AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरीच बनवा कोरफड जेल आणि बदाम तेलापासून नाइट क्रीम, त्वचा राहील फ्रेश आणि चमकदार

कोरफड, बदाम तेल आणि इतर घटकांचा वापर करून घरगुती पद्धतीने बनवलेली ही नाईट क्रीम स्वस्त, नैसर्गिक आणि त्वचेसाठी अनुकूल आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण ही नाईट क्रिम कशी बनवायची ते जाणून घेऊयात.

घरीच बनवा कोरफड जेल आणि बदाम तेलापासून नाइट क्रीम, त्वचा राहील फ्रेश आणि चमकदार
| Edited By: | Updated on: Feb 24, 2026 | 4:15 PM
Share

आजच्या धावपळीच्या जीवनात आपली त्वचा दिवसभर सूर्य, धूळ, घाम आणि प्रदूषणाचा सामना करते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकांची त्वचा लवकर निस्तेज, कोरडी आणि थकलेली दिसते. दिवसभर आपण कितीही त्वचेची काळजी घेतली तरी रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. कारण आपण शांत स्वस्थ होतो तेव्हा त्वचेवर नवीन पेशी तयार होतात. तसेच रात्री झोपण्याआधी त्वचेची योग्य काळजी घेतल्यास चेहरा निरोगी आणि चमकदार बनू शकतो. बाजारात मिळणाऱ्या नाईट क्रीम त्वचेला मॉइश्चरायझ आणि पोषण देण्याचा दावा करतात, परंतू अत्यंत महाग तसेच त्यात असलेले केमिकल आपल्या त्वचेला काळांतराने नुकसान पोहोचवू शकते म्हणून अनेकजण अशा नाईट क्रीम जास्त प्रमाणात वापरत नाही.

त्यातच तुम्ही अगदी सहज घरी उपलब्ध असलेल्या साध्या, नैसर्गिक घटकांचा वापर करून तुम्ही स्वतःची नाईट क्रीम बनवू शकता. हे केवळ स्वस्तच नाही तर त्वचेसाठी सौम्य आणि सुरक्षित देखील आहे. तर ही घरगुती नाईट क्रीम त्वचेला मॉइश्चरायझ, पोषण आणि ताजेतवाने करण्यास मदत करते आणि नियमित वापरामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक दिसून येते.

नाईट क्रीम बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

– 2 चमचे कोरफड जेल

– 1 चमचा बदाम तेल

– 1 चमचा ग्लिसरीन

– 3-4 चमचे गुलाबपाणी

– स्वच्छ हवाबंद डबा

घरी नाईट क्रीम कशी बनवायची?

1. प्रथम एक स्वच्छ कोरडी वाटी घ्या. त्यात कोरफड जेल बदाम तेल आणि ग्लिसरीन टाका. आणि तिन्ही घटक एकत्र स्मुद पेस्ट होईपर्यंत हलक्या हाताने मिक्स करत रहा.

२. आता हे मिश्रण छान मिक्स झाल्यावर त्यात गुलाब पाणी टाकून पुन्हा मिश्रण मिक्स करा. पोत हलक्या क्रीमसारखा होईल.

तयार क्रीम स्वच्छ, हवाबंद डब्यात ठेवा. सर्वोत्तम परिणामांसाठी ते रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. थंड केल्याने क्रीम जास्त काळ ताजी राहण्यास मदत होते आणि त्वचेवर लावल्यावर थंडपणा येतो.

नाईट क्रीम लावण्याची योग्य पद्धत:

1. झोपण्यापूर्वी सौम्य फेस वॉशने तुमचा चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. तुमच्या त्वचेवर धूळ किंवा मेकअप राहू देऊ नये.

2. तुमचा चेहरा थोडासा कोरडा झाल्यावर ही तयार नाईट क्रीम थोडीशी हातावर घ्या आणि ती तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. क्रीम तुमच्या त्वचेत शोषली जावी म्हणून वरच्या दिशेने हळूवारपणे मालिश करा.

3. झोपण्यापूर्वी किमान 10-15 मिनिटे आधी क्रीम लावा जेणेकरून ते योग्यरित्या शोषले जाऊ शकेल. रात्रभर ही क्रीम तसेच राहू द्या आणि सकाळी तुमचा चेहरा धुवा.

४. जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर पहिल्यांदा वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा.

या घरगुती नाईट क्रीमचे फायदे:

1. कोरफड जेल त्वचेला खोलवर हायड्रेट करते आणि मऊ करते. त्यामुळे त्वचेला थंड आणि आरामदायी वाटते.

2. बदामाचे तेल पोषक तत्वांनी समृद्ध असते आणि निस्तेज त्वचा पुन्हा जिवंत करण्यास मदत करते. तसेच हे तेल त्वचेला हेल्दी लूक देते.

3. ग्लिसरीन ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा रात्रभर मॉइश्चरायझ राहते आणि सकाळी चेहरा फ्रेश दिसतो.

4. गुलाबपाणी त्वचेला ताजेतवाने करते, हलके टोनिंग करते आणि चेहऱ्याचा थकवा कमी करण्यास मदत करते.

5. या घटकांचे मिश्रण त्वचेला मऊ, मॉइश्चरायझ्ड आणि चमकदार बनवण्यास मदत करते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार