Right Time For Fruits : फळं खायची योग्य वेळ नेमकी कोणती? जाणून घ्या

मानसी मांडे,  Tv9 मराठी

Updated on: Jan 25, 2023 | 11:20 AM

फळांचे सेवन करणे हे आपल्यासाठी किती महत्त्वाचे आणि फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण अनेक वेळा ते खाण्याची योग्य वेळ कोणती याकडे लोकं दुर्लक्ष करताना दिसतात.

Right Time For Fruits : फळं खायची योग्य वेळ नेमकी कोणती? जाणून घ्या
Image Credit source: Freepik

नवी दिल्ली – आपल्या सर्वांनाच फळांचे फायदे (benefits of fruits) माहीत आहेत. त्यांच्या सेवनाने शरीराला अनेक लाभ होतात. विशेषत: सकाळी रिकाम्या पोटी फळांचे सेवन केल्यामुळे पचन, त्वचा, केस, मेटाबॉलिज्म (boosts metabolism), प्रतिकारशक्ती सुधारते. मात्र आपण हे विसरतो ती की प्रत्येक व्यक्तीच्या शरीर प्रकार आणि मेटाबॉलिज्म हे विशिष्ट असते. त्यामुळे काही लोकांनी सकाळी फळे खाणे टाळावे. तर इतरांसाठी, नाश्त्यासोबत फळ खाणे (fruits in breakfast) हा सर्वोत्तम अनुभव असू शकतो.

फळांचे विविध प्रकार

प्रत्येक फळामध्ये विविध प्रकारचे एंजाइम आणि ॲसिड असतात जे आतड्यांतील बॅक्टेरियासह रिॲक्ट करतात आणि त्या व्यक्तीच्या लक्षणांवर अवलंबून ते चांगले ठरू शकते किंवा त्रास होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या फळांचे सेवन करता हे समजून घ्या, असे तज्ज्ञ सांगतात.

सकाळी फळे खावीत की फळं खाणे टाळावे ?

1) फळं टाळा

जर तुम्हाला सर्दी, खोकला, सायनुसायटिस, ॲलर्जी, दमा, उच्च ताप, फुफ्फुसात रक्त साठणे, ब्राँकायटिस, मधुमेह आणि वजन वाढणे यांसारखी ॲसिडिटी, जळजळ किंवा कफसंदर्भातील लक्षणे असल्यास सकाळी रिकाम्या पोटी फळे खाणे टाळावे.

2) फलाहार करा

जर तुम्हाला बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, कोरडे कुरळे केस, कमकुवत पचन आणि कमकुवत मेटाबॉलिज्म अशी लक्षणे दिसत असतील तर तुम्ही सकाळी फळं खाल्ली पाहिजेत. फळं ही तुमच्या आतड्यातील बॅक्टेरिया वाढवतात आणि तुमचा गॅस्ट्रिक ज्यूस उत्तेजित करतात.

3) हे लक्षात ठेवा

फळं ही नेहमी नुसती खावीत. ती भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, धान्य आणि कडधान्ये किंवा मांसामध्ये मिसळू नये कारण ते विषारी असू शकतात. मात्र तुम्ही ते ड्रायफ्रुट्ससह खाऊ शकतात, कारण ते दोन्ही समान प्रकारचे असते

सकाळी फळं खाण्याचे फायदे

1) बेस्ट डिटॉक्स फूड

सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत आपले शरीर डिटॉक्स प्रक्रियेतून जात असते. अँटी-डिटॉक्स खाद्यपदार्थांपेक्षा जास्त चरबीयुक्त, फळे या प्रक्रियेदरम्यान ऊर्जा वाढवतात.

2) मेटाबॉलिज्म वाढते

फळे ही पचायला अतिशय सोपी व सहज असतात. सकाळच्या वेळी पहिले फळांचे सेवन केल्याने फळांमधील नैसर्गिक साखरेमुळे मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो

3) तुमचे शरीर जागे होते

हे सुद्धा वाचा

तुम्ही उठल्यानंतर लगेच तुमच्या शरीराला नैसर्गिक फळांच्या साखरेची नितांत गरज असते. कॉफीऐवजी फळं खाऊन पहा.

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI