सिगरेट न पिणाऱ्यांनाही कशी होतेय कर्करोगाची लागण? वाचा याचे कारणे…

डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित धूम्रपान न करणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि यात जास्त महिलांचा समावेश आहे.

सिगरेट न पिणाऱ्यांनाही कशी होतेय कर्करोगाची लागण? वाचा याचे कारणे...
शरीरातील हे बदल आहेत तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे, असा करा कँसरपासून बचाव

मुंबई : सर्व कर्करोगांमधे लँग्स म्हणजेच फुफ्फुसाचा कर्करोग हा सर्वात सामान्य आजार आहे. याचे एक मुख्य कारण म्हणजे धूम्रपान करणे. म्हणूनच, फुफ्फुसांचे रक्षण करण्यासाठी, सिगारेट न पिणे केव्हाही चांगले ठरते. तथापि, हा समज पूर्णपणे चुकीची आहे की, धूम्रपान न केल्याने तुम्हाला फुफ्फुसाचा कर्करोग होणार नाही (Lung Cancer increasing in non smokers causes).

सध्या अशा लोकांची संख्या वाढत आहे, जे धूम्रपान न करताही या कर्करोगाचा बळी ठरत आहेत. डब्ल्यूएचओच्या अहवालानुसार, फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित धूम्रपान न करणार्‍यांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि यात जास्त महिलांचा समावेश आहे.

कर्करोगाची जेव्हा लागण होते तेव्हा शरीरातील पेशींचे नियंत्रण खराब होते आणि ते चुकीच्या पद्धतीने काम करू लागतात. बर्‍याचदा सिगारेटमुळे फुफ्फुसांचे नुकसान होते आणि कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. धूम्रपान करणाऱ्यांना होणारा कर्करोग आणि धूम्रपान न करणार्‍यांना होणारा फुफ्फुसाचा कर्करोग यात बराच फरक आहे. हा फरक कर्करोगास कारणीभूत असलेल्या पेशींच्या जीनमध्ये होतो. धूम्रपान न करणार्‍यांमध्ये कर्करोग सहसा ईजीएफआर जनुकातील बदलांमुळे होतो.  सिगारेट न पिण्याव्यतिरिक्त, इतरही अनेक कारणे आहेत ज्यामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होतो.

धूम्रपान न करणार्‍यांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाची कारणे

पॅसिव्ह स्मोकिंग

पॅसिव्ह स्मोकिंग याला सेकंड हॅन्ड स्मोकिंग देखील म्हणतात. यामध्ये, व्यक्ती थेट धूम्रपान करत नाही, परंतु दुसऱ्या व्यक्तीच्या सिगारेटमधून निघणाऱ्या धुरामुळे त्याला धोका निर्माण होतो. अशामुळे धूम्रपान न करणार्‍यांमध्ये या धुरामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका 24 टक्क्यांनी वाढतो. निष्क्रीय धूम्रपान केल्यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाची प्रकरणे सतत वाढत आहेत.

एस्बेस्टस

एस्बेस्टस एक कंपाऊंड आहे ज्याचा उपयोग सिमेंटचे पत्रे, औष्णिक आणि ध्वनीशी संबंधित साहित्य तयार करण्यासाठी केला जातो. त्याचे सूक्ष्मदर्शक तुकडे हवेमध्ये पसरतात आणि श्वासोच्छवासाद्वारे फुफ्फुसांमध्ये प्रवेश करतात. या ठिकाणी काम करणाऱ्यांना अशा कर्करोगाचा धोका जास्त असतो.

वायू प्रदूषण

वाहने, उद्योग, उर्जा प्रकल्पांमधून होणारे वायू प्रदूषण यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसांचा कर्करोग होण्याचा धोकाही निष्क्रिय धूम्रपानाप्रमाणेच आहे. यामुळे फुफ्फुसांच्या कर्करोगामुळे मृत्यूचे प्रमाण इतर कारणांपेक्षा जास्त आहे (Lung Cancer increasing in non smokers causes).

रेडॉन गॅस

रेडॉन गॅस युरेनियममधून सोडला जातो. या वायूमुळे फुफ्फुसांच्या कर्करोगाचा सर्वाधिक धोका असतो. युरेनियमचा उपयोग घरे, पाईप्स आणि नाले तयार करण्यासाठी केला जातो, ज्यामुळे रेडॉन गॅस हळूहळू बाहेर येत राहतो. ज्या ठिकाणी वेंटिलेशन नाही अशा ठिकाणी त्याचा धोका अधिक आहे. रेडॉन वायूच्या प्रदुषणामुळे धूम्रपान न करणारे देखील फुफ्फुसांच्या कर्करोगाचा बळी पडतात.

धूम्रपान न करणार्‍या स्त्रियांमध्येही फुफ्फुसांच्या कर्करोगाचा वाढता धोका

घराच्या आत चुलीवर अथवा कोळशावर स्वयंपाक करताना अनेक रसायने त्यातून बाहेर पडतात. ज्यामुळे फुफ्फुसांचे मोठे नुकसान होते. यामुळे महिलांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढतो.

धूम्रपान न करणार्‍यांमध्ये फुफ्फुसांच्या कर्करोगाची लक्षणे

धूम्रपान करणार्‍या आणि धूम्रपान न करणार्‍यांमध्ये फुफ्फुसांचा कर्करोगाची लक्षणे सामान्यत: सारखीच असतात. काही लोक नेहमी अस्वस्थ असतात किंवा नेहमी थकल्यासारखे वाटतात. या व्यतिरिक्त खोकला, श्वास लागणे, छातीत दुखणे, घसा खवखवणे, रक्ताच्या गाठी यासारखी लक्षणे जाणवतात. धूम्रपान न करणार्‍यांमध्येही कर्करोगाची लक्षणे उशीराने जाणवतात.

(Lung Cancer increasing in non smokers causes)

हेही वाचा :

Published On - 7:10 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI