AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मखान्यापासून बनवा ‘या’ 2 दोन प्रकारच्या टेस्टी भाज्या, जाणून घ्या सोपी रेसिपी

बहुतेक लोकांना मखाना दुधात मिक्स करून किंवा भाजून खायला आवडतो. पण तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही मखान्यापासून भाजी देखील बनवू शकता? चला तर मग आजच्या या लेखात आपण मखान्यापासून 2 प्रकारच्या भाज्या कशा बनवू शकता त्याची रेसिपी जाणून घेऊयात.

मखान्यापासून बनवा 'या' 2 दोन प्रकारच्या टेस्टी भाज्या, जाणून घ्या सोपी रेसिपी
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 3:40 PM
Share

आपल्या सर्वांनाच माहित आहे की मखाना आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. कारण त्यात असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडे मजबूत करण्यास मदत करू शकतात. तसेच फायबर, लोह, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम देखील चांगल्या प्रमाणात आढळतात. याशिवाय, मखानामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, ज्यामुळे ते खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

त्यामुळे अनेकजण मखाना दुधात भिजवून किंवा भाजून खाणे पसंत करतात. पण याशिवाय मखानापासून रायता आणि खीर देखील बनवली जाते. पण तुम्ही कधी मखाना भाजी करून पाहिली आहे का? तर मखानापासून तुम्ही त्याची भाजी देखील बनवू शकता. चला जाणून घेऊया मखाना भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.

मखाना आणि काजूची भाजी

सर्वप्रथम, गॅसवर पॅन ठेवा आणि त्यात 1 चमचा तूप टाकून हलके गरम करा. आता त्यात 1 कप मखाना टाका आणि मखाने कुरकुरीत आणि सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या. यानंतर, मिक्सर जारमध्ये 1 टेबलस्पून भोपळ्याच्या बिया, 5 ते 6 भाजलेले काजू आणि 2 टेबलस्पून दूध घ्या. आता हे सर्व मिश्रण बारीक करून मऊ पेस्ट बनवा. त्यानंतर, एका पॅनमध्ये 1 टेबलस्पून तूप गरम करा. त्यात जिरे आणि अख्खे लाल मिरच्या टाका. आता हळद, लाल तिखट, मीठ, धणे पावडर आणि चवीनुसार गरम मसाला टाकून परतून घ्या.

आता त्यात तयार केलेली पेस्ट टाका आणि चांगले मिक्स करा ते चांगले शिजेपर्यंत ढवळत राहा, जेणेकरून मसाला तव्यावर किंवा कढईला चिकटणार नाही. आता त्यात पाणी टाका. लक्षात ठेवा की कढी शिजत असताना घट्ट होत जाते. जर तुम्हाला ते अधिक स्वादिष्ट आणि क्रिमी बनवायचे असेल तर तुम्ही त्यात दूध देखील मिक्स शकता. याशिवाय, चव वाढवण्यासाठी तुम्ही 1 चमचा किंवा चवीनुसार साखर देखील मिक्स करू शकता. आता त्यात भाजलेले मखाना आणि उरलेले काजू टाका, काही मिनिटात तुमची मखाना काजू कढी तयार होईल शिजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

मखना, पनीर आणि मटार करी

मखाना पनीर आणि मटारची भाजी करण्यासाठी प्रथम एका पॅन किंवा कढईमध्ये तेल गरम करा. आता 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आले, 4 ते 5 काळी मिरी, 3 लवंग, 4 संपूर्ण हिरवी वेलची, 2 हिरव्या मिरच्या, 12 ते 15 काजू, 1 चिरलेला कांदा, टोमॅटो, चवीनुसार मीठ, तिखट, हळद पावडर आणि 1/2 कप पाणी घालून टोमॅटो वितळेपर्यंत शिजवा. आता हे मिश्रण थंड करा आणि नंतर ग्राइंडरमध्ये टाका आणि मऊ ग्रेव्ही बनवा.

आता पुन्हा एक पॅन गरम करा आणि त्यात एक चमचा तूप टाका. त्यात 1 चमचा जिरे, 1/2 चमचा हिंग, 1 तमालपत्र, काश्मिरी लाल तिखट, जिरे आणि धणे पावडर आणि पाणी टाकून मिश्रण छान परतून घ्या. आता त्यात टोमॅटो ग्रेव्ही टाका. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, गरम मसाला आणि थोडे पाणी टाकून बॅटर शिजवा. त्यानंतर या पेस्टमध्ये साखर टाका व त्यानंतर त्यात पनीर, उकडलेले हिरवे वाटाणे, भाजलेले मखाना, कसुरी मेथी, कोथिंबीर टाकून शिजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?
मला ताकदीची गरज नाही.. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर फडणवीस काय म्हणाले?.
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला
काही गोष्टी बोलल्या नाही तर..पराभवानंतर नितेश राणे चव्हाणांच्या भेटीला.
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट
मुंबईत ठाकरेंचा उत्सव, दणक्यात युतीची घोषणा होणार, राऊतांकडून अपडेट.
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग
शिंदेंचा माणूस पुण्याच्या दिशेने, भाजप-शिवसेनेत युती घडवण्यासाठी वेग.
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता
चर्चेसाठी वेळ द्या....कोण करतंय विनवणी? दादांच्या NCPची नाशकात हतबलता.
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल
सत्तार, हिंदू देव-देवता अन् मामू...दानवेंचा संजय शिरसाटांवर हल्लाबोल.
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा
गळ्यात सोन्याचं कमळ,नगराध्यक्षा हेमलता सावजींच्या मंगळसूत्राची चर्चा.
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?
मी सेलिब्रेशन केलं नाही...मालवणमधील विजयानंतर निलेश राणे काय म्हणाले?.
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड
आईचा विजय लेकाला मोठा आनंद, प्रणिता भालके विजयी अन् शौर्यने थोपटले दंड.
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा
कोकाटेंची आमदारकी वाचली, शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं 'सर्वोच्च' दिलासा.