Male Infertility: Laptop वर सततचं काम तुमचं बाप बनण्याचं स्वप्न हिरावू शकतं, संशोधनात नवा दावा

Laptop Side Effect in Marathi | सतत लॅपटॉपवर काम केल्याचा थेट परिणाम तुमच्या प्रजनन क्षमतेवर होण्याची शक्यता आहे. मेडिकल जनरल असलेल्या ‘Fertility and Sterility’मध्ये संशोधनाचा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Male Infertility: Laptop वर सततचं काम तुमचं बाप बनण्याचं स्वप्न हिरावू शकतं, संशोधनात नवा दावा
प्रतिकात्मक फोटो

कोरोना लॉकडाऊनच्या (Corona Lockdown ) काळात अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा ( Work From Home ) पर्याय दिला. त्यामुळं अनेकजण दिवसरात्र घरात लॅपटॉप घेऊन काम करताना दिसले. अद्यापही अनेक कर्मचारी सतत लॅपटॉपवर काम करताना दिसतात. मात्र, हा लॅपटॉप तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकतो. पुरुषांसाठी याचा विशेष धोका आहे, कारण सतत लॅपटॉपवर काम केल्याचा थेट परिणाम तुमच्या प्रजनन क्षमतेवर होण्याची शक्यता आहे. मेडिकल जनरल असलेल्या ‘Fertility and Sterility’मध्ये संशोधनाचा हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. ( Laptop Cause Male Infertility )

काय आहे अहवालात? 

मेडिकल जनरल न्यूज टुडेने याबाबतील अहवाल दिला आहे. त्यात जे पुरुष मांडीवर लॅपटॉप घेऊन तासनतास काम करतात, त्यांच्या प्रजनन क्षमतेवर हा लॅपटॉप थेट परिणाम करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.  लॅपटॉपमधून बाहेर पडणारी उष्णता पुरुषांच्या अंडकोषांवर परिणाम करते. त्यामुळं अंडकोषातील शुक्राणूंचा दर्जा घसरतो. त्यामुळं पुरुषांमधील प्रजनन क्षमता कमी होते. परिणामी, ज्या पुरुषांना बाप बनायचं आहे, त्यांना अनेक प्रयत्नानंतरही यश येत नाही. जरी मांडीवर पॅड ठेऊन त्यावर लॅपटॉप ठेवला तरी त्याचा परिणाम पुरुषांच्या अंडकोषांवर होत असल्याचं संशोधनात समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. ( Laptop Cause Male Infertility )

लॅपटॉपवर काम कसं करावं?

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, नेहमी टेबलवर लॅपटॉप ठेऊनच काम करावं. टेबलवर ठेऊन काम करणं शक्य नसेल तर गुडघ्यांवर लॅपटॉप पॅड ठेऊन काम करावं. मात्र, लॅपटॉप चुकूनही मांडीवर घेऊ नये असा सल्ला शास्रज्ञांनी दिला आहे. शिवाय, मांडीवर लॅपटॉप घेऊन अर्ध्या तासापेक्षा जास्त बसू नका. नाहीतर याचा परिणाम तुमच्या शरीरावर होण्याची दाट शक्यता या संशोधनात वर्तवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Sex During Pregnancy | प्रेग्नन्सीच्या पहिल्या 3 महिन्यात सेक्स करणे योग्य की अयोग्य? तज्ज्ञांचा सल्ला

Pregnancy Tips | लवकर आई व्हायचंय?, हे 11 उपाय ठरतील फायदेशीर!

( Laptop Cause Male Infertility )

Published On - 5:55 pm, Thu, 11 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI