तुम्हाला माहिती आहे का फळं खाण्याचेही काही नियम आहेत..? जाणून घ्या एका क्लिकवर

फळं खाणं हे आरोग्यासाठी सर्वात लाभदायक आहे. पण फळं कधी खातो, कुठली खातो यावर फळांचा फायदा अवलंबून आहे. हो, त्यामुळे फळं खाण्याचेही काही नियम आहेत.

तुम्हाला माहिती आहे का फळं खाण्याचेही काही नियम आहेत..? जाणून घ्या एका क्लिकवर
Fruits/फळं
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 4:25 PM

आरोग्यदायी Healthy फळं खाणं हे किती चांगलं आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे. डॉक्टर पण आपल्या फळं खाण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहिती आहे का की फळं खाण्याचेही काही नियम आहेत, हो नियम…फळ खाण्याचा फायदा झाला पाहिजे तर आपल्याला हे नियम माहिती असायला हवी. फळ हे आरोग्यासाठी चांगलं आहे म्हणून कधीही खायचं नसतं. आहारतज्ज्ञ आपल्याला या बद्दल सांगत असतात. तेच काही नियम आपण जाणून घेऊयात.

काय आहेत नियम? – फळ खाण्याची वेळ फळं ही आरोग्यासाठी चांगली आहे. मग दिवसात कधी पण एक फळ खालं की झालं, असा काहींचा समज आहे. पण असं नाही. फळ खाण्याचा योग्य फायदा झाला पाहिजे, असं वाटत असेल तर फळं सकाळी खाणं चांगलं. जेवण्यापूर्वी फळं खाणं चांगलं. तर संध्याकाळी 6नंतर फळं खाऊ नयेत. तर आंबट फळं सकाळी उठल्यावर नाश्तात खाऊ नये. यामुळे तुम्हाला अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रिकाम्यापोटी फळं खाल्ल्यानं या तुमच्या प्रकृतीवर उलटा परिणाम होऊ शकतो.

– टरबुजावर पाणी पिणं अयोग्य आपण अनेक जणांना पाहिलं असेल कदाचित आपणही हे केलं असेल टरबूज खाल्ल्यावर आपण लगेचच पाणी पितो. पण असं केल्यामुळे डायरिया किंवा कॉलरासारखे आजार होण्याची भीती असते, असं आहारतज्ज्ञ सांगतात. या फळांमध्ये पाणी असतं त्यामुळे त्यात अजून पाणी प्यायला नको.

– शरीराच्या प्रकृतीनुसार फळांचं सेवन करावं आपल्या शरीराचं तापमान म्हणजे आपली प्रकृती गरम असेल किंवा थंडी हे माहिती करून फळांचं सेवन केलं पाहिजे. आपली प्रकृती जर आधीच गरम असेल तर अननस, संत्रा, केळी खायला नको. थंडी असेल तर पपई, आंबे अशी फळं टाळावीत.

– दह्यासोबत फळं चांगलं नाही हो काही लोकांना दह्यासोबत फळं खायला आवडतात. पण असं फळं खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही. दह्यासोबत फळं खाल्ल्यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

– किडनी स्टोन असलेल्यांनी फळं टाळावीत किडनी स्टोन ज्यांना आहे अशा लोकांनी फळं खाणं टाळावी. प्रत्येकाची प्रकृती वेगवेगळी असते, मग अशावेळी कुठलं फळ आपल्याला चालतं, कधी खायला पाहिजे, किती प्रमाणात खायला पाहिजे, याबद्दल प्रत्येकाना डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.

लाल केळी कधी खाली आहेत का? फायदे कळल्यास रोज खाणार लाल केळी

ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त आहात? मग ‘हे’ 5 घरगुती उपाय करून पाहा!

महिलांच्या वार्डरोबमध्ये ‘या’ ब्रा नक्की असाव्यात… तुमच्या वार्डरोबमध्ये आहेत का?

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.