Oral Health : निरोगी राहण्यासाठी तोंडाचे आरोग्य का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या याबद्दल आधिक!

| Updated on: Oct 03, 2021 | 11:43 AM

आपल्या सर्वांना हे चांगले माहित आहे की निरोगी राहण्यासाठी तोंडात स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे. आपल्या सर्वांना लहानपणापासून शिकवले जाते की दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक आहे. असे केल्याने तोंडाl जंतू पसरत नाहीत. दातांबरोबरच जीभ स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे आहे.

Oral Health : निरोगी राहण्यासाठी तोंडाचे आरोग्य का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या याबद्दल आधिक!
Oral Health
Follow us on

मुंबई : आपल्या सर्वांना हे चांगले माहित आहे की निरोगी राहण्यासाठी तोंडात स्वच्छता ठेवणे फार महत्वाचे आहे. आपल्या सर्वांना लहानपणापासून शिकवले जाते की दिवसातून दोनदा ब्रश करणे आवश्यक आहे. असे केल्याने तोंडात जंतू पसरत नाहीत. दातांबरोबरच जीभ स्वच्छ करणे देखील खूप महत्वाचे आहे. (know the reason why dental check up is necessary)

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, जगभरातील 350 दशलक्ष लोक तोंडाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त आहेत, ज्यात 230 कोटी लोकांना दात किडण्याची समस्या आहे. तज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा दंत तपासणी करणे आवश्यक आहे. आरोग्यासाठी दंत तपासणी का महत्त्वाची आहे ते आपण जाणून घेऊयात.

हिरड्या

दातांची योग्य काळजी न घेतल्याने हिरड्या किडण्याचा आणि संसर्ग होण्याचा धोका असतो. जीवाणू दातांमध्ये वाढू लागतात आणि योग्य वेळी उपचार न केल्यास दात काढावे लागतात. याशिवाय, सूज आणि वेदना देखील होऊ शकतात.

दात किडणे प्रतिबंधित करते

नियमित दंत तपासणी केल्याने दात किडणे होत नाही. दात किडल्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. जर ते वेळेत दुरुस्त केले नाही तर तुमचे दात खराब होऊ शकतात.

कॅविटीपासून संरक्षण करते

काही लोकांच्या दातांमध्ये पोकळी येते. जर तुम्ही नियमित दंत तपासणी केली तर तुम्ही ते सहजपणे टाळू शकता. दात नेहमी स्वच्छ ठेवल्याने तोंडातील बॅक्टेरिया दूर राहू शकतात.

आत्मविश्वास वाढतो

स्वच्छतेमुळे दात चमकत राहतात, जे तुमच्या हास्यात सौंदर्य वाढवण्याचे काम करते. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत होते.

हिरड्यांचे संक्रमण दूर ठेवते

तोंड स्वच्छ ठेवल्यास हिरड्यांच्या संसर्गाचा धोका कमी होतो. जर तोंडातील जीवाणू वेळेत काढले नाहीत तर ही समस्या गंभीर आजाराचे रूप घेऊ शकते. तोंडाची अस्वच्छता तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढवते. त्यामुळे तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(know the reason why dental check up is necessary)