AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin tanning : उन्हामुळे काळवंडला चेहरा ? या टिप्स करा फॉलो

Skin tanning Remove tips : कडक उन्हामुळे त्वचेवर टॅनिंगची समस्या होऊ शकते. यामुळे चेहराही काळवंडतो. हे दूर करण्यासाठी अनेक उपाय करतात, पण त्याचा फायदा होतोच असे नाही.

Skin tanning : उन्हामुळे काळवंडला चेहरा ? या टिप्स करा फॉलो
Image Credit source: freepik
| Updated on: Sep 02, 2023 | 5:39 PM
Share

नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : कडाक्याच्या उन्हात जास्त वेळा बाहेर राहिलो तर त्वचा टॅन (skin tanning) होण्याची समस्या उद्भवते. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. काही वेळेस चेहऱ्यासाठी हजारो रुपयेही खर्च केले जातात, पण फायदा होतोच असं नाही.अनेक वेळा तर लोकं स्वतःहून त्यांच्या चेहऱ्यावर स्टिरॉइड क्रीम लावतात, ज्यामुळे नंतर अनेक दुष्परिणाम होतात. अशा परिस्थितीत सूर्यप्रकाशामुळे होणारा टनिंग कसा दूर करायचे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या काही टिप्स फॉलो केल्यास फायदा होऊ शकतो. सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने त्वचेच्या टॅनिंगची समस्या उद्भवते, असे डॉक्टर सांगतात.

सूर्याच्या प्रखर यूव्ही किरणांपासून वाचण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करता येतो. अशा वेळी एसपीएफ 30 पेक्षा अधिक सनस्क्रीन वापरले पाहिजे. हे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते, परंतु त्वचा अधिक संवेदनशील असेल तर एसपीएफ 30 पेक्षा कमी वापरावे. मात्र नेहमीच सूर्यकिरणांपासून लांब राहू नका. सकाळच्या वेळी कोवळे ऊन अंगावर घेऊ शकता. चेहरा टॅनिंगपासून वाचवायचा असेल तर चेहऱ्यावर मास्क लावून तो कव्हर करावा आणि मग उन्हात जावे. पुरेसे ऊन मिळाले नाही तर शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण होऊ शकते.

स्वत:हून कोणतेही क्रीम लावू नका

तज्ज्ञ सांगतात, की आजकाल सोशल मीडियाच्या जगात प्रत्येकाला सुंदर दिसावेसे वाटते.यामुळेच काही लोकं स्वत:च्या मनानेच मेडिकल स्टोअरमधून क्रीम खरेदी करतात आणि ते टॅनिंग दूर करण्यासाठी लावतात. या क्रीम्समुळे चेहरा काही काळ चमकतो, पण नंतर त्याचे दुष्परिणाम दिसू लागतात. कारण या क्रीममध्ये भरपूर स्टिरॉइड्स असतात. ज्याचा त्वचेवर गंभीर परिणाम होऊ शकतो.

चेहऱ्याला टॅनिंगपासून वाचवायचे असेल तर उन्हात बाहेर जाताना चेहरा कव्हर करा. स्किन हायड्रेशनही फार गरजेचे आहे. त्यासाठी दिवसभरात कमीत कमी ८ ग्लास पाणी तरी प्यावे. त्वचेवर टॅनिंगची समस्या वाढत असेल तर स्वत: उपचार करू नका. या बाबतीत त्वचा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. काही घरगुती उपायांच्या मदतीनेही तुम्ही टॅनिग दूर करू शकता. यासाठी चिमूटभर हळद मिसळलेले दही चेहऱ्यावर लावा, किंवा रात्री झोपण्यापूर्वी कोरफडीचे जेल वापरावे. आठवड्यातून दोनदा या पद्धती केल्याने काही वेळाने आराम मिळू शकतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.