AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्या गोळ्यांमुळे तिने जीव गमावला असता ना ! Contraceptive Pill घेतल्यानंतर महिलेला आला धक्कादायक अनुभव

Contraceptive Pill : सध्याच्या काळात गर्भनिरोधक गोळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. पण यामुळे मृत्यूचाही धोका असतो, हे तुम्हाला माहीत आहे का ?

त्या गोळ्यांमुळे तिने जीव गमावला असता ना ! Contraceptive Pill घेतल्यानंतर महिलेला आला धक्कादायक अनुभव
Image Credit source: freepik
| Updated on: Apr 03, 2023 | 11:35 AM
Share

नवी दिल्ली : नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी (unwanted pregnancy) अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्यांचा (Contraceptive Pill) अवलंब करतात. गर्भनिरोधक गोळी निःसंशयपणे गर्भधारणा रोखते परंतु ती आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक (harmful for body) असते. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या बिलकूल घेऊ नयेत. गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने एका महिलेच्या जीवास धोका पोहोचल्याची अतिशय धक्कादायक घटना ब्रिटनमध्ये घडल्याचे समोर आले आहे. ज्याबद्दल वाचल्यानंतर तुमचाही विश्वास बसणार नाही. येथे एका 25 वर्षीय महिलेला गर्भनिरोधक गोळीमुळे जीव गमवावा लागला असता. ओरल (तोंडातून) कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल (oral)  घेतल्यानंतर हॉली मॅककोमिश नावाच्या महिलेला जीवघेणा स्ट्रोक आला.

एका रिपोर्टनुसार, अवघ्या 25 वर्षांच्या असलेल्या हॉलीने Microgynon 30 नावाची गर्भनिरोधक गोळी घेतली होती. व्यवसायाने थिएटर प्रोड्युसर असलेल्या हॉलीने सांगितले की ती काही महिन्यांपासून या गोळ्या घेत होती. पण एके दिवशी तिला अचानक त्रास सुरू झाला आणि जणू ती आपल्याच शरीरात अडकली आहे. आता आपण मरणार आहोत असे तिला वाटायला लागले होते.

दृष्टी झाली धूसर

हॉलीने सांगितले की ती तंदुरुस्त आणि निरोगी दिसत होती परंतु ऑक्टोबर 2021 मध्ये एका मीटिंगदरम्यान ती अचानक कोसळली. तिची दृष्टी धूसर झाली आणि तिला अस्पष्ट दिसू लागले. तसेच काहीही बोलताही येत नव्हते. पण तितक्यात कोणाला तरी तिची परिस्थिती लक्षात घेतली आणि लगेच डॉक्टरांना फोन करण्यात आला, रुग्णवाहिका बोलावण्यात आली.

हॉलीने दिलेल्या माहितीनुसार, ,या घटनेच्या दोन महिने आधी डॉक्टरांनी तिला फोनवरच गर्भनिरोधक गोळीचे प्रिस्क्रिप्शन दिले व ती गोळी घेण्यास सांगितले. मात्र डॉक्टरांनी ती गोळी प्रिस्क्राईब करण्यापूर्वी कोणतेही प्रश्न विचारले नाही, त्या गोळीच्या कोणत्याही दुष्परिणांमाविषयी कल्पनाही दिली नाही.

महिलेला जाणवला होता डिप्रेशनचा त्रास

या गर्भनिरोधक गोळ्या घ्यायला लागल्यानंतर हॉली हिला डिप्रेशन अर्थात नैराश्याची लक्षणे जाणवू लागली होती. पण नंतर हळूहळू हॉलीला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला, तसेच वारंवार सुस्तीही येऊ लागली. या सर्व सामान्य गोष्टी आहेतला वाटले होते. पण काही महिन्यांनी तिला मिनी स्ट्रोक आला. जेव्हा आपल्या मेंदूला तात्पुरते रक्त पोहोचण्यात अडचण येते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊ लागतात, तेव्हा मिनी स्ट्रोक येतो.

या घटनेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता. डॉक्टरांनी तिला लगेच गर्भनिरोधक गोळी घेणे बंद करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हॉलीला रक्त पातळ करण्यासाठी औषध देण्यात आले. हृदयाला छिद्र पडल्याने रक्ताच्या गुठळ्या मेंदूपर्यंत गेल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर हॉलीवर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि आता ती पूर्णपणे बरी आहे.

गर्भनिरोधक गोळी म्हणजे काय ?

या गोळ्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टिन यांचे मिश्रण करून तयार केले जातात. हे संप्रेरक अथवा हार्मोन हे मेंदूला ल्युटेनिझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सोडण्यापासून प्रतिबंधित करतात, जे गर्भधारणा रोखतात.

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात.
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप.
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द.
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी.
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा
विरोधी पक्षनेतेपदासाठी संख्याबळ आवश्यक; शंभूराज देसाईंचा खुलासा.
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका
मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय म्हणून..; जरांगेंची मराठा आरक्षणावर भूमिका.
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला
विरोधी पक्षनेत्यांना बंगला नाही! काँग्रेसचा सरकारवर हल्ला.
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला
कॅसेट गुळगुळीत झाली! प्रवीण दरेकर यांचा विरोधी पक्षावर हल्ला.
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान
लाडकी बहीण योजनेमुळे सरकार कर्जबाजारी नाही! भास्कर जाधवांचं मोठं विधान.
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ...
Move On ... स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! म्हणाली, ही वेळ....