. त्यामधील पोषक तत्वे पचनसंस्थेच्या सुरळीत कार्यासाठी मदत करतात. यावर आणखी संशोधन सुरू आहे.
  4. आजकाल अनेक लोकांची दृष्टी कमी वयातच खराब होऊ लागते. आंब्यातील व्हिटॅमिन ए आणि बीटा- कॅरेटिन या घटकांमुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे डोळ्यांवर, दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अंधत्वही येऊ शकते.
  5. आंब्यात आयर्न मोठ्या प्रमाणात असते. तसेच त्यातील व्हिटॅमिन सी हेही शरीरासाठी लाभदायक ठरते.
  6. जर तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर तुम्ही आंबा खाल्ला पाहिजे. उच्च रक्तदाबामुळे हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. आंब्याचे सेवन केल्यास ते फायदेशीर असते.
  7. जर तुम्हाला हाडे बळकट ठेवायची असतील, तर आंबा जरूर खा. त्यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. तसेच कॅल्शिअमही मोठ्या प्रमाणात असते, जे हाडांच्या बळकटीसाठी गरजेचे असते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.